logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

घरकुलाच्या याद्या कुठे दडवल्या...? आवास प्लसच्या नव्या याद्या ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावण्यास, ग्रामविकास अधिकाऱ्यांची ताडताळ.. दोन दिवसांत याद्या लावण्याची पूर्णाजी खोडके यांची मागणी घरकुलाच्या याद्या कुठे दडवल्या...? आवास प्लसच्या नव्या याद्या ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावण्यास, ग्रामविकास अधिकाऱ्यांची ताडताळ.. दोन दिवसांत याद्या लावण्याची पूर्णाजी खोडके यांची मागणी अकोट तालुका, प्रतिनिधी अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये आवास प्लस योजनेंतर्गत तयार झालेल्या नव्या घरकुल लाभार्थी याद्या नागरिकांसाठी सार्वजनिक करण्यात आल्या नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पूर्णाजी खोडके यांनी केला आहे. घरकुलाच्या यादीत आपले नाव आहे .की नाही, हेच नागरिकांना समजत नसताना अपीलची अंतिम मुदत जवळ येत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.... याप्रकरणी पूर्णाजी निरंजन खोडके यांनी दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज साद केला आहे. या तक्रारीच्या प्रती गटविकास अधिकारी, पंचायत समिती अकोट तसेच ग्रामविस्तार अधिकारी, पंचायत समिती अकोट यांच्याकडेही देण्यात आल्या आहेत... यादीच दाखवली नाही तर अपील कसे करणार? आवास प्लसच्या यादीत नाव नसलेल्या नागरिकांना ३० ऑगस्टपर्यंत तक्रार अथवा अपील करण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती आहे. मात्र अनेक गावांमध्ये संबंधित यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली नसेल, तर पात्र नागरिकांना आपले नाव वगळले आहे की नाही, हेच समजणार कसे? असा थेट सवाल पूर्णाजी खोडके यांनी उपस्थित केला आहे.. “यादी नागरिकांच्या डोळ्यासमोरच नसेल, तर गरीब नागरिकांनी आपला हक्क मागायचा तरी कसा?” असा संतप्त प्रश्न त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. ग्रामसभा घेतल्या का? तक्रारीत संबंधित गावांमध्ये आवास प्लसच्या यादीबाबत ग्रामसभा घेण्यात आली का, 15 ऑगस्ट रोजी नागरिकांसमोर यादी वाचून दाखविण्यात आली का आणि पात्र-अपात्र लाभार्थ्यांना आक्षेप अथवा अपील करण्याची माहिती देण्यात आली का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे... काही गावांमध्ये नागरिकांनी संबंधित ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांकडे यादीची मागणी करूनही दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी केल्याचे खोडके यांनी अर्जात नमूद केले आहे... दोन दिवसांत सर्व याद्या सार्वजनिक करा! पूर्णाजी खोडके यांनी अकोट तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये आणि नोटीस बोर्डवर आवास प्लसच्या नव्या याद्या तातडीने दोन दिवसांत लावण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.... तसेच संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देऊन यादी सार्वजनिक करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.. “घरकुल हा गरीबांचा हक्क आहे!” याबाबत पूर्णाजी खोडके म्हणाले, “घरकुल हा गरीब आणि गरजू कुटुंबांच्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. लाभार्थी यादीच सार्वजनिक केली नाही, तर नागरिकांना आपले नाव आहे की नाही हे कसे कळणार? ३० ऑगस्टची अंतिम मुदत जवळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता सर्व याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावाव्यात.” ते पुढे म्हणाले, “सर्व गावांमध्ये यादी सार्वजनिक करून नागरिकांना त्यांचा आक्षेप व अपील करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनातून निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील... अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष तक्रार थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व गटविकास अधिकारी अकोट यांच्याकडे करण्यात आल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे अकोट तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.. घरकुलाच्या याद्या ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर झळकणार की पुन्हा कागदोपत्रीच कारभार सुरू राहणार? हा प्रश्न सध्या अकोट तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे....

