logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे प्रथम पाच अधिकाऱ्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब समोर आली आहे. ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची देशातील ‘प्रथम पाच’ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या RAIDS ॲपची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, या ॲपचे सादरीकरण हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत करण्यात आले. अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर या ॲपच्या माध्यमातून केला जातो. मृतदेहाची अवस्था खराब असल्यामुळे चेहरा ओळखणे कठीण असतानाही उपलब्ध छायाचित्रे आणि माहितीच्या आधारे चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार करून ओळख पटविण्यास मदत केली जाते. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठीही चेहऱ्याच्या विविध डिजिटल प्रतिकृती तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात येतो. आतापर्यंत RAIDS ॲपमध्ये १५३ बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ मृतदेहांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून, त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये ओळख पटविण्यात यश आले आहे. जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस मृतदेहांपैकी ७ प्रकरणांमध्येही ओळख पटविण्यात आली आहे. तसेच ॲपमध्ये ३८१ बेपत्ता व्यक्तींची नोंद असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ११ बेपत्ता व्यक्तींच्या शोधात यश आले आहे. AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलिसिंगमध्ये नवा प्रयोग करणाऱ्या RAIDS ॲपची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेतील प्रथम पाच अधिकाऱ्यांमध्ये झालेली निवड ही रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नाविन्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

1 hr ago
user_राकेश कोळी
राकेश कोळी
Local News Reporter खेड, रत्नागिरी, महाराष्ट्र•
1 hr ago
df93cbaf-0594-4217-b379-3869ce4d6098

‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे प्रथम पाच अधिकाऱ्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब समोर आली आहे. ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची देशातील ‘प्रथम पाच’ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या RAIDS ॲपची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, या ॲपचे सादरीकरण हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत करण्यात आले. अज्ञात आणि बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर या ॲपच्या माध्यमातून केला जातो. मृतदेहाची अवस्था खराब असल्यामुळे चेहरा ओळखणे कठीण असतानाही उपलब्ध छायाचित्रे आणि माहितीच्या आधारे चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार करून ओळख पटविण्यास मदत केली जाते. बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठीही चेहऱ्याच्या विविध डिजिटल प्रतिकृती तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात येतो. आतापर्यंत RAIDS ॲपमध्ये १५३ बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ मृतदेहांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून, त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये ओळख पटविण्यात यश आले आहे. जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस मृतदेहांपैकी ७ प्रकरणांमध्येही ओळख पटविण्यात आली आहे. तसेच ॲपमध्ये ३८१ बेपत्ता व्यक्तींची नोंद असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ११ बेपत्ता व्यक्तींच्या शोधात यश आले आहे. AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलिसिंगमध्ये नवा प्रयोग करणाऱ्या RAIDS ॲपची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेतील प्रथम पाच अधिकाऱ्यांमध्ये झालेली निवड ही रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नाविन्यपूर्ण कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • राज्यात 13 हजार नवे शिक्षक, कोणत्या शाळांमध्ये किती पदभरती? Maharashtra Teacher recruitment राज्याला आता 13 हजार नवे शिक्षक मिळालेत... पवित्र प्रणालीद्वारे राबवलेल्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीविना 13 हजार 119 उमेदवारांची निवड करण्यात आलीय... यात सर्वाधिक 8 हजार 481 उमेदवार हे जिल्हा परिषद शाळांसाठी निवडलेत... कागदपत्र पडताळणीनंतर या सर्व पात्र उमेदवारांना लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेतलं जाणार आहे... Maharashtra is set to get 13,000 new teachers, with the highest number of 8,481 appointments expected in Zilla Parishad schools. The recruitment drive is aimed at strengthening the teaching workforce and addressing vacancies across schools in the state. The development is significant for teacher recruitment aspirants and the education sector in Maharashtra. Maharashtra teacher recruitment, Maharashtra teacher vacancy, 13000 teacher recruitment, 8481 Zilla Parishad teachers, ZP teacher recruitment, Maharashtra teacher jobs, teacher recruitment 2026, Maharashtra education news, government teacher jobs, teacher vacancy Maharashtra, Zilla Parishad teacher recruitment, Maharashtra teacher bharti, teacher bharti latest news, education department Maharashtra, teaching jobs Maharashtra, government jobs Maharashtra, teacher recruitment update, Maharashtra latest news, Shuru news today's.
