logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन येवला प्रतिनिधी सचिन वखारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.१८९७ मध्ये प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना आजच्याच दिवशी निधन झालेल्या अग्रणी भारतीय समाजसुधारक आदरांजली वाहण्यासाठी. युवा नेते कुणाल दराडे गटनेते गणेश शिंदे उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील शहरप्रमुख परदेशी या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील महात्मा फुले नाट्यगृहा समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्यांनी महिला शिक्षणात क्रांती घडवून आणली आणि जातीभेदाविरुद्ध लढा दिला. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त तालुक्यातील व शहरातील सर्व लाडक्या बहिणींच्या न्याय हक्कासाठी आम्ही नेहमी झटत राहू असे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरांजली वाहताना सांगण्यात आले यावेळी नगरसेवक अरबाज अन्सारी अक्षय राजपूत प्रशांत शिंदे,सामाजिक न्याय शहरप्रमुख सुभाष गांगुर्डे,विजय मोरे उमेश कासार, डॉ.सुजित एलमामे, संतोष थोरे, नचकेत जाधव, रोहित जावळे, सागर शिंदे, नितीन कायस्त यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
2 hrs ago
a7f1ab74-cf56-4622-9ba6-55f8e513d1dc

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन येवला प्रतिनिधी सचिन वखारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.१८९७ मध्ये प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना आजच्याच दिवशी निधन झालेल्या अग्रणी भारतीय समाजसुधारक आदरांजली वाहण्यासाठी. युवा नेते कुणाल दराडे गटनेते गणेश शिंदे उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील शहरप्रमुख परदेशी या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील महात्मा फुले नाट्यगृहा समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, त्यांनी महिला शिक्षणात क्रांती घडवून आणली आणि जातीभेदाविरुद्ध लढा दिला. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त तालुक्यातील व शहरातील सर्व लाडक्या बहिणींच्या न्याय हक्कासाठी आम्ही नेहमी झटत राहू असे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदरांजली वाहताना सांगण्यात आले यावेळी नगरसेवक अरबाज अन्सारी अक्षय राजपूत प्रशांत शिंदे,सामाजिक न्याय शहरप्रमुख सुभाष गांगुर्डे,विजय मोरे उमेश कासार, डॉ.सुजित एलमामे, संतोष थोरे, नचकेत जाधव, रोहित जावळे, सागर शिंदे, नितीन कायस्त यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल येथे सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या नंतर शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच महिलांना शिक्षणाचे मार्ग दाखवले. सदर कार्यक्रमास शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, शोभा निकम, प्रिया भागवत, पूनम घोंगाणे, श्रावणी खेरुड सह सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी माळी यांनी केले तर आभार शिक्षिका शर्मिला पवार यांनी मानले.
    1
    मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल येथे सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. 
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.या नंतर शिक्षिका अर्चना एंडाईत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला.शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सांगितले की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. तसेच महिलांना शिक्षणाचे मार्ग  दाखवले.
सदर कार्यक्रमास शिक्षक अमोल आहेर, अजहर खतीब, दीपक खैरनार, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, नीलिमा देशमुख, सुनीता वडे, शोभा निकम, प्रिया भागवत, पूनम घोंगाणे, श्रावणी खेरुड सह सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका माधुरी माळी यांनी केले तर आभार शिक्षिका शर्मिला पवार यांनी मानले.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    29 min ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बिहार पुलिस खुद ट्रैफिक नियम तोड़ते हुए नजर आ रहे हैं।एक मोटरसाइकिल तीन व्यक्ति जा रहे हैं जो की ट्रैफिक नियम का उल्लंघन करना माना जाता है यह तीनों स्टाफ मधेपुरा जिले के ग्वालपाड़ा थाना के है।
    1
    बिहार पुलिस खुद ट्रैफिक नियम तोड़ते हुए नजर आ रहे हैं।एक मोटरसाइकिल तीन व्यक्ति जा रहे हैं जो की ट्रैफिक नियम का उल्लंघन करना माना जाता है यह तीनों स्टाफ मधेपुरा जिले के ग्वालपाड़ा थाना के है।
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    1
    राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था
राहुरी (प्रतिनिधी):
राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली.
ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली.
या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    23 hrs ago
  • सिटी चौक परिसरात दुकानफोडी; CCTV फुटेजवरून तपास सुरू छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने एका साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानफोडी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील माल व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तसेच परिसरातील इतर CCTV फुटेजही तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, सिटी चौक परिसरात वाढत्या दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 📰
    1
    सिटी चौक परिसरात दुकानफोडी; CCTV फुटेजवरून तपास सुरू
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने एका साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानफोडी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील माल व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तसेच परिसरातील इतर CCTV फुटेजही तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, सिटी चौक परिसरात वाढत्या दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 📰
    user_लोक परिषद न्युज
    लोक परिषद न्युज
    पत्रकार औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 👉 तुम्हालाही पार्सल पाठवायचे आहे का? विश्वासार्ह कुरिअर सेवेसाठी आजच आम्हाला कॉल करा! 9545789966
    1
    👉 तुम्हालाही पार्सल पाठवायचे आहे का? विश्वासार्ह कुरिअर सेवेसाठी आजच आम्हाला कॉल करा! 9545789966
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील यांनी घेतले शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे दर्शन ​नाथ षष्ठीच्या पावन पर्वावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज श्री क्षेत्र पैठण येथे भेट देऊन शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पैठण नगरीत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. ​महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने समाजाचे प्रश्न सुटावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा दर्शन सोहळा पार पडला.
    1
    छत्रपती संभाजीनगर:
मनोज जरांगे पाटील यांनी घेतले शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे दर्शन
​नाथ षष्ठीच्या पावन पर्वावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज श्री क्षेत्र पैठण येथे भेट देऊन शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पैठण नगरीत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.
​महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने समाजाचे प्रश्न सुटावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा दर्शन सोहळा पार पडला.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • ​येवला, दि. १० मार्च: प्रतिनिधी सचिन वखारे येवला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह आणि संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. ​यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटवून महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अथक संघर्षामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापासून ते विविध क्षेत्रांतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात सावित्रीबाईंचे योगदान अतुलनीय आहे." ​या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
    4
    ​येवला, दि. १० मार्च: प्रतिनिधी सचिन वखारे येवला 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह आणि संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
​यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटवून महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अथक संघर्षामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापासून ते विविध क्षेत्रांतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात सावित्रीबाईंचे योगदान अतुलनीय आहे."
​या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.