logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकेकाळी प्रचंड दबदबा असणारे तथाकथित पहिले डॉन बाबा फर्जन यांच्या मृत्यूनंतर अवघ्या महिनाभरातच त्यांच्या मिटमिटा परिसरातील बंगल्यावर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने टाकलेल्या या छाप्यात पोलिसांना ५ कोटी २६ लाख २९ हजारांची रोकड, २ पिस्तूल, ६ रायफल, ६ हजार ३५० काडतुसे आणि मोठ्या प्रमाणात तलवारी, चाकू व सुरे यांसारखी शस्त्रे जप्त करण्यात यश आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले असून, पोलिसांकडून अद्याप याबाबतचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. या मोठ्या छाप्यामुळे १९८० ते १९९० च्या दशकात शहरातील गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात वर्चस्व गाजवणारे बाबा फर्जन पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहेत. सिटी चौक परिसरातील बुढीलेन भागातून आपल्या गुन्हेगारी प्रवासाला सुरुवात करणाऱ्या बाबा फर्जन यांनी किल्ले अर्क परिसरातील बर्फ कारखाना, जमिनीचे व्यवहार, औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटना आणि विविध आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून शहरात स्वतःचा मोठा प्रभाव निर्माण केला होता. पांढरा पोशाख, काळी दाढी, अंगरक्षकांचा ताफा आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरणाऱ्या बाबा फर्जन यांच्या दरबारात अनेक सामान्य नागरिक आपल्या तक्रारी घेऊन जात असत. तसेच अनेक व्यापारी, उद्योजक, राजकीय आणि कामगार नेतेही त्यांच्या संपर्कात असायचे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून 'हरण' या निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणूकही लढवली होती आणि विविध सामाजिक, धार्मिक तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी त्यांचे संबंध असल्याचे त्या काळात बोलले जात होते. सन १९९५ नंतर बाबा फर्जन यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले आणि त्यानंतर त्यांचा पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास सुरू राहिला. वाढत्या वयानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनापासून स्वतःला काहीसे दूर केले होते. आता त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या या मोठ्या पोलीस कारवाईमुळे त्यांच्या जुन्या व्यवहारांबद्दल आणि काही गाजलेल्या प्रकरणांबबत नवीन माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांचा गुन्हेगारी इतिहास पुन्हा एकदा समोर येणार आहे.

1 hr ago
user_AKBAR SHAHA REPORTER
AKBAR SHAHA REPORTER
Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
1 hr ago
7711add5-701b-457d-ba01-504d89a21c72

छत्रपती संभाजीनगरमध्ये एकेकाळी प्रचंड दबदबा असणारे तथाकथित पहिले डॉन बाबा फर्जन यांच्या मृत्यूनंतर अवघ्या महिनाभरातच त्यांच्या मिटमिटा परिसरातील बंगल्यावर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने टाकलेल्या या छाप्यात पोलिसांना ५ कोटी २६ लाख २९ हजारांची रोकड, २ पिस्तूल, ६ रायफल, ६ हजार ३५० काडतुसे आणि मोठ्या प्रमाणात तलवारी, चाकू व सुरे यांसारखी शस्त्रे जप्त करण्यात यश आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत सोन्या-चांदीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले असून, पोलिसांकडून अद्याप याबाबतचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. या मोठ्या छाप्यामुळे १९८० ते १९९० च्या दशकात शहरातील गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात वर्चस्व गाजवणारे बाबा फर्जन पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहेत. सिटी चौक परिसरातील बुढीलेन भागातून आपल्या गुन्हेगारी प्रवासाला सुरुवात करणाऱ्या बाबा फर्जन यांनी किल्ले अर्क परिसरातील बर्फ कारखाना, जमिनीचे व्यवहार, औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटना आणि विविध

8241c7ee-0502-4837-8b95-fe83f6bdc496

आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून शहरात स्वतःचा मोठा प्रभाव निर्माण केला होता. पांढरा पोशाख, काळी दाढी, अंगरक्षकांचा ताफा आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरणाऱ्या बाबा फर्जन यांच्या दरबारात अनेक सामान्य नागरिक आपल्या तक्रारी घेऊन जात असत. तसेच अनेक व्यापारी, उद्योजक, राजकीय आणि कामगार नेतेही त्यांच्या संपर्कात असायचे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून 'हरण' या निवडणूक चिन्हावर विधानसभा निवडणूकही लढवली होती आणि विविध सामाजिक, धार्मिक तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी त्यांचे संबंध असल्याचे त्या काळात बोलले जात होते. सन १९९५ नंतर बाबा फर्जन यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले आणि त्यानंतर त्यांचा पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास सुरू राहिला. वाढत्या वयानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनापासून स्वतःला काहीसे दूर केले होते. आता त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या या मोठ्या पोलीस कारवाईमुळे त्यांच्या जुन्या व्यवहारांबद्दल आणि काही गाजलेल्या प्रकरणांबबत नवीन माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांचा गुन्हेगारी इतिहास पुन्हा एकदा समोर येणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • औरंगाबादमध्ये एमआयएमचे (AIMIM) शहर अध्यक्ष नासेर सिद्दीकी यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
    1
    औरंगाबादमध्ये एमआयएमचे (AIMIM) शहर अध्यक्ष नासेर सिद्दीकी यांचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
    user_ARK NEWS 20
    ARK NEWS 20
    Voice of people औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
    2
    नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले.

स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
    user_Amol kolte press reporter phul
    Amol kolte press reporter phul
    फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.
    1
    छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये एका डॉनच्या घरात प्रचंड मोठी रक्कम सापडली आहे. या घरात मिळालेली रक्कम एवढी अफाट आहे की पोलिसांना ती मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले. पोलीस ५ मशीनच्या साहाय्याने या सापडलेल्या रकमेची मोजणी करत होते.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सध्या अवैध वृक्षतोड जोरात सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर-जळगाव महामार्गावरील वड आणि लिंबांच्या झाडांची सर्रास तोड सुरू असून याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आधीच माहिती देण्यात आली आहे, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. वन विभागाच्या या निष्क्रीयतेमुळे सिल्लोड तालुक्यातील भवन येथे वृक्षतोड जोमात आणि वन विभाग कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सध्या अवैध वृक्षतोड जोरात सुरू आहे. छत्रपती संभाजी नगर-जळगाव महामार्गावरील वड आणि लिंबांच्या झाडांची सर्रास तोड सुरू असून याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आधीच माहिती देण्यात आली आहे, तरीही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. वन विभागाच्या या निष्क्रीयतेमुळे सिल्लोड तालुक्यातील भवन येथे वृक्षतोड जोमात आणि वन विभाग कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • औरंगाबादमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यपद्धती आणि विकासकामांबाबत विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसून, तो केवळ काही मोजक्याच व्यक्तींना मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विविध कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, विरोधकांकडून झालेल्या या आरोपांवर आमदार अब्दुल सत्तार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही।
    1
    औरंगाबादमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यपद्धती आणि विकासकामांबाबत विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसून, तो केवळ काही मोजक्याच व्यक्तींना मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध नोंदविला.

या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विविध कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, विरोधकांकडून झालेल्या या आरोपांवर आमदार अब्दुल सत्तार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही।
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतातून डाळिंब चोरी केल्याच्या संशयावरून एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
    1
    पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतातून डाळिंब चोरी केल्याच्या संशयावरून एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.