पाचोऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्त एडवेंचर पार्कतर्फे महिलांचा सत्कार पाचोऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्त एडवेंचर पार्कतर्फे महिलांचा सत्कार पाचोरा : प्रतिनिधी संदीप तांबे जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा येथील एडवेंचर पार्कच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देत गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, स्वच्छता, तसेच इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. महिलांनी समाजाच्या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्रगती साधली असून त्यांच्या कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळत असल्याचे मत यावेळी भा. ज. पा. नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी व्यक्त करण्यात आले. एडवेंचर पार्कच्या वतीने महिलांच्या सन्मानासाठी पहिल्याच वर्षी विविध उपक्रम राबविले गेला आहे. यंदाचा महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शहरातील अनेक महिला, नागरिक व आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन एडवेंचर पार्कच्या संचालक संदीप जैन,विपुल जैन,अमोल जैन यांनी केले होते.
पाचोऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्त एडवेंचर पार्कतर्फे महिलांचा सत्कार पाचोऱ्यात जागतिक महिला दिनानिमित्त एडवेंचर पार्कतर्फे महिलांचा सत्कार पाचोरा : प्रतिनिधी संदीप तांबे जागतिक महिला दिनानिमित्त पाचोरा येथील एडवेंचर पार्कच्या वतीने शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देत गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत समाजात महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, स्वच्छता, तसेच इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. महिलांनी समाजाच्या सर्वच
क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्रगती साधली असून त्यांच्या कार्यामुळे समाजाला नवी दिशा मिळत असल्याचे मत यावेळी भा. ज. पा. नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी व्यक्त करण्यात आले. एडवेंचर पार्कच्या वतीने महिलांच्या सन्मानासाठी पहिल्याच वर्षी विविध उपक्रम राबविले गेला आहे. यंदाचा महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शहरातील अनेक महिला, नागरिक व आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन एडवेंचर पार्कच्या संचालक संदीप जैन,विपुल जैन,अमोल जैन यांनी केले होते.
- Post by Kishor k Patil Patil2
- सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.1
- संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.1
- #jalna#marathinews#1
- भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत1
- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- #marathi#news#jalna#1