    1
    राज्यात 13 हजार नवे शिक्षक, कोणत्या शाळांमध्ये किती पदभरती? Maharashtra Teacher recruitment

राज्याला आता 13 हजार नवे शिक्षक मिळालेत... पवित्र प्रणालीद्वारे राबवलेल्या शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीविना 13 हजार 119 उमेदवारांची निवड करण्यात आलीय... यात सर्वाधिक 8 हजार 481 उमेदवार हे जिल्हा परिषद शाळांसाठी निवडलेत... कागदपत्र पडताळणीनंतर या सर्व पात्र उमेदवारांना लवकरात लवकर सेवेत रुजू करून घेतलं जाणार आहे...  
Maharashtra is set to get 13,000 new teachers, with the highest number of 8,481 appointments expected in Zilla Parishad schools. The recruitment drive is aimed at strengthening the teaching workforce and addressing vacancies across schools in the state. The development is significant for teacher recruitment aspirants and the education sector in Maharashtra.
Maharashtra teacher recruitment, Maharashtra teacher vacancy, 13000 teacher recruitment, 8481 Zilla Parishad teachers, ZP teacher recruitment, Maharashtra teacher jobs, teacher recruitment 2026, Maharashtra education news, government teacher jobs, teacher vacancy Maharashtra, Zilla Parishad teacher recruitment, Maharashtra teacher bharti, teacher bharti latest news, education department Maharashtra, teaching jobs Maharashtra, government jobs Maharashtra, teacher recruitment update, Maharashtra latest news, Shuru news today's.
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    6 hrs ago
  • मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक
    1
    मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यावर मार्केटयार्ड पोलिसांची धडक कारवाई; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, एक जण अटक
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. Zee News संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जाबाबत मोठा दावा; चर्चेला उधाण नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये पुढे दावा करण्यात आला आहे की, त्यातील केवळ ६.५ हजार कोटी रुपयेच फेडायचे असून उर्वरित कर्ज माफ करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने केलेल्या कथित कर्जमाफीची भरपाई कोण करणार, असा सवालही पोस्टरमधून उपस्थित करण्यात आला आहे. या दाव्यामुळे सामान्य जनता, शेतकरी आणि कर्जबाधित नागरिकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना कर्जफेडीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना मोठ्या उद्योगसमूहांच्या कर्जाबाबत असे दावे समोर येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, सोशल मीडियावरील या पोस्टरमधील २२ हजार कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीचे दावे अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय स्रोतांच्या आधारे स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी.
    1
    नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Zee News संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जाबाबत मोठा दावा; चर्चेला उधाण
नवी दिल्ली : Zee News चे संस्थापक सुभाष चंद्रा यांच्या कर्जासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. या पोस्टरमध्ये सुभाष चंद्रा यांच्यावर २२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पोस्टरमध्ये पुढे दावा करण्यात आला आहे की, त्यातील केवळ ६.५ हजार कोटी रुपयेच फेडायचे असून उर्वरित कर्ज माफ करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने केलेल्या कथित कर्जमाफीची भरपाई कोण करणार, असा सवालही पोस्टरमधून उपस्थित करण्यात आला आहे.
