logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर-तावशी रस्ता धोकादायक अवस्थेत; नागरिकांचा संतप्त सवाल — “आमच्यावरच दुर्लक्ष का?” पुणे प्रतिनिधी:- इंदापूर तालुक्यातील भवानीनगर-तावशी हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता आज अत्यंत खराब अवस्थेत असून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तावशी, सपकळवाडी, उदामाईवाडी, उद्धट, कुरवली, आसू, पवारवाडी, सोनगाव आणि ढेकळवाडी या गावांतील शेकडो नागरिक दररोज कामानिमित्त, शाळा-कॉलेज, शेती तसेच दैनंदिन प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करत आहेत. हा रस्ता इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवरील महत्त्वाचा दुवा मानला जात असला तरी त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. विशेषतः या मार्गावर मुरूम व खडी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने रस्त्याची झपाट्याने वाताहत होत आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखाना सुरू असताना या मार्गावरून पायी चालणेही जीवावर बेतण्यासारखे ठरत आहे. शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. रस्त्याची क्षमता कमी असताना मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे इंदापूर तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या घोषणा होत असताना या महत्त्वाच्या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्र होत आहे. “आम्हीही याच तालुक्याचा भाग आहोत, मग आमच्यावरच दुर्लक्ष का केले जाते? कोणत्या आकसापोटी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला जात नाही?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. काही वर्षांपूर्वी करण्यात आलेले काम पहिल्याच पावसात उखडल्याने कामाच्या गुणवत्तेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. संबंधित विभाग, ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशी करून दोषींवर कारवाई करणे अपेक्षित होते व आहे.या आशयाची तक्रार ही केली होती पण कारवाई झाली नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे भवानीनगर-तावशी रस्त्याचा प्रश्न केवळ राजकीय आश्वासनांपुरता मर्यादित न ठेवता तातडीने निधी मंजूर करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

1 hr ago
user_Mahesh Dnyandev Zende
Mahesh Dnyandev Zende
Local News Reporter इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago
d83ca5e0-9dca-4049-b967-fd81edfd6965

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें', #pmmodi #devendrafadnavis #maharashtra #primenews83 #breakingnews #hindinews प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें',
    1
    प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया।
'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें', 
#pmmodi 
#devendrafadnavis 
#maharashtra 
#primenews83 
#breakingnews 
#hindinews 
प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया।
'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें',
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • युवा नेते जय पवार यांनी घेतला जनता दरबार जनसेवेची परंपरा कायम
    1
    युवा नेते जय पवार यांनी घेतला जनता दरबार जनसेवेची परंपरा कायम
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 min ago
  • रवींद्र दामोदरे यांनी कर्जत येथील श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव राखून लोकशाही मार्गाने स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ट्रस्टचा कारभार पारदर्शक व सर्वांसाठी स्वीकारार्ह असावा. या मागणीने आता ट्रस्टच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष वेधले आहे.
    1
    रवींद्र दामोदरे यांनी कर्जत येथील श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव राखून लोकशाही मार्गाने स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ट्रस्टचा कारभार पारदर्शक व सर्वांसाठी स्वीकारार्ह असावा. या मागणीने आता ट्रस्टच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष वेधले आहे.
    user_Rushikesh pawar
    Rushikesh pawar
    Local News Reporter कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • अहिल्यानगर शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 'ब्लॉकस्पॉट पेट्रोलिंग' मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर किंवा नशा करून त्रास देणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. यामुळे शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यास मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
    1
    अहिल्यानगर शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी 'ब्लॉकस्पॉट पेट्रोलिंग' मोहीम सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर किंवा नशा करून त्रास देणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. यामुळे शहरात शांतता व सुरक्षितता राखण्यास मदत होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त "यशवंत फेस्टिवल 2026" 14,15,16,17 मे गुंडादाजी लॉन कराड पलूस रोड, पलूस या ठिकाणी आयोजित केले आहे. आयोजक - पप्रदीप ( अप्पा ) कदम
    1
    छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त "यशवंत फेस्टिवल 2026" 14,15,16,17 मे गुंडादाजी लॉन कराड पलूस रोड, पलूस या ठिकाणी आयोजित केले आहे. आयोजक - पप्रदीप ( अप्पा ) कदम
    user_Akash mane
    Akash mane
    Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    32 min ago
  • महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
    1
    महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, ज्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पाणी, लाईट आणि स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे मृताच्या नातेवाईकांना 'नरकयातना' भोगाव्या लागत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.
    1
    सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.
    user_Feroj Hungund
    Feroj Hungund
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.