Shuru
Apke Nagar Ki App…
त्या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला लिंबागणेश येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला "त्या वक्तव्यावरून "आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला लिंबागणेश येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला
AapTak Hindi News Channel
त्या वक्तव्यावरून आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला लिंबागणेश येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला "त्या वक्तव्यावरून "आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला लिंबागणेश येथे जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला
More news from महाराष्ट्र and nearby areas
- राज्यातील संजय गांधी निराधार योजना अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मिळणारे मानधन महिनाभर उलटून वीस दिवस झाले तरी त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. या मुळे दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शासनाकडून निधी इतर योजनांकडे वळवला जात असल्याची चर्चा सुरू असून, दिव्यांग व्यक्तींमध्ये या बाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी शासनाने महाइबीटी पोर्टल द्वारे अनुदान वितरित करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्या काळातही दोन महिन्यांचे मानधन वेळेवर न मिळाल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा मानधन रखडल्याने “हे निधी इतर योजनांकडे, विशेषतः ‘लाडक्या बहिणी’सारख्या योजनांकडे वळवले जात आहेत का?” असा सवाल दिव्यांग बांधवांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने स्पष्ट भूमिका घेऊन थकीत मानधन त्वरित वितरित करावे, अशी मागणी दिव्यांग संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने जोर धरत आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी हे मानधन केवळ आर्थिक सहाय्य नसून त्यांच्या दैनंदिन जगण्याचा आधार आहे. त्या मुळे अशा विलंबामुळे त्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. शासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाय योजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- बीड शहरातील सुभाष रोड भागात असणारे एका मोबाईल शॉपी मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत1
- चार घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट ! छत्रपती संभाजीनगरातील हरसुल-जटवडा रोडवर चारा घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे नुकसान झाले आहे.1
- TCS नासिक जैसा केस मुंबई में, मल्टिनैशल कंपनी का अशरफ सिद्दीकी गिरफ्तार, हिंदू लड़कियों को टारगेट करने का आरोप मुंबई पुलिस ने एक प्राइवेट कंपनी के कर्मचारी अशरफ को यौन उत्पीड़न और पीछा करने के आरोपों में गिरफ़्तार किया है। उस पर आरोप है कि उसने अपनी एक महिला सहकर्मी को अश्लील मैसेज भेजे थे। मुंबई पुलिस के एक सीनियर अधिकारी के मुताबिक, इस मामले में पीड़ित महिला एक कॉर्पोरेट कंपनी के लिए थर्ड-पार्टी टेली-कॉलर के तौर पर काम करती है। महाराष्ट्र के नासिक में कथित धर्मांतरण और यौन शोषण, फिर अमरावती में सेक्स स्कैंडल के खुलासे के बाद मुंबई से नया मामला सामने आया है। आरोप है कि एक अशरफ नाम का युवक कथित तौर पर कंपनी में साथ काम करने वाली हिंदू लड़कियों को टारगेट करता था। आरोपों के बाद मुंबई पुलिस ने युवक को गिरफ्तार कर लिया है। एक लड़की ने आरोप लगाया कि आरोपी उसके साथ अश्लील बात करता था। वह धर्म से जुड़ी हुई बातें भी करता था। मुंबई पुलिस के अधिकारियों ने बताया कि आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। आरोपी और पीड़िता जिस कंपनी में काम करते थे, वो कंपनी बंद हो गई है। आरोपी कंपनी में किसी बड़े पोस्ट पर नहीं था, बल्कि वह एक सहकर्मी था।1
- जालन्यात बँक घोटाळ्यांचे सत्र सुरूच! आता बदनापूर कॅनरा बँकेत 7 कोटी 31 लाखाचा घोटाळा ऊघड... लाॕकरमध्ये बनावट सोने आणि स्ट्राँग रूममधून पाकिटांची चोरी बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना बेड्या1
- शेतकऱ्यांच्या घामाची लूट आता थांबली पाहिजे! मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांमध्ये सुरू असलेला भ्रष्ट कारभार हा केवळ अन्याय नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टांचा अपमान आहे. कृषीप्रधान देश म्हणवणाऱ्या भारतात आजही शेतकरी आपल्या हक्कासाठी झगडतो आहे, ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. शासनाने तात्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा संभाजी ब्रिगेड तहसील कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन उभारेल, याची नोंद घ्यावी. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या कष्टांवर कुनालाही संभाजी ब्रिगेड डाका घालू देणार नाही! शेतकऱ्यांची अवलाद आमची शेतकरी बापावर अन्याय होऊ देणार नाही. ✊✊ जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩1
- जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. हिकमत उढाण हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. "नेता म्हणजे फक्त पद नाही, तर लोकांसाठी जगणारा माणूस" सान-थोरांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे, साधेपणातून माणुसकी जपणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व पुन्हा एकदा समोर आले आहे.1