या दाव्यामुळे सामान्य जनता, शेतकरी आणि कर्जबाधित नागरिकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना कर्जफेडीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना मोठ्या उद्योगसमूहांच्या कर्जाबाबत असे दावे समोर येत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
मात्र, सोशल मीडियावरील या पोस्टरमधील २२ हजार कोटींचे कर्ज आणि कर्जमाफीचे दावे अधिकृत कागदपत्रे किंवा विश्वसनीय स्रोतांच्या आधारे स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी.
    user_SUBHAN FAKIR PRESS
    SUBHAN FAKIR PRESS
    Photographer हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • १५ कोटींचा खर्च, तरी जिल्हा रुग्णालयाची‘नस’ नाजूकच! आग, स्लॅब अन् ५१ टक्के रिक्त पदे; दुर्घटनांचे इशारे मिळूनही ‘सेफ्टी सिस्टम’ अपूर्णच रायगड : रायगड जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी आधारवड असलेल्या अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या १३ वर्षांत रुग्णालयावर जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असतानाही रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था आणि मनुष्यबळाची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. एकीकडे रुग्णालयाच्या विद्युत सुरक्षेचे ऑडिट झाले आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही, तर दुसरीकडे मंजूर १९४ पदांपैकी तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ‘कोट्यवधींचा खर्च, तरी सिव्हिलची नाडी कमकुवतच’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा तसेच विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे अखंड वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे विद्युत यंत्रणेची सुरक्षितता ही रुग्णालयासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, या यंत्रणेचे नियमित विद्युत ऑडिट झाले आहे का, शेवटची तपासणी कधी झाली आणि त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात आल्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्घटनांचे इशारे; तरी प्रशासन सुस्त? सिव्हिल रुग्णालयात सुरक्षेच्या प्रश्नावर यापूर्वीही धोक्याचे इशारे मिळाले आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये रुग्णालयातील अपंग विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यानंतर जून २०२६ मध्ये रुग्णालयातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली. तसेच २०२४ मध्ये अलिबाग नगरपालिकेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचाही समावेश होता. या घटनांनंतरही रुग्णालयाच्या सुरक्षेचे सर्वंकष परीक्षण झाले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः २४ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग सिव्हिलचे विद्युत ऑडिट तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. सिव्हिलमध्ये ५१ टक्के पदे रिक्त रुग्णालयाच्या सुरक्षेबरोबरच मनुष्यबळाची कमतरताही गंभीर समस्या बनली आहे. विविध संवर्गातील १९४ मंजूर पदांपैकी केवळ ९५ पदे भरलेली असून तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. म्हणजेच रुग्णालयातील सुमारे ५१ टक्के पदांवर कर्मचारीच उपलब्ध नाहीत. तज्ज्ञ डॉक्टरांची ४२ पदे मंजूर असताना केवळ १६ पदे भरलेली असून २६ पदे रिक्त आहेत. अधिपरिचारिकांच्या ९६ मंजूर पदांपैकी ५५ पदे भरलेली असून ४१ पदे रिक्त आहेत. सिस्टर ट्यूटरची १३, क्लिनिकल इन्स्ट्रक्टरची दोन, कनिष्ठ लिपिकाची चार आणि नेत्रचिकित्सा अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. मनोविकृती परिचारिका, वरिष्ठ लिपिक आणि इतर संवर्गातीलही पदे रिक्त आहेत. रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी रुग्णसेवेची गुणवत्ता, उपचारांची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसादक्षमता यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रुग्णालयावर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही सुरक्षा आणि मनुष्यबळाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. ‘सेफ्टी सिस्टम’ पूर्ण करण्याची मागणी रुग्णालयातील विद्युत, अग्निसुरक्षा आणि इमारतीची सुरक्षितता यांचे तातडीने सर्वंकष ऑडिट करून धोकादायक बाबी दूर कराव्यात. तसेच ९९ रिक्त पदे भरण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आणि पंचनामे करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे १५ कोटींच्या खर्चानंतरही सिव्हिलची ‘नाडी’ कमकुवत का राहिली, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची वेळ आली आहे. यावेळी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, नगर सेवक अनिल चोपडा, अश्विनी ठोसर, सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर, भावेश पेरेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासन यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांचे कोणतेही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते.
