logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कोपरगावात रस्त्यासाठी आंदोलन तीव्र;..... यांचा १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा कोपरगाव प्रतिनिधी ( राजेंद्र तासकर ) :- संबंधीत प्रशासकीय कार्यालयास तोंडी अथवा लेखी निवेदन देऊन ही आमच्या मागणीची दखल न घेतल्याने मा. तहसिलदार सावंत साहेब यांना दि.20 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निवेदनात मागणी नुसार काम न झाल्यास अर्जदार यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी आत्महदन करणार असल्याचे नमुद केले आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय (एमडीआर 99 ) या जुन्या टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सदर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वाढत्या वर्दळीमुळे रस्ता पूर्णपणे उखडून गेला असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती किंवा खड्डे बुजवण्याचे कामही झालेले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या मागणीसाठी विजय जाधव यांनी २० एप्रिल रोजी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन दिले होते. काम तातडीने सुरू न झाल्यास १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनात दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना तसेच कोपरगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रश्नात लक्ष घालून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशा सूचना तहसिलदार महेश सावंत यांनी संबंधितांना देऊनही बराच कालावधी उलटला असून अद्याप रस्त्याचे काम चालू न झाल्याने मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे अर्जदार विजय सुधाकर जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

6 hrs ago
user_Press Rajendra Taskar
Press Rajendra Taskar
कोपरगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
6 hrs ago
a909fe30-cd64-4a05-879c-d22543eb287f

कोपरगावात रस्त्यासाठी आंदोलन तीव्र;..... यांचा १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा कोपरगाव प्रतिनिधी ( राजेंद्र तासकर ) :- संबंधीत प्रशासकीय कार्यालयास तोंडी अथवा लेखी निवेदन देऊन ही आमच्या मागणीची दखल न घेतल्याने मा. तहसिलदार सावंत साहेब यांना दि.20 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निवेदनात मागणी नुसार काम न झाल्यास अर्जदार यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी आत्महदन करणार असल्याचे नमुद केले आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय (एमडीआर 99 ) या जुन्या टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सदर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वाढत्या वर्दळीमुळे रस्ता पूर्णपणे उखडून

1c76efcf-7433-446f-a32e-c923e504e1d1

गेला असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती किंवा खड्डे बुजवण्याचे कामही झालेले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या मागणीसाठी विजय जाधव यांनी २० एप्रिल रोजी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन दिले होते. काम तातडीने सुरू न झाल्यास १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी या निवेदनात दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना तसेच कोपरगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रश्नात लक्ष घालून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशा सूचना तहसिलदार महेश सावंत यांनी संबंधितांना देऊनही बराच कालावधी उलटला असून अद्याप रस्त्याचे काम चालू न झाल्याने मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे अर्जदार विजय सुधाकर जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Shravan Deore
    2
    Post by Shravan Deore
    user_Shravan Deore
    Shravan Deore
    येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल ​येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!
    1
    श्री नरसिंह जयंती उत्सव: नगरसुल 
​येवला तालुक्यातील नगरसुल येथील जागृत देवस्थान, श्री नरसिंह मंदिर येथे नरसिंह जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भक्तांचे रक्षण आणि अधर्माचा नाश करणाऱ्या भगवान नरसिंहाच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांना नरसिंह जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा!
