logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

"समाजकार्य विभाग आयोजित "जागर नारीशक्तीचा’ कार्यक्रम खर्ची येथे उत्साहात संपन्न. खर्ची: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सामाजिक शास्त्रे प्रशाळा, समाजकार्य विभाग, माध्यमिक विद्यालय व महिला मंडळ खर्ची यांच्या माध्यमातून समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘जागर नारीशक्तीचा’ हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समाजकार्य विभाग दरवर्षी महिला सप्ताह मोठया उत्साहात साजरा करीत असतो. यावर्षी देखील विविध विद्यार्थीहिताचे कार्यक्रम विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यात मैदानी क्रीडा स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन तसेच खर्ची येथे उदबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच सौ.आशाताई महाजन या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून मा श्री नानाभाऊ महाजन (मा जि प सदस्य) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून सुचित्रा महाजन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर समाजकार्यच्या विद्यार्थ्यांनी यज्ञासेनी चौधरी व वैशाली कोळी यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका वर्षा पालखे यांनी केले. प्रमुख वक्त्या सुचित्रा महाजन मॅडम यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या संघर्षमय कार्याचा आढावा घेत महिलांच्या सशक्तीकरणासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. व उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी स्वप्न बघा कारण बघितलेलं स्वप्न सत्यात उतरते आणि ध्येय साध्य करायला मदत होते. महिलांनी शिक्षण, सामाजिक कार्य, प्रशासन व विविध क्षेत्रांत केलेली उल्लेखनीय प्रगती विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी श्री नानाभाऊ महाजन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणातूनच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे प्रतिपादन केले. यावेळी सीमाताई माळी, अल्काताई माळी, विद्यालयाच्या उपशिक्षिका लोखंडे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच आशाताई माळी यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमात समाजकार्याचे विद्यार्थी :- यज्ञासेनी चौधरी, वैशाली कोळी, धनश्री शिरसाठ, कोमल शिरसाठ, गजानन बोरसे, अजय निकम,आनंद जैस्वाल, राहुल बागुल, गौरव वाकोडे यांनी नारी शक्तीवर आधारित पथनाट्य सादर केले. तसेच समाजकार्यच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण केले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी गावात रॅली काढून गावात नारी शक्ती याविषयावर घोषणा व स्लोगन च्या माध्यमातून जनजागृती केली. कार्यक्रमामुळे स्त्रीशक्तीबद्दल जागरूकता निर्माण होऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली यावेळी व्यासपीठावर उत्तम महाजन,महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे समाजकार्य विभागाचे प्राध्यापक प्रा. योगेश माळी सर. प्रा. विनेश पावरा सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल माळी सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. प्रा. योगेश माळी यांनी केले. तर प्रा. विनेश पावरा यांनी आभार मानले कार्यक्रमास दगडू महाजन, विठ्ठल महाजन, भुरा महाजन, रामचंद्र महाजन, नवल माळी, श्री. प्रशांत सूर्यवंशी गांधी रिसर्च फॉउंडेशन, ऍडव्होकेट रोहन महाजन, गावातील महिला, युवती, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
4 hrs ago
e38473ef-2a7e-4f94-b66d-e5800a52566b

"समाजकार्य विभाग आयोजित "जागर नारीशक्तीचा’ कार्यक्रम खर्ची येथे उत्साहात संपन्न. खर्ची: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सामाजिक शास्त्रे प्रशाळा, समाजकार्य विभाग, माध्यमिक विद्यालय व महिला मंडळ खर्ची यांच्या माध्यमातून समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘जागर नारीशक्तीचा’ हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समाजकार्य विभाग दरवर्षी महिला सप्ताह मोठया उत्साहात साजरा करीत असतो. यावर्षी देखील विविध विद्यार्थीहिताचे कार्यक्रम विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्यात मैदानी क्रीडा स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन तसेच खर्ची येथे उदबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच सौ.आशाताई महाजन या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून मा श्री नानाभाऊ महाजन (मा जि प सदस्य) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून सुचित्रा महाजन मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर समाजकार्यच्या विद्यार्थ्यांनी यज्ञासेनी चौधरी व वैशाली कोळी यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका वर्षा पालखे यांनी केले. प्रमुख वक्त्या सुचित्रा महाजन मॅडम यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या संघर्षमय कार्याचा आढावा घेत महिलांच्या सशक्तीकरणासाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. व उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी स्वप्न बघा कारण बघितलेलं स्वप्न सत्यात उतरते आणि ध्येय साध्य करायला मदत होते. महिलांनी शिक्षण, सामाजिक कार्य, प्रशासन व विविध

