मजुरांकडून टोपल्या-फावड्याने काम; छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह ?? छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम सिल्लोड तालुक्यातील भवन येथे काही काळापासून रखडले होते. मात्र मागील आठवडाभरापासून या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी कामाच्या पद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गाचे काम आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने करण्याऐवजी मजूर टोपल्या व फावड्याच्या सहाय्याने माती टाकून काम करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री वापरण्याची गरज असताना पारंपरिक पद्धतीने काम सुरू असल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, महामार्गासारख्या महत्त्वाच्या रस्त्याचे काम आधुनिक तंत्रज्ञान व मशिनद्वारे केल्यास रस्ता अधिक टिकाऊ राहतो. मात्र सध्या सुरू असलेल्या कामामुळे भविष्यात रस्त्याची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने कामाची गुणवत्ता तपासून योग्य पद्धतीने काम करण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांकडून केली जात आहे.

- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- #jalna#marathinews#1
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1