Shuru
Apke Nagar Ki App…
सटाणा (ताहाराबाद) नाशिकमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि गारपीट नाशिकच्या सटाण्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस ताहाराबाद परिसरात विजांचा कडकडाट; गारपीट आणि मुसळधार पाऊस
🏛️ सत्यमेव जयते 🏛️
सटाणा (ताहाराबाद) नाशिकमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि गारपीट नाशिकच्या सटाण्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस ताहाराबाद परिसरात विजांचा कडकडाट; गारपीट आणि मुसळधार पाऊस
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नागरिकांच्या सुरक्षेच्या दुर्ष्टीने येवला-मनमाड -मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक २४ मार्च २०२६ पासून केवळ रात्री १० ते सकाळी ७ या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाच्या वेळी या मार्गावरून होणारी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे येवला आणि मनमाड या शहरांतील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आहे.1
- रोकडे ग्रामपंचायत तर ही सार्वजनिक शौचालय बांधून ठेवली आहे पण ही कधीही साफ सफाई ठेवत का नाही अशी आमची ग्रामपंचायत आहे ही सार्वजनिक शौचालय साफ सूत्र ठेवावे1
- धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक भरघोस आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 18 ते 19 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. मात्र, चांगले उत्पादन असूनही बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने खंत व्यक्त करत सांगितले की, एक लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या गव्हाला तो भावही मिळत नाही.1
- Post by Rajubhau Pradhan1
- पत्रकार :- सुशील नावकर रामनगर व विठ्ठल नगर तसेच प्रकाश नगर मेन रोड वरील महानगरपालिकेने अवैध्य बांधलेले दुकानाच्या समोरचे एक्स्ट्राचे बांधकाम व पत्रे टाकलेले तसेच दुकान लावलेले व भाजीपाल्याच्या गाड्या लावण्यास मनाई केली कारण वाहतूक कोंडीचा प्रश्न असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत नगरसेवका कडे मागणी करण्यात आले उपस्थित दीपक खोतकर व त्यांचे सहकार्य व रहिवासी महानगरपालिकेला सपोर्ट करत मदत करण्यात आली1
- नाशिकमधील द्वारका परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. कामादरम्यान जमिनीखाली सुमारे १२५ वर्षे जुनी विहीर सापडली. ही घटना केवळ एक ऐतिहासिक अवशेष सापडण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्याला विकास आणि निसर्ग यांच्यातील झालेला असमतोलाचा गंभीरपणे विचार करायला भाग पाडते. पूर्वीच्या काळात गावांची रचना करताना पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांना अत्यंत महत्त्व दिले जात असे. विहिरी, ओढे, तलाव आणि पाणवठे हे गावाच्या जीवनाचे केंद्र होते. लोक त्या जलस्रोतांचे जतन करत आणि त्याभोवतीच वस्ती विकसित होत असे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न तुलनेने कमी जाणवत असे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली अनेक जुने जलमार्ग, विहिरी आणि तलाव बुजवले गेले. त्यावर रस्ते, बिल्डिंग आणि इतर बांधकामे उभी राहिली. परिणामी, नैसर्गिक जलसंचयाची व्यवस्था बिघडली आणि अनेक शहरांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली. द्वारका येथे सापडलेली ही विहीर आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते — निसर्गाने दिलेले जलस्रोत नष्ट करून विकास करणे ही दीर्घकालीन उपाययोजना नाही. शाश्वत विकासासाठी जुन्या जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि त्यांना पुन्हा जिवंत करणे अत्यावश्यक आहे. आज गरज आहे ती विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखण्याची. रस्ते, बिल्डिंग आणि आधुनिक सुविधा महत्त्वाच्या आहेतच, पण त्याचबरोबर नैसर्गिक जलस्रोत जपणे आणि पुनरुज्जीवन करणे हीही तितकीच मोठी जबाबदारी आहे. द्वारका येथील १२५ वर्षे जुनी विहीर केवळ भूतकाळाची आठवण नाही, तर भविष्यासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे - जर आपण आजही निसर्गाचा विचार केला नाही, तर उद्या पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. 💧🌱1
- प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेअंतर्गत निविदा प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे ठरवली जाते, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. निविदा निश्चित करताना अन्नपदार्थांचे बाजारभाव व बाजार समितीतील दरांचा विचार केला जातो. तसेच अन्नपदार्थांचे नमुने स्थानिक प्रयोगशाळेत तपासून गुणवत्ता निश्चित केल्यानंतरच अंतिम मंजुरी दिली जाते. या प्रक्रियेमुळे पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1