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • *ब्रेकिंग- मोकामा के घोसवरी प्रखंड के सम्यागढ़ में डीजे की धुन पर डांस करने को लेकर दो जाति में विवाद, जमकर मारपीट, डांस का विरोध करने पर, बदमाशों ने लाठी डंडे और हथियार लाकर शादी में शामिल परिवार और संबंधियों को जमकर पीटा और फायरिंग की जिसमें मौली महतो नामक शख्स को लगी गोली!कई थानों की पुलिस घटनास्थल पर पहुँची! माहौल बेहद तनावपूर्ण! सम्यागढ़ थानाक्षेत्र की घटना, जातीय संघर्ष के आसार!*
    1
    *ब्रेकिंग- मोकामा के घोसवरी प्रखंड के सम्यागढ़ में डीजे की धुन पर डांस करने को लेकर दो जाति में विवाद, जमकर मारपीट, डांस का विरोध करने पर, बदमाशों ने लाठी डंडे और हथियार लाकर शादी में शामिल परिवार और संबंधियों को जमकर पीटा और फायरिंग की जिसमें मौली महतो नामक शख्स को लगी गोली!कई थानों की पुलिस घटनास्थल पर पहुँची! माहौल बेहद तनावपूर्ण! सम्यागढ़ थानाक्षेत्र की घटना, जातीय संघर्ष के आसार!*
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ११२ कर्णकर्कश सायलेन्सरचा चपातीसारखा चुराडा; पोलिसांच्या 'सिंघम' स्टाईलपुढे 'टवाळखोरांची' हवा गुल! नाशिक (खास प्रतिनिधी): कॉलेज रोडवर एखाद्या 'हिरो'सारखी एंट्री मारून, 'डॅम-डॅम' असा कानाचे पडदे फाडणारा आवाज करत मिरवणाऱ्या आणि स्वतःला रस्त्यावरचे 'बॉस' समजणाऱ्या बुलेटस्वारांची आता चांगलीच 'हवा' निघाली आहे! लोकांच्या छातीत धडकी भरवणारे हे टवाळखोर आता गपगुमान 'सायकल' चालवल्यासारखी बुलेट चालवताना दिसत आहेत. कारण? गंगापूर पोलिसांनी त्यांच्या लाडक्या आणि कर्कश सायलेन्सरवरून चक्क भलामोठा 'रोड-रोलर' फिरवला आहे! गेल्या काही दिवसांपासून कॉलेज रोडवर बुलेटच्या फटाक्यांनी नाशिककरांच्या नाकीनऊ आणले होते. म्हाताऱ्या-कोताऱ्यांची झोप उडवणाऱ्या आणि फक्त पोरींचे 'अटेन्शन' मिळवण्यासाठी कर्कश आवाज काढणाऱ्या या उपद्रवी बुलेटस्वारांचा माज उतरवण्यासाठी गंगापूर पोलिसांनी एक विशेष 'ऑपरेशन शांतता' राबवले. गुन्हेशोध पथकाने या ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गाड्या शोधून काढल्या आणि त्यांचे मॉडीफाय केलेले सायलेन्सर चक्क उपटून काढले! *११२ सायलेन्सरचा झाला पापड!* ३० एप्रिल २०२६ रोजी कॉलेज रोड पोलीस चौकीबाहेर एकच थरार पाहायला मिळाला. जप्त केलेले तब्बल ११२ सायलेन्सर रस्त्यावर एका रांगेत लावले होते. आणि मग... 'सिंघम'च्या स्टाईलमध्ये आला एक महाकाय रोड-रोलर! एका क्षणात त्या सर्व ११२ सायलेन्सरचा 'पापड' झाला. तो कर्रर्रर्र... कडाडणारा आवाज ऐकून आजूबाजूला उभ्या असलेल्या बुलेटस्वारांच्या डोळ्यांतून नक्कीच पाणी आले असेल! पण सर्वसामान्य नाशिककरांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकत पोलिसांना कडक सॅल्युट ठोकला. **पुन्हा आवाज केला तर याद राखा!** "यापुढे जर कोणी मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून 'हिरोगिरी' करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर याहूनही कडक आणि कठोर कारवाई होईल," असा सज्जड दम पोलिसांनी भरला आहे. त्यामुळे आता बुलेटवर 'फटाके' फोडण्याआधी या टवाळखोरांना १०० वेळा विचार करावा लागेल. ही धमाकेदार आणि ऐतिहासिक कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) श्रीमती मोनिका राऊत, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (सरकारवाडा विभाग) श्री. सुरवाडकर यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली झाली. तर मैदानावर 'बॅटिंग' करत बुलेटस्वारांना धडा शिकवण्याची जबरदस्त कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहा. पोलीस निरीक्षक निखिल पवार, हर्षल अहिरराव, तुषार देवरे, पोलीस उप निरीक्षक भारत पाटील आणि त्यांच्या डॅशिंग टीमने (गिरीश महाले, रवींद्र मोहिते, मच्छिंद्र वाकचौरे, सुजित जाधव, गोरख साळुंखे, राकेश राऊत, घनश्याम भोये, मुकेश आहिरे, प्रवीण केदारे, नवले) करून दाखवली आहे. *तात्पर्य:*पोलिसांचा रोड-रोलर फिरला, आणि बुलेटचा आवाज 'भुर्रर्र' झाला! आता कॉलेज रोडवर फक्त शांतता... आणि टवाळखोरांच्या मनात पोलिसांची दहशत!
