जटवाडा रोडवर भीषण आग; चाऱ्याने भरलेला ट्रक पेटला, मलिक भाईंच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला जटवाडा रोडवर भीषण आग; चाऱ्याने भरलेला ट्रक पेटला, मलिक भाईंच्या धाडसाने मोठा अनर्थ टळला छत्रपती संभाजीनगर : सईदा कॉलनी परिसरातील जटवाडा रोडवर हरने पेट्रोल पंपाजवळ आज चाऱ्याने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. ट्रकमध्ये जनावरांचा चारा (भुसा/गवत) मोठ्या प्रमाणात असल्याने आग काही क्षणांतच भडकली आणि परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. या घटनेत स्थानिक रहिवासी मलिक भाई यांनी धाडस दाखवत तात्काळ प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे पेट्रोल पंप अगदी जवळ असतानाही मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.

- Asaduddin Owaisi chai kis ke saath peene wale hain? ☕🤔1
- बदनापूर शहरातला कॅनरा बँकेमध्ये चक्क अधिकारीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारतानाचा नवा सीसीटीव्ही समोर #viralreelschallenge #jalnakar_mh21 #JalnaNews #jalnakar #जालना #CMO #संभाजीनगर #jalna #sambhajinagar1
- *होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍**होय... माजी विद्यार्थ्याने बांधली👆ZP ची अतिशय👌 सुंदर शाळा 👍*1
- भोकरदन:कोठा जहागीर गावकऱ्यांच्या संघर्षाला यश! 🚰 आमदार संतोष दानवे यांच्या पुढाकाराने मिटला पाणी प्रश्न; गावात आता नियमित येणार अधिकृत पाण्याचे टँकर.1
- बुलढाणा येथील स्थानिक जयस्तंभ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी एकत्र येऊन आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला. गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांना होत असलेल्या विरोधाला प्रत्युत्तर म्हणून हे समर्थन देण्यात आले.आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या वक्तव्यावर आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतरही राज्यातील अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले आणि त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले. या 'गलीच्छ' शब्दांचा वापर करणाऱ्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.समर्थकांनी सांगितले की, बुलढाणा शहरात पहिली शिवजयंती साजरी करण्याचे श्रेय आमदार संजय गायकवाड यांना जाते. तसेच त्यांनी भारतातले पहिले शिवाजी महाराजांचे मंदिर बुलढाण्यात उभारले आणि संभाजी महाराजांचा पुतळाही बसवला. सर्व जाती-धर्माच्या महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे काम त्यांनी केल्याचे समर्थकांनी नमूद केले.एका पुस्तकाच्या संदर्भात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे आमदारांनी संताप व्यक्त केला होता. "माझ्या महाराजांचा उच्चार एकेरी करू नका, तर 'छत्रपती' असा सन्मानाने करा," असे त्यांनी सुनावले होते. या दरम्यान त्यांच्याकडून अनावधानाने काही अपशब्द निघाले, ज्याबद्दल त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी माफी मागितली होतीत्यांना उत्तर देण्यासाठी आणि आमदारांप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी हा दुग्धाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.1
- ye bhusawal NH 53 ka haal hai lekin koi dhyaan dene ko tayyar nahi NH53 maintanence manager Ankit dube is not doing anything loog pareshan hai8
- एका ठिणगीने उध्वस्त आयुष्य; मलकापूरमध्ये आगीत महिलेचा संसार खाक, कुटुंब उघड्यावर मलकापूर : शहरातील झोपडपट्टी भागात लागलेल्या भीषण आगीत एका गरीब महिलेचा संसार पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी आणि महत्त्वाची कागदपत्रेही नष्ट झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आग अचानक लागली असून शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र संबंधित महिला आणि तिच्या दोन लहान मुलींचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर अक्षरशः उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून मदतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.1
- Post by Haq Ki Baat1
- आ.संतोष पाटील दानवे यांच्या पुढाकारातून भोकरदन तालुक्यातील कोठा. जहाँ.पाण्याच्या टँकरला मंजुरी,गावाकऱ्यांनी आ.दानवेंचे आभार मानले आहे.1