    4
    १५ कोटींचा खर्च, तरी जिल्हा रुग्णालयाची‘नस’ नाजूकच!

आग, स्लॅब अन् ५१ टक्के रिक्त पदे; दुर्घटनांचे इशारे मिळूनही ‘सेफ्टी सिस्टम’ अपूर्णच

रायगड : 
रायगड जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी आधारवड असलेल्या अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या १३ वर्षांत रुग्णालयावर जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असतानाही रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था आणि मनुष्यबळाची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. एकीकडे रुग्णालयाच्या विद्युत सुरक्षेचे ऑडिट झाले आहे की नाही, याबाबत स्पष्टता नाही, तर दुसरीकडे मंजूर १९४ पदांपैकी तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ‘कोट्यवधींचा खर्च, तरी सिव्हिलची नाडी कमकुवतच’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. आयसीयू, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा तसेच विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे अखंड वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे विद्युत यंत्रणेची सुरक्षितता ही रुग्णालयासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, या यंत्रणेचे नियमित विद्युत ऑडिट झाले आहे का, शेवटची तपासणी कधी झाली आणि त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यात आल्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुर्घटनांचे इशारे; तरी प्रशासन सुस्त?
सिव्हिल रुग्णालयात सुरक्षेच्या प्रश्नावर यापूर्वीही धोक्याचे इशारे मिळाले आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये रुग्णालयातील अपंग विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. त्यानंतर जून २०२६ मध्ये रुग्णालयातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली. तसेच २०२४ मध्ये अलिबाग नगरपालिकेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचाही समावेश होता.
या घटनांनंतरही रुग्णालयाच्या सुरक्षेचे सर्वंकष परीक्षण झाले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः २४ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात आग लागून तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अलिबाग सिव्हिलचे विद्युत ऑडिट तातडीने करण्यात यावे, अशी मागणी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.
सिव्हिलमध्ये ५१ टक्के पदे रिक्त
रुग्णालयाच्या सुरक्षेबरोबरच मनुष्यबळाची कमतरताही गंभीर समस्या बनली आहे. विविध संवर्गातील १९४ मंजूर पदांपैकी केवळ ९५ पदे भरलेली असून तब्बल ९९ पदे रिक्त आहेत. म्हणजेच रुग्णालयातील सुमारे ५१ टक्के पदांवर कर्मचारीच उपलब्ध नाहीत.
तज्ज्ञ डॉक्टरांची ४२ पदे मंजूर असताना केवळ १६ पदे भरलेली असून २६ पदे रिक्त आहेत. अधिपरिचारिकांच्या ९६ मंजूर पदांपैकी ५५ पदे भरलेली असून ४१ पदे रिक्त आहेत. सिस्टर ट्यूटरची १३, क्लिनिकल इन्स्ट्रक्टरची दोन, कनिष्ठ लिपिकाची चार आणि नेत्रचिकित्सा अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. मनोविकृती परिचारिका, वरिष्ठ लिपिक आणि इतर संवर्गातीलही पदे रिक्त आहेत.
रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता
मोठ्या प्रमाणातील रिक्त पदांमुळे उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी रुग्णसेवेची गुणवत्ता, उपचारांची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसादक्षमता यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रुग्णालयावर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही सुरक्षा आणि मनुष्यबळाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
‘सेफ्टी सिस्टम’ पूर्ण करण्याची मागणी
रुग्णालयातील विद्युत, अग्निसुरक्षा आणि इमारतीची सुरक्षितता यांचे तातडीने सर्वंकष ऑडिट करून धोकादायक बाबी दूर कराव्यात. तसेच ९९ रिक्त पदे भरण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
दुर्घटना घडल्यानंतर चौकशी आणि पंचनामे करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे १५ कोटींच्या खर्चानंतरही सिव्हिलची ‘नाडी’ कमकुवत का राहिली, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची वेळ आली आहे.
