सात महिन्यांतच रस्ता गेला खड्ड्यात! प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचा बोजवारा; दांडीची बारी–जाहुले मार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’ सात महिन्यांतच रस्ता गेला खड्ड्यात! प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचा बोजवारा; दांडीची बारी–जाहुले मार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’ प्रतिनिधी बोरगाव कोट्यवधींचा निधी खर्च करून रस्ता बांधायचा आणि सात महिन्यांतच तो उखडून खड्ड्यात घालायचा, याला विकास म्हणायचा तरी कसा? असा संतप्त सवाल दांडीची बारी (ठणकाची बारी) ते जाहुले या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पेठ आणि सुरगाणा तालुक्याला जोडणारा सुमारे आठ ते नऊ किलोमीटरचा हा महत्त्वाचा रस्ता अवघ्या सात महिन्यांतच अक्षरशः उखडून गेला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने काही खड्ड्यांना चक्क तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड मालवाहू वाहनांची वाहतूकही नसताना रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ‘रस्ता बांधला की निधीचा बंदोबस्त केला?’ अशी संतप्त चर्चा परिसरात सुरू आहे. आदिवासी भाग म्हणून दर्जाहीन कामाचा परवाना मिळतो का? आदिवासीबहुल, डोंगराळ आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या जीविताशी असा खेळ का केला जात आहे? आदिवासी भागातील रस्त्यांचा दर्जा तपासणारे अधिकारी नेमके करतात तरी काय? काम पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासणी झाली होती का? झाली असेल तर सात महिन्यांत रस्ता उखडला कसा? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, गर्भवती महिला तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. ठेकेदाराला पाठीशी कोण घालतंय? रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असताना संबंधित ठेकेदारावर कारवाई का होत नाही? कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित का केली जात नाही? ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेच्या संगनमतामुळेच जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी होत आहे का? याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. मंत्र्यांनी फक्त दौरा न करता रस्ताही पाहावा! दरम्यान, १६ व १७ सप्टेंबर रोजी आदिवासी विकास मंत्री सुरगाणा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात केवळ शासकीय योजनांची पाहणी आणि बैठका न घेता त्यांनी दांडीची बारी–जाहुले या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्याकडूनच रस्त्याची दर्जेदार फेरदुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जनतेच्या पैशातून रस्ता बांधायचा आणि सात महिन्यांतच जनतेला खड्ड्यांतून प्रवास करायला लावायचा, हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही. तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. चौकट : रस्ता वर्षभरातच खड्ड्यात; ठेकेदाराला काळ्या यादीत टाका! दांडीचीबारी ते जाहुले रस्ता गेल्या वर्षीच झाला; मात्र आजची अवस्था पाहता हा रस्ता दहा वर्षांपूर्वीचा असल्याचा भास होतो. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून मनाला चीड येते. नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांचा असा बोजवारा उडत असेल, तर जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. संबंधित कामाची तातडीने चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे आणि भविष्यात त्याला कोणतेही शासकीय काम देऊ नये, अशी मागणी उपसरपंच जयराम भोये (मनखेड) यांनी केली आहे.
सात महिन्यांतच रस्ता गेला खड्ड्यात! प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचा बोजवारा; दांडीची बारी–जाहुले मार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’ सात महिन्यांतच रस्ता गेला खड्ड्यात! प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचा बोजवारा; दांडीची बारी–जाहुले मार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’ प्रतिनिधी बोरगाव कोट्यवधींचा निधी खर्च करून रस्ता बांधायचा आणि सात महिन्यांतच तो उखडून खड्ड्यात घालायचा, याला विकास म्हणायचा तरी कसा? असा संतप्त सवाल दांडीची बारी (ठणकाची बारी) ते जाहुले या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याच्या दुरवस्थेने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पेठ आणि सुरगाणा तालुक्याला जोडणारा सुमारे आठ ते नऊ किलोमीटरचा हा महत्त्वाचा रस्ता अवघ्या सात महिन्यांतच अक्षरशः उखडून गेला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने काही खड्ड्यांना चक्क तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड मालवाहू वाहनांची वाहतूकही नसताना रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ‘रस्ता बांधला की निधीचा बंदोबस्त केला?’ अशी संतप्त चर्चा परिसरात सुरू आहे. आदिवासी भाग म्हणून दर्जाहीन कामाचा परवाना मिळतो का? आदिवासीबहुल, डोंगराळ आणि
दुर्गम भागातील नागरिकांच्या जीविताशी असा खेळ का केला जात आहे? आदिवासी भागातील रस्त्यांचा दर्जा तपासणारे अधिकारी नेमके करतात तरी काय? काम पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता तपासणी झाली होती का? झाली असेल तर सात महिन्यांत रस्ता उखडला कसा? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, गर्भवती महिला तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. ठेकेदाराला पाठीशी कोण घालतंय? रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असताना संबंधित ठेकेदारावर कारवाई का होत नाही? कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित का केली जात नाही? ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेच्या संगनमतामुळेच जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी होत आहे का? याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. मंत्र्यांनी फक्त दौरा न करता रस्ताही पाहावा! दरम्यान, १६ व १७ सप्टेंबर रोजी आदिवासी विकास मंत्री सुरगाणा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात केवळ शासकीय योजनांची पाहणी आणि बैठका न घेता त्यांनी दांडीची बारी–जाहुले या रस्त्याची प्रत्यक्ष
पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्याकडूनच रस्त्याची दर्जेदार फेरदुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जनतेच्या पैशातून रस्ता बांधायचा आणि सात महिन्यांतच जनतेला खड्ड्यांतून प्रवास करायला लावायचा, हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही. तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. चौकट : रस्ता वर्षभरातच खड्ड्यात; ठेकेदाराला काळ्या यादीत टाका! दांडीचीबारी ते जाहुले रस्ता गेल्या वर्षीच झाला; मात्र आजची अवस्था पाहता हा रस्ता दहा वर्षांपूर्वीचा असल्याचा भास होतो. रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून मनाला चीड येते. नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांचा असा बोजवारा उडत असेल, तर जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. संबंधित कामाची तातडीने चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे आणि भविष्यात त्याला कोणतेही शासकीय काम देऊ नये, अशी मागणी उपसरपंच जयराम भोये (मनखेड) यांनी केली आहे.
- NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. NASHIK : गॅस सिलिंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक. चोरीच्या सिलिंडर टाक्यांसह तब्बल 1 लाख 56 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-१ कडून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या चोरी करणाऱ्या ४ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या टाक्यांसह तब्बल १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..1
- धोकादायक ठिकाणी झेंडे अथवा सजावट करताना जीव धोक्यात घालू नका; उच्चदाबाच्या विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखा, असे आवाहन करण्यात येत आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने सातपूर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असतानाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जेपी नगर येथे दुर्दैवी दुर्घटनेने या आनंदावर विरजण पडले. हनुमान मंदिरावर गणेशोत्सवाच्या स्थापनेनिमित्त भगवा झेंडा लावत असताना दोन मुलांना उच्चदाबाच्या विद्युत तारांचा जोरदार धक्का बसल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष शंकर मिरेकर (१५) आणि आदित्य अशोक मिरेकर हे दोघे हनुमान मंदिरावर भगवा झेंडा लावण्यासाठी चढले होते. मात्र, झेंड्याला असलेल्या लोखंडी रॉडचा जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारांशी संपर्क आल्याने क्षणार्धात मोठा विद्युत अपघात झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने आयुष खाली कोसळला, तर आदित्यलाही गंभीर स्वरूपाचा विजेचा धक्का बसला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी आयुषला तातडीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर आदित्यला कराड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे एपीआय भडांगे आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच नगरसेवक नितीन निगळ आणि सामाजिक कार्यकर्ते रवी काळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने जेपी नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, उत्सव साजरा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याची गंभीर जाणीव या घटनेने करून दिली आहे. विशेषतः उच्चदाबाच्या विद्युत तारांजवळ झेंडे, पताका किंवा लोखंडी साहित्य हाताळताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.3
- येवला शहरातील नांदगाव रोड लगतच्या वसाहतीत संशयास्पद हालचालींमुळे कुंटणखाना सुरू असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला येवला शहरातील नांदगाव रोड लगतच्या वसाहतीत संशयास्पद हालचालींमुळे कुंटणखाना सुरू असल्याचा संशय स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी नेमकी काय कारवाई झाली, हे अद्याप अस्पष्ट आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असताना, शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतो, असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.1
- नंदुरबार येथील श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा नंदुरबार येथील श्रीमती डीआर हायस्कूल येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.1
- "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" नवापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रशासनाने टॉयलेट (शौचालय) बांधले खरे, परंतु ते वापरण्यायोग्य नसल्याने अथवा त्याला नेहमी कुलूप ठोकलेले असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वरील या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असून, ऐन प्रवासाच्या वेळी महिला आणि वृद्ध प्रवाशांची तुफान ससेहोलपट होत आहे. कुलूपबंद सुविधा, प्रवाशांची अडचण: नवापूर स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वर बनवण्यात आलेले स्वच्छतागृह नेहमी कुलूपबंद स्थितीत पहायला मिळते. 'टॉयलेट असूनही वापरता येत नाही' अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. महिला व वृद्धांना मोठा मनस्ताप: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान ट्रेनची वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना, लहान मुलांना आणि वयोवृद्धांना प्रातर्विधी व स्वच्छतेसाठी कुठे जावे, असा गंभीर प्रश्न पडला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे महिलांना प्रचंड संकोच आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेचा फज्जा आणि दुर्गंधी: एका बाजूला टॉयलेटला कुलूप असल्याने परिसर अस्वच्छ राहतो, तर दुसऱ्या बाजूला उघड्यावर जाण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय उरत नाही, ज्यामुळे स्टेशन परिसरात अस्वच्छता पसरत आहे. प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष: प्रवाशांनी यासंदर्भात अनेकदा तोंडी तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. "अशा सुविधा जर बंदच ठेवायच्या असतील तर त्या बांधल्या कशासाठी?" असा संतप्त सवाल स्थानिकांकडून आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रवाशांची मागणी: नवापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि ३ वरील कुलूपबंद टॉयलेट्स तात्काळ उघडून ते स्वच्छ व वापरायोग्य करण्यात यावेत. प्रशासनाने याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक प्रवाशांनी दिला आहे.3
- धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील अलहेरा उर्दू शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष पुढाकार धुळ्यातील गरीब नवाज नगर परिसरातील अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून परिसरात साचलेल्या पाण्यामुळे मलेरिया, टायफॉइड आणि सर्दी-तापासारख्या साथीच्या आजारांचा फैलाव वाढला होता, ज्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी आजारी पडत होते. या गंभीर समस्येची दखल घेत, शाळेतील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री जुनेद पठाण साहेब यांनी सुल्तानिया संस्थेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे शाळेतच शिबीर घेण्याची मागणी केली होती. प्रशासनाने या निवेदनाची त्वरित दखल घेतल्याने हे शिबीर यशस्वीपणे पार पडले. यात शेकडो विद्यार्थ्यांची कसून आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले, तसेच आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन श्री इमरान आजमी साहेब आणि अलहेरा उर्दू प्राथमिक शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री नदीम खान गुलशेर खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात डॉक्टर निशा धवन, डॉक्टर बदर सूर्यवंशी आणि आशा वर्कर नफिसा दीदी यांनी अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांची तपासणी करत उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली. या संपूर्ण प्रक्रियेत आणि शिबिराच्या नियोजनात श्री जुनेद पठाण साहेब यांच्यासह श्री हुसेन पिंजारी साहेब, श्री अयाज अहमद अयाज आणि अमजद पठाण साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. वाढत्या साथीच्या आजारांच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी जागेवरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे धुळे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.1
- मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस मातीचा मुलामा अन् खड्डे जैसे थे! बोरगाव–सुरगाणा रस्त्यावर भोंगळ कारभाराचा कळस महिनाभरातच खड्ड्यांची पुन्हा दुरवस्था; वाहनचालक त्रस्त, कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी प्रतिनिधी | बोरगाव बोरगाव–सुरगाणा मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी महिनाभरापूर्वी करण्यात आलेली तात्पुरती मलमपट्टी आता पूर्णपणे फोल ठरली आहे. खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात आल्याने पावसामुळे माती वाहून गेली असून, रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी या मार्गाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे कायम असल्याचे चित्र दिसून आले. खड्ड्यांमध्ये माती टाकून प्रशासनाने केवळ कागदोपत्री अथवा तात्पुरती दुरुस्ती केल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. बोरगाव–सुरगाणा हा तालुक्यातील महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, एसटी बस व मालवाहतूक वाहने या मार्गावरून धावतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. महिनाभरापूर्वी केलेली दुरुस्ती टिकत नसेल, तर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्पुरती मलमपट्टी न करता खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे. भोंगळ दुरुस्तीला जबाबदार कोण? खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्याचा निर्णय नेमका कुणाचा, त्यावर किती खर्च झाला आणि कामाची गुणवत्ता तपासली का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रस्त्याची पाहणी करून ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन. गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन... गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप दिला.. मराठी पत्रकार संघाच्या अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष.... तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दीड दिवसाचा गणरायाची ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आली. मंगळवारी तळोदा स्मारक चौकापासून सनईच्या सुरात, चौघड्याच्या निनादात, बाप्पाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलाल विरहित फूल पाकळ्यांची उधळण करण्यात येत होती. मिरवणुकीत नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे योगेश चौधरी, शिवसेना विपुल कुलकर्णी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, बापू कलाल, भाजपाचे गौरव वाणी, नगरसेवक शिरीष माळी, सुरज माळी,नगरसेवक कपिल कर्णकार, योगेश पाडवी, अनिल पवार, शैलेश अहिरे भूषण सोनार, श्याम सोनागडवाला, सामाजिक राजकीय मान्यवरांसह पोलिस उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा, वाहतूक शाखेचे संदीप महाले, महेश महाले, होमगार्ड यशवंत कुकावलकर मिरवणुकीत सहभाग घेतला. विसर्जन मिरवणुकीत पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, भरत भामरे, सुनील सूर्यवंशी, वसंत मराठे, किरण पाटील, महेंद्र लोहार, कैलास पाडवी, नरेश चौधरी, सम्राट महाजन, हेमंत मराठे, वैभव कर्णकार, सुशील सूर्यवंशी, बापू गुरव, मानसिंग राजपूत आदींनी परिश्रम घेतले.1