    3
    ११२ कर्णकर्कश सायलेन्सरचा चपातीसारखा चुराडा; पोलिसांच्या 'सिंघम' स्टाईलपुढे 'टवाळखोरांची' हवा गुल!
नाशिक (खास प्रतिनिधी):
कॉलेज रोडवर एखाद्या 'हिरो'सारखी एंट्री मारून, 'डॅम-डॅम' असा कानाचे पडदे फाडणारा आवाज करत मिरवणाऱ्या आणि स्वतःला रस्त्यावरचे 'बॉस' समजणाऱ्या बुलेटस्वारांची आता चांगलीच 'हवा' निघाली आहे! लोकांच्या छातीत धडकी भरवणारे हे टवाळखोर आता गपगुमान 'सायकल' चालवल्यासारखी बुलेट चालवताना दिसत आहेत. कारण? गंगापूर पोलिसांनी त्यांच्या लाडक्या आणि कर्कश सायलेन्सरवरून चक्क भलामोठा 'रोड-रोलर' फिरवला आहे!
गेल्या काही दिवसांपासून कॉलेज रोडवर बुलेटच्या फटाक्यांनी नाशिककरांच्या नाकीनऊ आणले होते. म्हाताऱ्या-कोताऱ्यांची झोप उडवणाऱ्या आणि फक्त पोरींचे 'अटेन्शन' मिळवण्यासाठी कर्कश आवाज काढणाऱ्या या उपद्रवी बुलेटस्वारांचा माज उतरवण्यासाठी गंगापूर पोलिसांनी एक विशेष 'ऑपरेशन शांतता' राबवले. गुन्हेशोध पथकाने या ध्वनीप्रदूषण करणाऱ्या गाड्या शोधून काढल्या आणि त्यांचे मॉडीफाय केलेले सायलेन्सर चक्क उपटून काढले!
*११२ सायलेन्सरचा झाला पापड!*
३० एप्रिल २०२६ रोजी कॉलेज रोड पोलीस चौकीबाहेर एकच थरार पाहायला मिळाला. जप्त केलेले तब्बल ११२ सायलेन्सर रस्त्यावर एका रांगेत लावले होते. आणि मग... 'सिंघम'च्या स्टाईलमध्ये आला एक महाकाय रोड-रोलर! एका क्षणात त्या सर्व ११२ सायलेन्सरचा 'पापड' झाला. तो कर्रर्रर्र... कडाडणारा आवाज ऐकून आजूबाजूला उभ्या असलेल्या बुलेटस्वारांच्या डोळ्यांतून नक्कीच पाणी आले असेल! पण सर्वसामान्य नाशिककरांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र सुटकेचा निश्वास टाकत पोलिसांना कडक सॅल्युट ठोकला. 