यावेळी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, नगर सेवक अनिल चोपडा, अश्विनी ठोसर, सामाजिक कार्यकर्ते सागर पेरेकर, भावेश पेरेकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासन यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांचे कोणतेही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते.
    user_Raigad news
    Raigad news
    अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल 53 हजार बहिणींना योजनेचा हप्ता मिळाला नसल्याची माहिती आहे. Ladki Bahin Rakshbandhan Gift Miss Update | राज्यातील 53 हजार बहिणींची ओवाळणी हुकली | Zee24Taas मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल 53 हजार बहिणींना योजनेचा हप्ता मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या काळात या महिलांची ओवाळणी हुकली आहे. या महिलांना पैसे का मिळाले नाहीत? प्रलंबित हप्ता कधी मिळणार? पाहा संपूर्ण अपडेट फक्त shuru news app
    1
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल 53 हजार बहिणींना योजनेचा हप्ता मिळाला नसल्याची माहिती आहे.
Ladki Bahin Rakshbandhan Gift Miss Update | राज्यातील 53 हजार बहिणींची ओवाळणी हुकली | Zee24Taas
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल 53 हजार बहिणींना योजनेचा हप्ता मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या काळात या महिलांची ओवाळणी हुकली आहे. या महिलांना पैसे का मिळाले नाहीत? प्रलंबित हप्ता कधी मिळणार? पाहा संपूर्ण अपडेट फक्त shuru news app
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    7 hrs ago
  • हुंडाबळीने पुन्हा पिंपरी-चिंचवड हादरलं; शिल्पाच्या मृत्यूने दोन मुलं पोरकी... पिंपरी चिंचवड : हुंडाबळीच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलंय. वैष्णवी हगवणे यांच्यानंतर आता शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने कलाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.सतरा वर्षांचा संसार, दोन मुलं आणि शिल्पाच्या मृत्यूने कुटुंबाची वाताहत झालीये. शिल्पाचा पती सचिन, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दीर संदीप यांनी हुंड्यासाठी आणि पैशांसाठी शिल्पाचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.दोन एकर जमीन, व्यवसायासाठी मदत आणि लाखो रुपयांची रोकड देऊनही छळ थांबला नाही, असा दावा शिल्पाच्या माहेरच्यांनी केलाय. शिल्पाला माहेरी परतण्याची विनंतीही कुटुंबीयांनी केली होती. मात्र संसार टिकवण्यासाठी ती सासरीच राहिली.अखेर शिल्पाचा मृत्यू झाला. हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. याप्रकरणी वाकड पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पतीसह चौघांना अटक केलीये... रतन कलाटे – शिल्पाची आई गुलाब कलाटे – शिल्पाचे वडील संतोष कलाटे – शिल्पाचे मोठे बंधू #BreakingNews #MarathiNews #MaharashtraNews #CrimeNews #TheNayakNews #PuneNews #PCMCNews #Dowry #WomenSafety #Justice
    1
    हुंडाबळीने पुन्हा पिंपरी-चिंचवड हादरलं; शिल्पाच्या मृत्यूने दोन मुलं पोरकी...
पिंपरी चिंचवड :
हुंडाबळीच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलंय. वैष्णवी हगवणे यांच्यानंतर आता शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने कलाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.सतरा वर्षांचा संसार, दोन मुलं आणि शिल्पाच्या मृत्यूने कुटुंबाची वाताहत झालीये. शिल्पाचा पती सचिन, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दीर संदीप यांनी हुंड्यासाठी आणि पैशांसाठी शिल्पाचा छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.दोन एकर जमीन, व्यवसायासाठी मदत आणि लाखो रुपयांची रोकड देऊनही छळ थांबला नाही, असा दावा शिल्पाच्या माहेरच्यांनी केलाय. शिल्पाला माहेरी परतण्याची विनंतीही कुटुंबीयांनी केली होती. मात्र संसार टिकवण्यासाठी ती सासरीच राहिली.अखेर शिल्पाचा मृत्यू झाला. हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय. याप्रकरणी वाकड पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पतीसह चौघांना अटक केलीये...