23 hrs ago
user_राजकुमार वानखडे राज
राजकुमार वानखडे राज
News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
23 hrs ago
fb6ee0c3-3e01-47a3-bff8-36d47a8837dc

घरकुलाच्या याद्या कुठे दडवल्या...? आवास प्लसच्या नव्या याद्या ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावण्यास, ग्रामविकास अधिकाऱ्यांची ताडताळ.. दोन दिवसांत याद्या लावण्याची पूर्णाजी खोडके यांची मागणी घरकुलाच्या याद्या कुठे दडवल्या...? आवास प्लसच्या नव्या याद्या ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावण्यास, ग्रामविकास अधिकाऱ्यांची ताडताळ.. दोन दिवसांत याद्या लावण्याची पूर्णाजी खोडके यांची मागणी अकोट तालुका, प्रतिनिधी अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये आवास प्लस योजनेंतर्गत तयार झालेल्या नव्या घरकुल लाभार्थी याद्या नागरिकांसाठी सार्वजनिक करण्यात आल्या नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पूर्णाजी खोडके यांनी केला आहे. घरकुलाच्या यादीत आपले नाव आहे .की नाही, हेच नागरिकांना समजत नसताना अपीलची अंतिम मुदत जवळ येत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.... याप्रकरणी पूर्णाजी निरंजन खोडके यांनी दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज साद केला आहे. या तक्रारीच्या प्रती गटविकास अधिकारी, पंचायत समिती अकोट तसेच ग्रामविस्तार अधिकारी, पंचायत समिती अकोट यांच्याकडेही देण्यात आल्या आहेत... यादीच दाखवली नाही तर अपील कसे करणार? आवास प्लसच्या यादीत नाव नसलेल्या नागरिकांना ३० ऑगस्टपर्यंत तक्रार अथवा

6f0a9a3d-4b6a-4e1f-b821-390e3d28c2ca

अपील करण्याची अंतिम मुदत असल्याची माहिती आहे. मात्र अनेक गावांमध्ये संबंधित यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली नसेल, तर पात्र नागरिकांना आपले नाव वगळले आहे की नाही, हेच समजणार कसे? असा थेट सवाल पूर्णाजी खोडके यांनी उपस्थित केला आहे.. “यादी नागरिकांच्या डोळ्यासमोरच नसेल, तर गरीब नागरिकांनी आपला हक्क मागायचा तरी कसा?” असा संतप्त प्रश्न त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. ग्रामसभा घेतल्या का? तक्रारीत संबंधित गावांमध्ये आवास प्लसच्या यादीबाबत ग्रामसभा घेण्यात आली का, 15 ऑगस्ट रोजी नागरिकांसमोर यादी वाचून दाखविण्यात आली का आणि पात्र-अपात्र लाभार्थ्यांना आक्षेप अथवा अपील करण्याची माहिती देण्यात आली का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे... काही गावांमध्ये नागरिकांनी संबंधित ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांकडे यादीची मागणी करूनही दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी केल्याचे खोडके यांनी अर्जात नमूद केले आहे... दोन दिवसांत सर्व याद्या सार्वजनिक करा! पूर्णाजी खोडके यांनी अकोट तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये आणि नोटीस बोर्डवर आवास प्लसच्या नव्या याद्या तातडीने दोन दिवसांत लावण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.... तसेच संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देऊन

e4fecb1c-737c-4c50-91ef-fedf8febfe65

यादी सार्वजनिक करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.. “घरकुल हा गरीबांचा हक्क आहे!” याबाबत पूर्णाजी खोडके म्हणाले, “घरकुल हा गरीब आणि गरजू कुटुंबांच्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. लाभार्थी यादीच सार्वजनिक केली नाही, तर नागरिकांना आपले नाव आहे की नाही हे कसे कळणार? ३० ऑगस्टची अंतिम मुदत जवळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता सर्व याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावाव्यात.” ते पुढे म्हणाले, “सर्व गावांमध्ये यादी सार्वजनिक करून नागरिकांना त्यांचा आक्षेप व अपील करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनातून निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील... अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष तक्रार थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व गटविकास अधिकारी अकोट यांच्याकडे करण्यात आल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे अकोट तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.. घरकुलाच्या याद्या ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर झळकणार की पुन्हा कागदोपत्रीच कारभार सुरू राहणार? हा प्रश्न सध्या अकोट तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे....