**पुन्हा आवाज केला तर याद राखा!**
"यापुढे जर कोणी मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून 'हिरोगिरी' करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर याहूनही कडक आणि कठोर कारवाई होईल," असा सज्जड दम पोलिसांनी भरला आहे. त्यामुळे आता बुलेटवर 'फटाके' फोडण्याआधी या टवाळखोरांना १०० वेळा विचार करावा लागेल. 
ही धमाकेदार आणि ऐतिहासिक कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) श्रीमती मोनिका राऊत, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (सरकारवाडा विभाग) श्री. सुरवाडकर यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली झाली. तर मैदानावर 'बॅटिंग' करत बुलेटस्वारांना धडा शिकवण्याची जबरदस्त कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहा. पोलीस निरीक्षक निखिल पवार, हर्षल अहिरराव, तुषार देवरे, पोलीस उप निरीक्षक भारत पाटील आणि त्यांच्या डॅशिंग टीमने (गिरीश महाले, रवींद्र मोहिते, मच्छिंद्र वाकचौरे, सुजित जाधव, गोरख साळुंखे, राकेश राऊत, घनश्याम भोये, मुकेश आहिरे, प्रवीण केदारे, नवले) करून दाखवली आहे.
*तात्पर्य:*पोलिसांचा रोड-रोलर फिरला, आणि बुलेटचा आवाज 'भुर्रर्र' झाला! आता कॉलेज रोडवर फक्त शांतता... आणि टवाळखोरांच्या मनात पोलिसांची दहशत!
    user_Bhagwan Thorat
    Bhagwan Thorat
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नाशिक रोड स्थानकावर अयोध्या कॅन्ट–मुंबई (LTT) अमृत भारत एक्सप्रेसला आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या सेवेमुळे ८०० ते १००० रुपयांत भाविकांना अयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. प्रभू श्री रामांच्या जन्मभूमी अयोध्या आणि वनवासभूमी नाशिक यांना जोडणारी ही रेल्वे सेवा श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा सेतू ठरणार आहे. या उपक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.
    1
    नाशिक रोड स्थानकावर अयोध्या कॅन्ट–मुंबई (LTT) अमृत भारत एक्सप्रेसला आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या सेवेमुळे ८०० ते १००० रुपयांत भाविकांना अयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. प्रभू श्री रामांच्या जन्मभूमी अयोध्या आणि वनवासभूमी नाशिक यांना जोडणारी ही रेल्वे सेवा श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा सेतू ठरणार आहे. या उपक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर मधील पीर बाजार ते शान दर्गा रोडवरील अतिक्रमणे काढणे सुरू केले तसेच भाजीवाली बाई पुतळे जवळी अतिक्रमणे पाठवण्यात सुरू आहे मनपाची थेट कारवाई सुरू नागरिकांना रोजचा ट्रॅफिकचा कंटाळा दूर होणार रोड दुरुस्ती करणे व रोड मोठा करणे सुरू मनपाचा पुढील उद्दिष्टे व अतिक्रमणे हटवणे सुरू आहे तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार वाहनांची गर्दी होणार नाही या अनुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे सुरू आहे
    4
    छत्रपती संभाजी नगर मधील पीर बाजार ते शान दर्गा रोडवरील अतिक्रमणे काढणे सुरू केले तसेच भाजीवाली बाई पुतळे जवळी अतिक्रमणे पाठवण्यात सुरू आहे मनपाची थेट कारवाई सुरू नागरिकांना रोजचा ट्रॅफिकचा कंटाळा दूर होणार रोड दुरुस्ती करणे व रोड मोठा करणे सुरू मनपाचा पुढील उद्दिष्टे व अतिक्रमणे हटवणे सुरू आहे तेथील रहिवाशांना दिलासा मिळणार वाहनांची गर्दी होणार नाही या अनुषंगाने रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे सुरू आहे
    user_Sushil Navkar
    Sushil Navkar
    City Star Aurangabad, Maharashtra•
    11 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईत पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
    1
    धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईत पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. ​विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. ​यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.
    1
    शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले.
​विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर  यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले.
​यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.