रतन कलाटे – शिल्पाची आई
गुलाब कलाटे – शिल्पाचे वडील
संतोष कलाटे – शिल्पाचे मोठे बंधू
#BreakingNews #MarathiNews #MaharashtraNews #CrimeNews #TheNayakNews #PuneNews #PCMCNews #Dowry #WomenSafety #Justice
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • वाकडमध्ये हुंडाबळीचा धक्कादायक आरोप; शिल्पा गवारे यांचं टोकाचं पाऊल, भाऊ संतोष कलाटेंचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश!
    1
    वाकडमध्ये हुंडाबळीचा धक्कादायक आरोप; शिल्पा गवारे यांचं टोकाचं पाऊल, भाऊ संतोष कलाटेंचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • निगडीत चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा मृत्यू; एकाच ठिकाणी पाच बळी..! पिंपरी चिंचवड : निगडी प्राधिकरणात चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमोल शिंदे आणि मनोज शिंदे अशी मृतांची नावे आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास लोकमान्य हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. चेंबरच्या स्वच्छतेसाठी उतरलेले दोन्ही कामगार त्यात अडकले. माहिती मिळताच अग्निशमन दलाने रेस्क्यू करून त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.विशेष म्हणजे, याच मॅनहोलमध्ये वर्षभरापूर्वी स्वच्छतेचे काम करताना बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन दुर्घटनांमध्ये आतापर्यंत पाच कामगारांचा बळी गेला आहे. वारंवार दुर्घटना होऊनही सुरक्षेच्या उपाययोजना का केल्या जात नाहीत? आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे... #निगडी #पिंपरीचिंचवड #चेंबरदुर्घटना #कामगारमृत्यू #निगडीप्राधिकरण #मॅनहोल #कामगारसुरक्षा #अग्निशमनदल #रेस्क्यूऑपरेशन #दुर्दैवीघटना #BSNLकामगार #पिंपरीचिंचवडबातम्या #पुणेबातम्या #कामगारांचासुरक्षितता #प्रशासनाचानिषेध #TheNayakNews #BreakingNews #PimpriChinchwad #Nigdi #WorkerDeath
    1
    निगडीत चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा मृत्यू; एकाच ठिकाणी पाच बळी..!
पिंपरी चिंचवड :
निगडी प्राधिकरणात चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमोल शिंदे आणि मनोज शिंदे अशी मृतांची नावे आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास लोकमान्य हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. चेंबरच्या स्वच्छतेसाठी उतरलेले दोन्ही कामगार त्यात अडकले. माहिती मिळताच अग्निशमन दलाने रेस्क्यू करून त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.विशेष म्हणजे, याच मॅनहोलमध्ये वर्षभरापूर्वी स्वच्छतेचे काम करताना बीएसएनएलच्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन दुर्घटनांमध्ये आतापर्यंत पाच कामगारांचा बळी गेला आहे.
वारंवार दुर्घटना होऊनही सुरक्षेच्या उपाययोजना का केल्या जात नाहीत? आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे...
#निगडी #पिंपरीचिंचवड #चेंबरदुर्घटना #कामगारमृत्यू #निगडीप्राधिकरण #मॅनहोल #कामगारसुरक्षा #अग्निशमनदल #रेस्क्यूऑपरेशन #दुर्दैवीघटना #BSNLकामगार #पिंपरीचिंचवडबातम्या #पुणेबातम्या #कामगारांचासुरक्षितता #प्रशासनाचानिषेध #TheNayakNews #BreakingNews #PimpriChinchwad #Nigdi #WorkerDeath
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ! आईवर हल्ला, कुशीतलं एक वर्षाचं बाळ रस्त्यावर कोसळलं; थरारक घटना CCTV मध्ये कैद
    1
    पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ! आईवर हल्ला, कुशीतलं एक वर्षाचं बाळ रस्त्यावर कोसळलं; थरारक घटना CCTV मध्ये कैद
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.