अक्षय तृतीयेला बालविवाह होणार नाहीत, याची खात्री करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता अक्षय तृतीयेला बालविवाह होणार नाहीत, याची खात्री करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही बालविवाह होऊ नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी १०९८ या निशुल्क क्रमांकावर कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बालविवाह रोखण्याची जबाबदारी पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक यांच्यासह फेटेवाले, हॉटेल चालक, मंगल कार्यालय संचालक, बँडवाले आणि विवाह विधी करणारे भटजी यांच्यावरही असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बालविवाह समजला जातो. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील तरतुदीनुसार वयाची पडताळणी शाळेचे अभिलेख, परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखल्यावरून करणे बंधनकारक आहे. वयाचा पुरावा उपलब्ध नसल्यास प्रकरण महिला व बालविकास समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. विवाह समारंभात सेवा देणाऱ्या सर्व संबंधितांनी बालविवाह होणार नाही, याची खात्री करावी. अन्यथा संबंधितांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच कोणत्याही ठिकाणी बालविवाह झाल्याचे आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीस विकासकामांसाठी निधी रोखण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. शाळांमधील विद्यार्थिनी सलग १० दिवस अनुपस्थित असल्यास मुख्याध्यापकांनी त्वरित महिला व बालविकास विभागाला कळवावे. प्रत्येक विवाहाची नोंद घेणे आवश्यक असून नोंद न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. बालविवाह प्रतिबंध समितीमार्फत अचानक तपासण्या करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. टीसीवरील जन्मदिनांक व अधिकृत जन्मदाखला हाच ग्राह्य धरला जाईल. आधार कार्ड वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य राहणार नाही. धार्मिक स्थळांवरही बालविवाह होऊ नयेत, यासाठी धर्मगुरूंनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज जिल्हा प्रशासनाकडून सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात येत असून परिपत्रके पाठवून जनजागृती करण्यात येत आहे. बसस्थानके, रेल्वे स्थानके व इतर सार्वजनिक ठिकाणीही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. बालविवाह रोखायचायं-१०९८ वर कॉल करा बालविवाहाची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ १०९८ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अक्षय तृतीयेला बालविवाह होणार नाहीत, याची खात्री करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता अक्षय तृतीयेला बालविवाह होणार नाहीत, याची खात्री करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही बालविवाह होऊ नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी १०९८ या निशुल्क क्रमांकावर कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बालविवाह
रोखण्याची जबाबदारी पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक यांच्यासह फेटेवाले, हॉटेल चालक, मंगल कार्यालय संचालक, बँडवाले आणि विवाह विधी करणारे भटजी यांच्यावरही असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बालविवाह समजला जातो. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील तरतुदीनुसार वयाची पडताळणी शाळेचे अभिलेख, परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखल्यावरून करणे बंधनकारक आहे. वयाचा पुरावा उपलब्ध नसल्यास प्रकरण महिला व बालविकास समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. विवाह समारंभात सेवा देणाऱ्या सर्व संबंधितांनी बालविवाह होणार नाही, याची खात्री करावी. अन्यथा संबंधितांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच कोणत्याही ठिकाणी बालविवाह झाल्याचे आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीस विकासकामांसाठी निधी रोखण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. शाळांमधील विद्यार्थिनी सलग १० दिवस अनुपस्थित
असल्यास मुख्याध्यापकांनी त्वरित महिला व बालविकास विभागाला कळवावे. प्रत्येक विवाहाची नोंद घेणे आवश्यक असून नोंद न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. बालविवाह प्रतिबंध समितीमार्फत अचानक तपासण्या करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. टीसीवरील जन्मदिनांक व अधिकृत जन्मदाखला हाच ग्राह्य धरला जाईल. आधार कार्ड वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य राहणार नाही. धार्मिक स्थळांवरही बालविवाह होऊ नयेत, यासाठी धर्मगुरूंनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज जिल्हा प्रशासनाकडून सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात येत असून परिपत्रके पाठवून जनजागृती करण्यात येत आहे. बसस्थानके, रेल्वे स्थानके व इतर सार्वजनिक ठिकाणीही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. बालविवाह रोखायचायं-१०९८ वर कॉल करा बालविवाहाची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ १०९८ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- Post by Turab Sayyad1
- नवसाला पावणारा व इच्छा पूर्ण करणारा हारे का सहारा बाबा श्याम हमारा असा हा देवस्थान आपल्या नांदेड शहरात असून. मुख्य देवस्थान राजस्थान येथील खाटू नगर या ठिकाणी असून त्याचेच प्रतिबिंब स्वरूप म्हणून 2005 वर्षी या नांदेड शहरांमध्ये श्री खाटू श्याम बाबा यांचे मंदिर बांधण्यात आलं परंतु अनेकांना ह्या खाटू श्याम बाबा बद्दल काहीच माहित नव्हतं परंतु जसजसं प्रसार वाढत जाईल तसं तसं या खाटू श्याम बाबाचा पूजन घराघरांमध्ये होणार असं श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना वरदान दिलेलं आहे याच अनुषंगाने या वरदान व्यतिरिक्त आणखी दोन वरदान दिले जे की कोणताही भक्त या कलियुगामध्ये तुझी उपासना करेल तुझी पूजा करेल तुझ्या चौकटीवर येऊन तुला काही मागील तर तू त्यांना देणार खाली हात वापस पाठवू देणार नाही असा तो हारे का सहारा बनशील त्यांनी दुसरा वरदान म्हणजे ज्या व्यक्तीच्या नशिबी दुःख दारिद्र्य संघटन कष्ट ही माझ्या लिखित स्वरूपात दिलेले ते कधीच बदलणार नाही परंतु तुला ते अधिकार सुद्धा मी देतो असे देखील श्रीकृष्णांनी या श्याम बाबांना वरदान दिले याच अनुषंगाने भारतामध्ये अनेक ठिकाणी श्याम बाबा देवस्थान यांची स्थापना करण्यात आली मुख्य बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रा मध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये शहरांमध्ये खाटू श्याम बाबा यांचा देवस्थान मोठ्या प्रमाणात उभारणी होत आहे जसं जसं भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत तशा तशाप्रकारे मोठ्या प्रमाणात खाटू श्याम बाबा या ठिकाणी भक्तांची गर्दी बघण्यास मिळत आहे. नांदेड शहरांमध्ये देखील दर एकादशी निमित्त नांदेड येथील प्रसिद्ध श्री खाटू श्याम बाबा मंदिर सांगवी हिंगोली रोड या ठिकाणी मोठ्या संख्येने दिवसभर भाविकांनी दर्शन घेत श्याम बाबा यांच्या समोर साकडे घातले. ज्याच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्याने त्या सगळ्यांना या ठिकाणी श्याम बाबा मंदिर येथे येऊन आपले नवस सोडले. बाबांचा आशीर्वादाचा चमत्कार आज अनेक भक्त घेत आहेत आणि अनुभवत आहेत. आपणही यावे आणि या श्याम बाबा मंदिर येथे श्याम बाबा यांची दर्शन घ्यावे.3
- Post by Mohammad Rafikh1
- मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1