राहुड घाटातील अपघातांचा प्रश्न गंभीर; सहापदरी फ्लायओव्हर/व्हायाडक्टला तातडीने मंजुरी द्या - आमदार डॉ. राहुल आहेर; एनएचएआयचे मुख्य महाव्यवस्थापक रजनीश कपूर यांच्यासोबत नवी दिल्ली येथे बैठक; अपघातप्रवण घाट कायमस्वरूपी सुरक्षित करण्याची मागणी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड तालुक्यातील राहुड घाटातील वाढते अपघात, वाहतूक कोंडी आणि वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेता या ठिकाणी सहापदरी फ्लायओव्हर/व्हायाडक्ट उभारण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी ठाम मागणी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार डॉ. आहेर यांनी दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी एनएचएआयचे मुख्य महाव्यवस्थापक रजनीश कपूर यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राहुड घाटातील अपघातांची गंभीर परिस्थिती, वाढती अवजड वाहतूक आणि त्यातून निर्माण होणारा धोका याबाबत माहिती देत त्यांनी एनएचएआयकडे लेखी निवेदनही सादर केले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुड घाटाची लांबी सुमारे २.५५ किलोमीटर असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. घाटातील तीव्र चढ-उतार आणि वळणांमुळे ट्रक, टँकर तसेच इतर अवजड वाहने अनियंत्रित होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम होत आहे. दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी राहुड घाटात टायर घेऊन जाणाऱ्या ट्रकने चार वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले होते. तसेच सप्टेंबर २०२५ मध्ये टँकर आणि ट्रेलरच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. राहुड घाटात अपघात झाल्यानंतर अनेकदा महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवावी लागते. परिणामी मनमाड, मालेगाव, चांदवड, नाशिक आणि धुळे या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना त्याचा फटका बसतो. आमदार डॉ. आहेर यांनी एनएचएआयला दिलेल्या निवेदनात राहुड घाट हा 'मॉर्थ' च्या निकषांनुसार अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याचे नमूद केले आहे. पोलीस अपघात अहवालाच्या आधारे मागील पाच वर्षांत या परिसरात २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. एनएचएआयकडून वेळोवेळी अल्पकालीन सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी राहुड घाटातील अपघातप्रवण भागाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी सहापदरी फ्लायओव्हर/व्हायाडक्टचे स्वतंत्र काम तातडीने मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी बैठकीत केली. राहुड घाटातील अपघातांचे प्रमाण, वाहतुकीची वाढती तीव्रता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करता या प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी एनएचएआय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या बैठकीस आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासोबत ॲड. विलास देशमाने आणि जिल्हा परिषद माजी सदस्य प्रशांत देवरे उपस्थित होते. राहुड घाटातील अपघातांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सहापदरी फ्लायओव्हर/व्हायाडक्टच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून काम सुरू करण्यासाठी पुढील स्तरावरही पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी स्पष्ट केले.

- दुचाकी चोरीप्रकरणी संशयीतास अटक; चांदवड येथील पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुचाकी चोरीचा तपास तळेगावरोही (ता. चांदवड) येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात चांदवड पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीतास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील रहिवासी फिर्यादी पंकज गोरखनाथ भोकनळ यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश हटकर, शिवनाथ शेळके, प्रदिप आजगे, विक्रम बस्ते व भूषण साळवे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अत्यंत कौशल्याने तपास केला. या प्रकरणी पोलिसांना संशयित केदु शरद केदारे (रा. तळेगावरोही, ता. चांदवड) अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. संशयीतास बुधवारी (दि. १६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.1
- एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली. सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.4
- ऋषिपंचमी निमित्ताने आज मार्कंडेश्वर पर्वतावरती महिला भाविकांची मोठी गर्दी ऋषिपंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर ती महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती - पुराणात सांगितले आहे की ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांनी ज्या शेतात बैलाने शेतीमध्ये राबलेले किंवा बैलाच्या साह्याने केलेली शेती त्याच्यातून निघालेले उत्पन्न हे ऋषीपंचमीच्या दिवशी महिलांना खाता येत नाही त्या दिवशी सुवासिनी महिला व इतर महिला या सकाळी उठल्यानंतर तीर्थाच्या ठिकाणी जाऊन स्नान करून आल्यानंतर त्या महिला ज्या ठिकाणी ऋषी चे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात . सप्तऋषीपैकी नाशिक जिल्ह्यात करंजी येथे कर्दम ऋषी मार्कंडेश्वर पर्वतावर ती मार्कंड ऋषी त्रंबकेश्वर येथे गौतम ऋषी व मनमाड जवळ अगस्ती ऋषी हे असून या ठिकाणी आज कृषी पंचमी निमित्ताने महिलांनी मोठी गर्दी केली होती . मार्कंडेश्वर पर्वतावरती दर्शनासाठी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक व नगर येथील महिला भाविक ह्या दर्शनासाठी आल्या होत्या . यावेळेस कळवण पोलीस स्टेशन व दिंडोरी तालुक्यातील वनी पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ही ठेवला होता .1
- पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके पंचायत में भ्रष्टाचार की सभी आवेदन दिया गया आवेदन देने के बाद भी खबर में उजागर किया गया था कि भ्रष्टाचार बंद हो सके1
- चोरीची ॲक्टिव्हा विक्रीसाठी आणणारा १८ वर्षीय ताब्यात..... गुन्हे शाखा युनिट २ची कारवाई; मुंबईनाका पोलिस ठाण्यातील चोरीचा गुन्हा उघडकीस नाशिक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाने चोरीची ॲक्टिव्हा विक्री करण्यासाठी आलेल्या १८ वर्षीय संशयिताला सिडको परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली असून, मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. वेदांत संजय चावरिया (वय १८, रा. गीतामळा, शताब्दी हॉस्पिटलमागे, हॅरिबेअर सोसायटीजवळ, मुंबईनाका, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी (१५ सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट २चे अधिकारी व कर्मचारी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहिती मिळाली. एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी सिडको येथील संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस पथकाने संभाजी स्टेडियम परिसरात सापळा रचला. संशयित इसम तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ॲक्टिव्हा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा जप्त करण्यात आली. त्याच्या कबुलीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आला. संशयितास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस अंमलदार प्रविण वानखेडे, मनोज शिंदे, संतोष सुपेकर आणि चापोहवा अतुल पाटील यांच्या पथकाने केली.2
- शबरी योजनेतील ९९० गायींचे वास्तव काय? ७० हजारांची गाय की कागदोपत्री समृद्धी? एकच गाय चार वेळा खरेदी दाखवल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप; व्यापारी–अधिकाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करण्याची मागणी1
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए इलाज के नाम पर शर्मनाक हरकत? 15 साल की बच्ची ने डॉक्टर पर लगाए गंभीर आरोप ऐसी महत्वपूर्ण खबरों के लिए1