हिवरखेड हादरले! राधास्वामी सत्संग परिसरात हरणाची शिकार; वाघ की बिबट्या? नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण अकोला हिवरखेड परिसरात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, आज पुन्हा एकदा हिंस्त्र पशूने हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्ला बु. रोडवरील राधास्वामी सत्संग जवळ असलेल्या निलेश खिरोडकार यांच्या शेतात हा प्रकार घडला असून यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. आज मंगळवार, २१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अजय नावकार आणि अजय मसूरकार हे युवक शेतात गेले असता, त्यांना एका हरणाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परिस्थिती पाहता एखाद्या मोठ्या हिंस्त्र प्राण्याने (वाघ किंवा बिबट्या) ही शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महिन्याभरापासून वाघाचा धुमाकूळ हिवरखेडसह सौंदळा, वारखेड, वारी या परिसरात गेल्या महिन्याभरापासून वाघाने अक्षरशः आतंक माजविला आहे. आतापर्यंत डझनभर पाळीव व वन्य प्राण्यांच्या शिकारी झाल्या असून वन विभाग मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी आता स्वतःच्या शेतात जाण्यासही घाबरत आहेत. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ परिसरात पिंजरा लावावा आणि या हिंस्त्र पशूला जेरबंद करून दूर जंगलात सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर वन विभागाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
हिवरखेड हादरले! राधास्वामी सत्संग परिसरात हरणाची शिकार; वाघ की बिबट्या? नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण अकोला हिवरखेड परिसरात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, आज पुन्हा एकदा हिंस्त्र पशूने हरणाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्ला बु. रोडवरील राधास्वामी सत्संग जवळ असलेल्या निलेश खिरोडकार यांच्या शेतात हा प्रकार घडला असून यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. आज मंगळवार, २१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अजय नावकार आणि अजय मसूरकार हे युवक शेतात गेले असता, त्यांना एका हरणाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. परिस्थिती पाहता एखाद्या मोठ्या हिंस्त्र प्राण्याने (वाघ किंवा बिबट्या)
ही शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महिन्याभरापासून वाघाचा धुमाकूळ हिवरखेडसह सौंदळा, वारखेड, वारी या परिसरात गेल्या महिन्याभरापासून वाघाने अक्षरशः आतंक माजविला आहे. आतापर्यंत डझनभर पाळीव व वन्य प्राण्यांच्या शिकारी झाल्या असून वन विभाग मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी आता स्वतःच्या शेतात जाण्यासही घाबरत आहेत. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ परिसरात पिंजरा लावावा आणि या हिंस्त्र पशूला जेरबंद करून दूर जंगलात सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर वन विभागाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
- अकोला : समाजात फोफावत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट रूढी-परंपरा यावर प्रहार करत आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत, 'सावित्रीबाई फुले भिशी ग्रुप' (ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ) यांच्या वतीने नुकताच एक अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे १५० ते २०० महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीसोबतच प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला. सामाजिक दातृत्वाचे दर्शन कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ग्रुपने आपल्या दातृत्वाची परंपरा कायम ठेवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत शिबिरासाठी ३,५०० रुपये किमतीचा एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा गोपाळराव धनोकार यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पब्लिक स्कूल पातुरच्या प्राचार्य विद्या निलेश गाडगे यांनी 'आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे' या विषयावर महिलांशी संवाद साधला. यावेळी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रुपमधील ज्येष्ठ महिलांनी तसेच इतर सदस्यांनी सादर केलेल्या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत भरली. नाटिकेतून बुवाबाजीवर ओढले ताशेरे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सादर केलेली नाटिका. समाजात देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजांचे वास्तव या नाटिके द्वारे मांडण्यात आले. यामध्ये मैत्री प्रवीण लोखंडे यांनी भोंदू महाराजची भूमिका साकारली. या विषयावर राज्य अन्न व पुरवठा आयोगाच्या सौ. मायाताई इरतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यांची लाभली उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ भिशी ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री तडस, ग्रुप लीडर्स माधुरी दाते, भारती शेंडे, कल्पना तायडे, स्मिता वरोकार, विद्या घाटोळ, सोनिया निमकर, हेमा वरोकार, माधुरी धनोकार, अलका ढोमणे व शारदा धनोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुंदाताई लोखंडे, पुष्पा वाढोकार, लता धनोकार, रत्ना हुसे, तेजस्विनी चिंचोलकर, सुनंदा हुसे, वर्षा जढाळ, कुसुम बेलसरे, पद्मा बहाड, स्मिता देशमुख, शितल हाडोळे, उषा देवघरे, वनमाला चिंचोलकार, सरिता चिंचोलकार, मंगला मसने, विशाखा काळे, शुभांगी काळे, माधुरी काळे, ज्योती असोलकार, ममता आसोलकार, नीता सांगोकार, उषा नाथे, गोदावरी कलोरे यांसह मोठ्या संख्येने महिला सदस्य सहभागी होत्या.1
- खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.1
- मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!1
- Post by Ahem Raza1
- बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची ३७० वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेला चर्चेचा विषय ठरते. मात्र, यंदा ही चर्चा भाकितांपेक्षा एका 'आव्हाना'मुळे अधिक गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी भेंडवळच्या घटमांडणीला उघड आव्हान दिले आहे. ही प्रथा केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, यावरून आता राज्यभरात नवा वाद निर्माण झाला आहे.श्याम मानव यांनी भेंडवळच्या भाकितांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या खगोलशास्त्रीय किंवा सांख्यिकीय पुराव्याशिवाय वर्तवलेली ही भाकिते म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा खेळ आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, जर भेंडवळच्या घटमांडणीतील यंदाची भाकिते ९० टक्क्यांपेक्षा जास्त अचूक ठरली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ८० लाखांचे रोख पारितोषिक संबंधित महाराजांना दिले जाईल.श्याम मानव यांच्या या आव्हानामुळे भेंडवळच्या घटमांडणी करणाऱ्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंनिसचा दावा आहे की, केवळ अंदाज वर्तवून समाजात संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. विज्ञानाच्या कसोटीवर आणि अचूकतेच्या निकषावर ही भाकिते खरी ठरली पाहिजेत, अन्यथा हे अंधश्रद्धेचे प्रदर्शन असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.एकीकडे ३७० वर्षांची परंपरा जपणाऱ्या भाविकांची मोठी फळी आहे, ज्यांच्यासाठी हे भाकीत शेती नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर दुसरीकडे, पुरोगामी विचारवंत आणि अंनिस याला विज्ञानाच्या चौकटीत बसवून तपासण्याची मागणी करत आहेत. '८० लाखांचे बक्षीस' हे केवळ एक निमित्त असून, त्यामागे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.1
- पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.1
- Post by नंदकिशोर साखरकर1
- संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गट मांडणी केली जाते त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आला आहे.1