  • user_पुर्णाजी खोडके
    पुर्णाजी खोडके
    अकोले, अकोला, महाराष्ट्र
    thank you 🙏
    5 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    1
    सोनोरी फाट्यावर कार दोन डिव्हायडरवर आदळली सहा जण गंभीर
ब्रेकिंग अकोला : आज दुपारी एकच्या सुमारास बोरगाव मंजूकडून मुर्तीजापूरकडे जाणारी एमएच ३० बीडब्ल्यू ९९९४ क्रमांकाची कार सोनोरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बुलढाणा अर्बन गोडाऊन परिसरातील वळणावर डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली. पलटी होताना कारच्या मागील बाजूने दुसऱ्या साईडच्या डिव्हायडरलाही भयंकर धडक दिल्याने वाहनाचे दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले. कारमध्ये दोन महिला दोन पुरुष व दोन लहान मुले असे सहा जण होते. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुसळधार पावसात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने अकोला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. राष्ट्रीय महामार्ग आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
    user_Santosh Mane
    Santosh Mane
    मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    4
    ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च


खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. ​हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. ​शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके.. ‎
    1
    मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मानवजातीच्या कल्याणासाठी सुखकर - आमदार सुलभा खोडके..
‎
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    9 min ago
  • हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक 26/08/26 कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले. या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    4
    हजरत मोहम्मद पैगंबर
 यांच्या जयंतीनिमित्त 
 आज दिनांक
26/08/26

कारंजा येथे एकोपा आणि उत्साहाची रॅली
कारंजा, महाराष्ट्र - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त कारंजा शहरात एक भव्य आणि उत्साहाने भारलेली रॅली काढण्यात आली. या रॅलीने केवळ धार्मिक सलोखाच नव्हे, तर सामाजिक एकोपा आणि सामुदायिक बांधिलकीचे एक सुंदर उदाहरण सादर केले. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

या रॅलीमध्ये समाजसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सर यांच्यासह निसार वहीद भाई, काँग्रेसचे कारंजा शहर अध्यक्ष अब्दुल राजीक आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून, सर्वपक्षीय नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पैगंबर जयंतीचा हा पवित्र सोहळा साजरा केला, हे विशेष उल्लेखनीय होते. त्यांच्या उपस्थितीने रॅलीला एक सामाजिक आणि राजकीय वजन प्राप्त झाले.

या प्रसंगी कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर चौरे आणि पीएसआय खान साहेब यांची उपस्थिती लक्षवेधी होती. त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीच सांभाळली नाही, तर स्वतः या सोहळ्यात सहभागी होऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे हे समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आणि कार्यक्रमाला एक अधिकृत स्वरूप प्राप्त झाले.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 'साहब' आणि 'साहेब' या संबोधनांनी एकमेकांचा आदर व्यक्त करत, त्यांनी या पवित्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा केवळ एक धार्मिक उत्सव नव्हता, तर तो सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकोप्याचा संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण प्रसंग होता.

पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार, प्रेम, शांती आणि मानवतेचा संदेश या रॅलीतून सर्वदूर पोहोचवण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजात सलोखा वाढतो आणि विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करतात, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळते. कारंजा शहरातील या रॅलीने हेच सिद्ध केले की, धर्म कोणताही असो, सलोखा आणि एकोपा हेच मानवी जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत.
    user_अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    Carpenter कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    2
    *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड*


वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे
वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
    1
    रावेरच्या वैशाली लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी बेकायदेशीरपणे रूममध्ये आढळली..! 
वैशाली लॉजिंगमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस..! मॅनेजरसह दोघे अटकेत
रावेर पोलिसांची हॉटेल-लॉजिंग तपासणीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी व तरुणाला कोणतेही ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये नोंद न करता रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी वैशाली लॉजिंगच्या मॅनेजरसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
    user_R Media
    R Media
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन, आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....
    1
    चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन,
आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास* वाशिम मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    2
    *अनोखी चोरी डीपी फोडून आतील साहित्य चोरट्यांनी केले लंपास*

वाशिम
मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुर्जना मोरे-मजलापूर परिसरात २४ ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपी फोडून त्यामधील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची अनोखी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्युत विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विद्युत डीपीला लक्ष्य केले. चोरट्यांनी डीपीची तोडफोड करून त्यातील साहित्य बाहेर काढले आणि ते चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास डीपी फुटलेल्या अवस्थेत आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित विद्युत विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याने परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्युत यंत्रणेची तोडफोड करून चोरी करण्यात आल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांनी नेमके कोणते साहित्य आणि किती प्रमाणात चोरून नेले, तसेच या घटनेत किती रुपयांचे नुकसान झाले, हे संबंधित विभागाकडून पंचनामा व तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागात विद्युत डीपी, तारा व इतर विद्युत साहित्य चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत विभागाने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.