संथ गतीने रस्त्याचे काम; खड्ड्यांमुळे अपघातात वाढ, नागरिक संतप्त मानवत (प्रतिनिधी):- मानवत ते पाळोदी मार्गावरील रस्ता विकास कामे संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानक ते रोडे कॉलनी दरम्यानचे काम मागील सहा महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असून, यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मार्चअखेरमुळे काही काळ काम ठप्प झाले असले तरी एप्रिल महिन्यातही कामाचा वेग वाढलेला दिसत नाही. उन्हाचा पारा चढत असतानाही संबंधित विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावर खोदकाम करून सोडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी मोटारसायकली घसरून महिला व प्रवासी जखमी झाले असून काहींना हात-पाय फ्रॅक्चर झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, आज पुन्हा एक चारचाकी वाहन खड्ड्यात जाऊन अपघातग्रस्त झाले. सुदैवाने चालकाचा जीव वाचला. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने धाव घेत चालकाला बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ग्रामीण भागातून मानवत शहरात येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून अनेक गावांचा संपर्क याच रस्त्याने आहे. तरीही काम अर्धवट ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. संबंधित कंत्राटदार व प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन काम पूर्ण करावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Anil Rathod1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2