महावितरण मधील कंत्राटी कामगारांचे वेतन थकले कामगारांचा आंदोलनाचा इशारा महासागर प्रतिनिधी वाशिम- महावितरण अंतर्गत विविध उपकेंद्रांवर कार्यरत कंत्राटी कामगारांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकीत असल्याचा गंभीर आरोप करत तांत्रिक अॅप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात मा. संचालक (मानव संसाधन), महावितरण यांना निवेदन देण्यात आले असून सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी सांगितले. संघटनेच्या निवेदनानुसार स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांना ऑगस्ट २०२५ पासून महावितरणच्या ३२९ उपकेंद्रांवर कंत्राटी कामगार पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र, संबंधित कंपन्यांनी ऑगस्ट २०२५ (स्मार्ट सर्व्हिसेस) व डिसेंबर २०२५ (क्रिस्टल इंटिग्रेटेड) पासून आजतागायत वेतन अदा केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेकडो कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, वाशीम विभागातील कंत्राटी कामगार स्व. केशव वाकुडकर यांचा १ डिसेंबर २०२५ रोजी ड्युटीवर येत असताना अपघाती मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नियमांनुसार मिळणारी भरपाई व आर्थिक मदत अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच स्व. रामभाऊ बोरकर (वाशीम) यांच्या निधनानंतरही संबंधित लाभ न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय कंत्राटी कामगारांना पे-स्लिप देण्यात येत नसल्याची, काही एजन्सीकडून दरमहा १५०० ते २००० रुपये वेतनातून जबरदस्तीने परत घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच ईएसआयसीमध्ये कामगारांच्या कुटुंबीयांची माहिती अद्ययावत नसल्यामुळे वैद्यकीय लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. वाशीम, नागपूर, अकोला, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, भंडारा, गोंदिया आदी मंडळांमध्ये सुरक्षा साहित्य (टी अॅन्ड पी) न दिल्याचाही आरोप आहे. संघटनेने संबंधित सर्व एजन्सींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, थकीत वेतन तातडीने अदा करावे व कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. सात दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील हजारो कंत्राटी कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन तांत्रिक कंत्रा टी कामगार असोसिएशन चे राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, शेख राहील, अतुल पाटील, शंकर जरकड, अनिल चव्हाण, राम कुटे आदिनी केले आहे..

- Post by Sharad Dayedar1
- दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात १६ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस तपासादरम्यान या प्रकरणात रजि अहमद खान युसूफ खान रा. दारव्हा याचे नावही समोर आले. त्याच्या सांगण्यावरून कावेरी नगर येथील सप्तशृंगी अक्वा या दुकानाच्या मालकाला ठार करण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी तेथे गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गौरव टारपे याच्यासोबत वाद झाला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा मास्टर माईंड असलेला आरोपी रजि अहमद खान युसूफ खान याचा नेमका सप्तशृंगी एक्वा च्या मालकाशी काही दुश्मनी होती की, कोणाकडून सुपारी घेण्यात आली होती या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.1
- Post by स्मिता तलेय1
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1
- अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची छत्री तलावाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी1
- *“धानोरा सा के विकास कामोका फुट गया भांडा; जलसंधारण के घोटाले पर जि प प्रशासन की बढ गई धडकन !”* - जि.प. यवतमाल के सामने अमर भूख हड़ताल शुरू! उमरखेड: धानोरा (सा), ता. उमरखेड में डेवलपमेंट के कामों में कथित मिसमैनेजमेंट और जलसंधारण के डिपार्टमेंट में गड़बड़ियों के गंभीर आरोपों को लेकर ज़िला परिषद एडमिनिस्ट्रेशन के खिलाफ गुस्सा फूट पड़ा है। ज़िला परिषद यवतमाल ऑफिस के सामने भूख हड़ताल सोमवार (16 फरवरी, 2026) से शुरू हो गई है और एडमिनिस्ट्रेशन पर सीधी कार्रवाई करने का दबाव बढ़ गया है। जर्नलिस्ट्स संयुक्त युनायटेड जर्नलिस्ट असोसिएशन के पदाधिकारी रामदास अंबादास कांबले (संयुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उमरखेड ), शेख इरफान शेख ईसा (एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट) और सुरेंद्रनाथ पंजाबराव दलवी (वाइस प्रेसिडेंट) भूख हड़ताल में शामिल हुए हैं। ऑफिस के सामने साफ इशारा है कि “जब तक दोषियों के खिलाफ कार्रवाई नहीं होती, पीछे नहीं हटेंगे”। *धनोरा मामले में आरोप गंभीर* भूख हड़ताल करने वालों के लगाए आरोप सीधे तौर पर जनता के हित से जुड़े हैं। कब्रिस्तान तक जाने वाली CC रोड पर काम किए बिना बिल जारी करने का आरोप, पब्लिक टॉयलेट के खराब कंस्ट्रक्शन की शिकायतों को नज़रअंदाज़ करना ये शामिल हैं। उन्होंने कहा कि मामले में जांच और कार्रवाई न होने की वजह से वह भूख हड़ताल पर हैं। *जल संभारण विभाग लाखों के भ्रष्टाचार से दागदार* याचिका में आरोप लगाया है कि सब-डिविजनल वॉटर रिजर्वेशन ऑफिसर सीमा तायडे के कार्यकाल के दौरान पुसद, दिग्रस, उमरखेड़ और महागांव तालुका में विकास कार्यों में लाखों रुपये का भ्रष्टाचार किया गया। बांध-तालाब सेडिमेंटेशन स्कीम में गड़बड़ी, ईंट भट्ठा मालिकों को गैर-कानूनी मिट्टी के लाइसेंस, संबंधित अधिकारियों की संपत्ति की गहराई से जांच प्रदर्शनकारियों ने ऐसी मांगें की हैं। उन्होंने संबंधित अधिकारियों को तुरंत सस्पेंड करने और क्रिमिनल केस दर्ज करने की भी मांग की। *शिकायत के बाद कोई कार्रवाई नहीं* उन्होंने 17 दिसंबर 2025 को लिखकर, 9 जनवरी 2026 को मेमोरेंडम और 30 जनवरी 2026 को डिस्ट्रिक्ट कलेक्टर, सुपरिटेंडेंट ऑफ़ पुलिस और रूरल डेवलपमेंट मिनिस्टर को ई-मेल से शिकायत की है, साथ ही सीधी शिकायत भी की है, लेकिन कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। "जब तक दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई नहीं होती, भूख हड़ताल वापस नहीं ली जाएगी। भूख हड़ताल के दौरान किसी भी तरह की गड़बड़ी के लिए एडमिनिस्ट्रेशन जिम्मेदार होगा," भूख हड़ताल करने वालों ने भूख हड़ताल तेज करने का संकेत दिया है। जि.प. कार्यालय यवतमाल के सामने भूख हड़ताल के गंभीर आरोपों पर पूरा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन की भूमिका पर नजर रखे हुए है।1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री संत मारोती महाराज मंदिरात दहीहंडी आणि काला वाटप करण्यात आलं. श्री संत मारोती महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.1
- Post by Sharad Dayedar1