logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य समिती सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; ग्रामीण आरोग्य सेवेला गती देण्याचा निर्धार: *सभापती चेतनसिंह केदार-सावंत* आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य समिती सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; ग्रामीण आरोग्य सेवेला गती देण्याचा निर्धार: *सभापती चेतनसिंह केदार-सावंत* सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य समितीची सभा उत्साहात संपन्न झाली. सभेमध्ये मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी, रिक्त पदे, उपलब्ध सुविधा तसेच सेवा अधिक सक्षम करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.आषाढी वारीदरम्यान आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे सभापतींनी विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाच्या विविध योजना नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक आरोग्य उपकेंद्र नियमितपणे कार्यरत राहून नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका सभापतींसह सर्व सदस्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील प्रत्येक गर्भवती महिलेला वेळेत सोनोग्राफी सेवा मिळावी यासाठी संबंधित परिसरातील उपलब्ध सोनोग्राफी केंद्रांशी समन्वय (टाय-अप) करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना सभापतींनी दिल्या. याप्रसंगी आरोग्य समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके, जिल्हा परिषद सदस्य सविताताई कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सोनालीताई कडते, जिल्हा परिषद सदस्य करुणाताई शिवशरण, प्रशांत कडते, जनार्दन शिवशरण, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी इ आदी मान्यवर तसेच सर्व जिल्हा आरोग्य विभाग अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

1 hr ago
user_दत्तात्रय पवार
दत्तात्रय पवार
सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
607fad04-3836-4227-8a8f-0169fbe9205d

आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य समिती सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; ग्रामीण आरोग्य सेवेला गती देण्याचा निर्धार: *सभापती चेतनसिंह केदार-सावंत* आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य समिती सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; ग्रामीण आरोग्य सेवेला गती देण्याचा निर्धार: *सभापती चेतनसिंह केदार-सावंत* सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती मा. श्री. चेतनसिंह केदार-सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य समितीची सभा उत्साहात संपन्न झाली. सभेमध्ये मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी, रिक्त पदे, उपलब्ध सुविधा तसेच सेवा अधिक सक्षम करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.आषाढी वारीदरम्यान आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे सभापतींनी विशेष कौतुक केले. त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागाच्या विविध योजना नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक आरोग्य उपकेंद्र नियमितपणे कार्यरत राहून नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका सभापतींसह सर्व सदस्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील प्रत्येक गर्भवती महिलेला वेळेत सोनोग्राफी सेवा मिळावी यासाठी संबंधित परिसरातील उपलब्ध सोनोग्राफी केंद्रांशी समन्वय (टाय-अप) करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना सभापतींनी दिल्या. याप्रसंगी आरोग्य समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके, जिल्हा परिषद सदस्य सविताताई कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सोनालीताई कडते, जिल्हा परिषद सदस्य करुणाताई शिवशरण, प्रशांत कडते, जनार्दन शिवशरण, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी इ आदी मान्यवर तसेच सर्व जिल्हा आरोग्य विभाग अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 
भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, सांगोला येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद सोलापूर तथा माजी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमास मंडल अध्यक्ष विजय मगर, विजय इंगोले, विशाल बनसोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले
    1
    वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे.असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खंडागळे यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे, प्रिया खंडागळे म्हणाल्या भ्रष्टाचार, अनियमितता, नागरिकांच्या तक्रारी आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत विविध विषय मांडत असल्यामुळे मला वारंवार महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घ्यावी लागते. मात्र, अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की, प्रत्येक वेळी माझ्याशी सन्मानपूर्वक वागण्याऐवजी अपमानास्पद, अवमानकारक आणि असभ्य वर्तन करण्यात येत आहे. एक जबाबदार शासकीय अधिकारी नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागण्यास बांधील असताना, माझ्याशी करण्यात आलेली वागणूक ही शासकीय सेवेतील आचारसंहितेला व लोकाभिमुख प्रशासनाच्या तत्त्वांना धरून नाही.
    1
    नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे
नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे.असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खंडागळे यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे, प्रिया खंडागळे म्हणाल्या भ्रष्टाचार, अनियमितता, नागरिकांच्या तक्रारी आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत विविध विषय मांडत असल्यामुळे मला वारंवार महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घ्यावी लागते.
मात्र, अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की, प्रत्येक वेळी माझ्याशी सन्मानपूर्वक वागण्याऐवजी अपमानास्पद, अवमानकारक आणि असभ्य वर्तन करण्यात येत आहे. एक जबाबदार शासकीय अधिकारी नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागण्यास बांधील असताना, माझ्याशी करण्यात आलेली वागणूक ही शासकीय सेवेतील आचारसंहितेला व लोकाभिमुख प्रशासनाच्या तत्त्वांना धरून नाही.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    1
    मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार!
परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • कर्जमाफी प्रोसेस वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
    1
    कर्जमाफी प्रोसेस वर्षभर सुरू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • प्रभाग १२ मध्ये जुनी भाजी मंडई परिसरात मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य प्रभाग १२ मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप आण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार लोणंद : प्रभाग क्रमांक १२ मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली. मात्र, संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, "मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत. आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी." नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.
    1
    प्रभाग १२ मध्ये जुनी भाजी मंडई परिसरात मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य
प्रभाग १२ मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप
आण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार
लोणंद : प्रभाग क्रमांक १२ मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली. मात्र, संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला.
यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, "मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत. आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी."
नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले. हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली
    1
    कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले.
हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली.
दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • वसई विरार महानगरपालिका आयुक्ताच्या मौन भूमीकीमुळे अतिक्रमणला आला हुत वसई-विरार महानगरपालिका : आयुक्तांच्या मौन भूमिकेमुळे 'त्रिमूर्ती' दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत यांचे प्रभाग 'जी' मध्ये वर्चस्व? अनधिकृत बांधकामांना पुन्हा ऊत, असा आरोप वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 'जी' मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांकडून सातत्याने केला जात आहे. अनेक तक्रारी, पुरावे आणि वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.तक्रारदारांचा आरोप आहे की अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत* यांच्या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे भूमाफियांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासनाचे मौन हे केवळ विलंबामुळे आहे की अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईबाबत ठोस निर्णयाचा अभाव आहे?जर कायद्याचे राज्य टिकवायचे असेल, तर कोणताही दबाव, प्रभाव किंवा हस्तक्षेप न मानता अनधिकृत बांधकामांवर तातडीने आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.
    1
    वसई विरार महानगरपालिका आयुक्ताच्या मौन भूमीकीमुळे अतिक्रमणला आला हुत
वसई-विरार महानगरपालिका : आयुक्तांच्या मौन भूमिकेमुळे 'त्रिमूर्ती' दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत यांचे प्रभाग 'जी' मध्ये वर्चस्व? अनधिकृत बांधकामांना पुन्हा ऊत, असा आरोप
वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 'जी' मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांकडून सातत्याने केला जात आहे. अनेक तक्रारी, पुरावे आणि वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.तक्रारदारांचा आरोप आहे की अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत* यांच्या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे भूमाफियांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेले नाही.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासनाचे मौन हे केवळ विलंबामुळे आहे की अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईबाबत ठोस निर्णयाचा अभाव आहे?जर कायद्याचे राज्य टिकवायचे असेल, तर कोणताही दबाव, प्रभाव किंवा हस्तक्षेप न मानता अनधिकृत बांधकामांवर तातडीने आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.