- परवानगीच्या नावाखाली चांगतपुरी वाळू घाटावर अनाधिकृत वाळू उपसा; एजन्सी मालकाची गुंडगिरी आणि दहशत प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष परतूर तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील चांगतपुरी वाळू घाटावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी, जालना यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही तक्रार करण्यात आल्याचे समजते. निवेदनानुसार, चांगतपुरी वाळू घाटाचा ठेका मे. साई वेब एक्सप्रेस प्रा. लि. या एजन्सीस देण्यात आला असून, शासनाने घालून दिलेल्या ४८ अटी व शर्तींचा मोठ्या प्रमाणावर भंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घाटावर जेसीबी व पोकलेन यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अनाधिकृत उत्खनन सुरू असून, २५ ते ३० हायवा गाड्यांद्वारे २४ तास वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निवेदनात नमूद आहे. या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विविध माध्यमांतही याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान, संबंधित एजन्सीच्या मालकांकडून स्थानिक स्तरावर गुंडगिरी व दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “मोठ्या टक्केवारीचे पार्टनर आणि प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे महसूल यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महसूल कर्मचारी प्रत्यक्ष परिस्थिती पाहूनही वरिष्ठांना अहवाल सादर करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविल्यानंतर तहसीलदार, परतूर यांनी मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून अटी व शर्तींचा भंग झाल्यास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित मंडळ अधिकारी तेजश्री माळी यांनी अद्याप कोणताही ठोस अहवाल सादर केलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर अशीही चर्चा आहे की, संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणातून आर्थिक लाभ होत असल्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, एजन्सीचे प्रतिनिधी शाहाजी बनसारव सुंगर व इतर भागीदार संगनमताने राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वाळूची लूट करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करून वाळू घाटाचे टेंडर तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनासोबत उत्खननाचे छायाचित्रे व प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या प्रतीही सादर करण्यात आल्या आहेत. चांगतपुरी वाळू घाटावरील बेकायदेशीर उत्खनन तात्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच एजन्सीच्या गुंडगिरीला आळा घालावा, अशी ठाम मागणी प्रकाश सोळंके यांनी केली आहे.1
- बदनापूरः येथील कैनरा बैंक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने ठेवून बँकेची सुमारे ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे सहायक महाव्यवस्थापक श्री, केशवमूर्ती बी . व्ही. यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, बँकेचे अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि सुवर्ण मूल्यमापक याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेचा तपशीलः बँकेच्या धोरणानुसार सुरू असलेल्या सुबर्ण कर्ज पाकिटांच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान हा घोटाळा उपड इराला, २२ एप्रिल २०२६ रोजी तपासणी सुरू असताना काही पाकिटे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर केलेल्या सखोल चौकशीत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुख्य चौकः सोन्याची चोरी व बनावट दागिनेः तपासात एकूण २२ सुवर्ण कर्ज पाकिटांमध्ये बनावट सोने आढळले, ज्यांची किंमत ३.७९ कोटी रुपये आहे. तसेच, स्ट्रॉग रूममधून ३० सोन्याची पाकिटे (किंमत ३.५२ कोटी रुपये) गायब असल्याचे निषत्र झाले आहे. * सीसीटीव्ही फुटेजः २३ एप्रिल रोजी सकाळी ११:२० च्या सुमारास बँकेचे अधिकारी श्री. संजय डोंगरे हे स्ट्रॉग रूममधून सोन्याची पाकिटे चोरून खिशात ठेवत असल्याचे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. आरोपीची भूमिकाः तक्रारीनुसार, श्री. संजय डोंगरे (अधिकारी) यांनी प्रत्यक्ष चोरी केली. शाखा व्यवस्थापक श्री. विजेंद्र पाटणकर यांनी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून डोंगरे यांना स्ट्रॉग रूममध्ये एकटे सोडून कर्तव्यात कसूर केली, तर सुवर्ण मूल्यमापक श्री. प्रवीण बुन्हाडे यांनी बनावट सोन्याला खरे असल्याचे प्रमाणित करून बँकेची फसवणूक करण्यात साथ दिली म्हणून आरोपी नामे ।) शाखा व्यवस्थापक श्री. विजेंद्र पाटणकर, 2) श्री. संजय डोंगरे (बैंक अधिकारी), सुवर्ण मूल्यमापक श्री. प्रवीण बुन्हाडे यांचे वर कलम 316(5),318(4),316(2), 306,338,336(3),340(2),3(5) भारतीय न्याय संहीता प्रमाणे पोलीस ठाणे बदनापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई: बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी संगनमत करून पदाचा गैरवापर करत बँकेचा विश्वासघात केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई आणि रकमेची वसुली करण्याची मागणी बँकेतर्फे करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक श्री एम.टी. सुरवसे, पोलीस ठाणे बदनापुर हे करित आहे.3