Shuru
Apke Nagar Ki App…
Saudagar Gaikwad
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Saudagar Gaikwad1
- मोहोळ :- तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा. व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन १९८० पासून राबविण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय, दिनांक २० ऑगस्ट २०१९ अन्वये विशेष सहाय्य योजनेतील लाभाथ्र्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी ३ महिन्याच्या आत संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय, दिनांक १५ सप्टेंबर २०२५ अन्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये १५०० वरुन २५०० इतके करण्यात आले आहे. व लाभाथ्र्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलव्दारे थेट लाभाय्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येत आहे. दिव्यांग कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक २७ जून, २०२४ अन्वये शासनाकडून राबविण्यात येणान्या दिव्यांगासाठीच्या विविध योजना / सवलती इत्यादीचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगासाठी वैश्विक ओळखपत्र UDID Card अनिवार्य करण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २४.०२.२०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व योजनेतील दिव्यांग लाभाथ्र्यांसाठी योजना दिनांक ०१.०४.२०२६ पासून दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येईल. तरी सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी आपले वैश्विक ओळखपत्र UDID Card आणि आधार कार्ड दिनांक ३१.०३.२०२६ पूर्वी संलग्न करण्यासाठी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे / तहसिल कार्यालय मोहोळ येथे आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ भेट दयावी. तहसील कार्यालयात हे कागदपत्र सादर करा. 1) आधार कार्ड 2)दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) 3) बँकेचे पासबुक 4) रेशनकार्ड व मोबाईल क्रमांक. या कागदपत्रांची मूळ प्रत व छायांकित प्रत सोबत घेवून यावे.1
- आंतरराज्य सीमेवर असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट तालुक्यात BSNL ची कनेक्टिव्हिटी पूर्णपणे ठप्प झाल्याचा गंभीर मुद्दा खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेत उपस्थित केला. गेल्या एका वर्षापासून BSNL अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नवीन टॉवर उभारण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची कबुली संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना मोबाईल व इंटरनेट सेवांपासून वंचित राहावे लागत असल्याचेही त्यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले. देशात एकीकडे 5G सेवांचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला जात असताना ग्रामीण व सीमावर्ती भागात मूलभूत नेटवर्क सुविधांचाही अभाव असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली. BSNL च्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी व इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी आवश्यक निधी न दिल्यामुळे ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हळूहळू खाजगीकरणाच्या दिशेने ढकलली जात असल्याचा आरोपही खासदार शिंदे यांनी केला. “BSNL ची सध्याची यंत्रणा कार्यक्षम नसताना ती बदलण्यासाठी आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी केंद्र सरकार नेमकी कोणती ठोस पावले उचलणार?” असा थेट सवाल त्यांनी संसदेत उपस्थित केला. अक्कलकोटसारख्या सीमावर्ती भागातील नागरिकांना तातडीने दर्जेदार दूरसंचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. यावर उत्तर देताना केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी BSNL च्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा सुरू असून, 4G सेवा अधिक सक्षम केल्यानंतर लवकरच 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.1
- Post by M G1
- Post by Solapur News1
- Post by GOSAVI. v. j.1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1
- अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु येथे अवकाळी पावसास सुरुवात सांगवी बु येथे तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.1