राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता. पाच दिवसांत 40 लाखांहून अधिक विक्री.बुलढाणा येथे आयोजित राजमाता महोत्सव 2026 ची दि. 9 मार्च रोजी उत्साहात सांगता झाली. बुलढाणा येथे आयोजित राजमाता महोत्सव 2026 ची दि. 9 मार्च रोजी उत्साहात सांगता झाली. दि. 5 ते 9 मार्च दरम्यान जिजामाता प्रेक्षागार, क्रीडा व व्यापारी संकुल येथे पार पडलेल्या या महोत्सवाला शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या स्टॉल्स तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पाच दिवसांत महिला बचत गटांच्या उत्पादनांमधून व फूड स्टॉल्समधून सुमारे 40 लाख 12 हजार रुपयांची विक्री नोंदविण्यात आली. समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे (धुळे) तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रांत जाधव उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट 10 उत्पादन गटांचा सन्मान करण्यात आला. 🏆 प्रथम – सातपुडा उत्पादक समूह, सोनाळा (ता. संग्रामपूर) – पेटीकोट उत्पादन 🥈 द्वितीय – समृद्धी महिला समूह, वडाळी (ता. नांदुरा) – बॉलपेन व घासणी उत्पादन 🥉 तृतीय – सावित्रीबाई फुले समूह, वरखेड (ता. मलकापूर) – पापड व चिप्स उत्पादन हा महोत्सव महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत त्यांच्या उद्योजकतेला नवी चालना देणारा ठरला.

- स्टंटबाजी बेतली जीवावर: सापाच्या दंशाने ख्यातनाम सर्पमित्राचा खामगावात दुर्दैवी मृत्यू.1
- या प्रकरणी कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकाबाबत लेखी तक्रार दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बातमी : मिळालेल्या माहितीनुसार, जनुना येथील रहिवासी मंगेश प्रकाश कांबळे यांना ९ मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तक्रारीनुसार, डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रुग्णाला अकोला येथे नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र त्या वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णवाहिका बोलावण्यात आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णवाहिका चालकाने अकोला येथे नेण्यासाठी पैशांची मागणी केली. नातेवाईकांनी काही रक्कम तातडीने देऊन उर्वरित रक्कम अकोला येथे देण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र पैसे तात्काळ न मिळाल्याने रुग्णवाहिका पुन्हा खामगाव येथील रुग्णालयात परत आणण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर सुमारे एका तासाने मंगेश कांबळे यांचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, मयताचे भाऊ सुनील कांबळे यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करत खामगाव शहर पोलीस ठाणे आणि सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली आहे.1
- खामगाव : पोलीस स्टेशनमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिला आणि त्यांच्या लहान मुलांच्या सोयीसाठी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये 'हिरकणी कक्ष' सुरू करण्यात आला आहे. या अद्ययावत कक्षाचे रीतसर उद्घाटन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या मातांना आता सुरक्षित आणि हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. महिलांच्या समस्यांचे निराकरण करताना त्यांना सन्मानजनक वातावरण मिळावे, या उद्देशाने या 'हिरकणी कक्षा'ची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षाची रचना करताना विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये मातांना विश्रांती घेण्यासाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली असून, सोबत येणाऱ्या लहान मुलांचे मन रमावे यासाठी विविध प्रकारची शैक्षणिक खेळणी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शहर पोलीस स्टेशनच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे नियंत्रण आणि जनसेवेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्यासह शहरातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.1
- #jalna#marathinews#1
- कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- सरपंच पतीवर महिलेचा विनयभंगाचा आरोप बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचे आमरण उपोषण**1