Shuru
Apke Nagar Ki App…
आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील दसरा मैदान चौकातील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या प्राचीन विठ्ठल मंदिरात पंढरी दुमदुमली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
जनहित लोक कल्याण संस्थ धु
आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील दसरा मैदान चौकातील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या प्राचीन विठ्ठल मंदिरात पंढरी दुमदुमली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील दसरा मैदान चौकातील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या प्राचीन विठ्ठल मंदिरात पंढरी दुमदुमली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.2
- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पांझरा मध्यम प्रकल्प ८१ टक्के भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तासांत धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- INTUC चे धुळे जिल्हा अध्यक्ष कृष्णा ठाकूर यांनी बेरोजगारी आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जंतरमंतरवरील आंदोलन हे केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित नसून, महाराष्ट्रातील तरुण शिक्षण घेऊनही नोकरीसाठी राज्याबाहेर जाण्यास मजबूर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याचे सरकार बेरोजगारीच्या या गंभीर समस्येवर बोलतच नाही, असा थेट आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी, बेरोजगार तरुण, कामगार आणि शेतकरी या सर्वांचा आवाज आता एक झाला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. हा विषय एका भागापुरता नसून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा, बेरोजगारांचा आणि कामगारांचा आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी जे नेते मैदानात उतरले आहेत, त्यांच्या समर्थनासाठीच हा व्हिडिओ बनवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.1
- अपर जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार आणि डॉ. डोलारे यांच्या आश्वासनानंतर मालेगावमध्ये देवा पाटील यांच्या उपोषणाला यश आले असून त्यांच्या उपोषणाची सांगता झाली आहे. शहरात लवकरच बोगस डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक रुग्णालयात रेटबोर्ड लावण्याबाबत डॉ. डोलारे यांनी नोटिसा बजावल्या आहेत. तसेच आजपासूनच शहरातील अनेक सोनोग्राफी केंद्रांवर प्रत्यक्ष तपासणीलाही सुरुवात झाली आहे.1
- पाचोरा येथील कृष्णापुरी परिसरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने फराळ वाटप करण्यात आले आहे. माऊली ग्रुप आणि बहुळेश्वर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.1
- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातील अमराळे येथून शिंदखेड्याकडे निघालेल्या बसच्या छताला गळती लागल्याचा प्रकार समोर आला आहे. धावत्या बसच्या छतातून सतत पाणी टपकल्याने बसमधील विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले असून ते पूर्णपणे भिजले आहेत. एसटी बसच्या गळतीचा हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. छतातून पाणी गळत असताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने, या प्रकारामुळे परिवहन विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.1
- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पांझरा नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.1