64793c3a-6eb5-43cf-be3a-dbd8b530eea4

क्षेत्रांत केलेली उल्लेखनीय प्रगती विद्यार्थ्यांसमोर मांडून त्यांनी विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी श्री नानाभाऊ महाजन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणातूनच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे प्रतिपादन केले. यावेळी सीमाताई माळी, अल्काताई माळी, विद्यालयाच्या उपशिक्षिका लोखंडे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच आशाताई माळी यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमात समाजकार्याचे विद्यार्थी :- यज्ञासेनी चौधरी, वैशाली कोळी, धनश्री शिरसाठ, कोमल शिरसाठ, गजानन बोरसे, अजय निकम,आनंद जैस्वाल, राहुल बागुल, गौरव वाकोडे यांनी नारी शक्तीवर आधारित पथनाट्य सादर केले. तसेच समाजकार्यच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण केले. तसेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी गावात रॅली काढून गावात नारी शक्ती याविषयावर घोषणा व स्लोगन च्या माध्यमातून जनजागृती केली. कार्यक्रमामुळे स्त्रीशक्तीबद्दल जागरूकता निर्माण होऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली यावेळी व्यासपीठावर उत्तम महाजन,महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे समाजकार्य विभागाचे प्राध्यापक प्रा. योगेश माळी सर. प्रा. विनेश पावरा सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल माळी सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. प्रा. योगेश माळी यांनी केले. तर प्रा. विनेश पावरा यांनी आभार मानले कार्यक्रमास दगडू महाजन, विठ्ठल महाजन, भुरा महाजन, रामचंद्र महाजन, नवल माळी, श्री. प्रशांत सूर्यवंशी गांधी रिसर्च फॉउंडेशन, ऍडव्होकेट रोहन महाजन, गावातील महिला, युवती, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुळे शहरात 8 जून 2018 रोजी घडलेल्या गाजलेल्या रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणाचा अंतिम फैसला उद्यावर ढकलण्यात आला आहे. या प्रकरणात धुळ्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 12 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता असल्यामुळे धुळे जिल्हा न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. मात्र न्यायमूर्तींनी अंतिम निर्णय उद्या जाहीर करण्याचे निश्चित केले.
    1
    धुळे शहरात 8 जून 2018 रोजी घडलेल्या गाजलेल्या रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणाचा अंतिम फैसला उद्यावर ढकलण्यात आला आहे. या प्रकरणात धुळ्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 12 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
आज आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता असल्यामुळे धुळे जिल्हा न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. मात्र न्यायमूर्तींनी अंतिम निर्णय उद्या जाहीर करण्याचे निश्चित केले.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    24 min ago
  • सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे सोयगाव प्रतिनिधी : सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे
सोयगाव प्रतिनिधी :
सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.
मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे  नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख
    1
    सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख
    user_Mujeeb Shaikh
    Mujeeb Shaikh
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    54 min ago
  • जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव या सोळाव्याला मोठ्या संख्येने पर्यटकासह भाविकांना अनुभवयास मिळाला. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती आले. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल..
    1
    जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव या सोळाव्याला मोठ्या संख्येने पर्यटकासह भाविकांना अनुभवयास मिळाला. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती  आले. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल..
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती
    1
    लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती
    user_SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • क्रांती चौकात 'पुतळा युद्ध'! आंदोलकांचा एल्गार की पोलिसांची धावपळ? सत्तेच्या रक्षणार्थ खाकी मैदानात! ​छत्रपती संभाजीनगर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार देशासाठी 'धोकादायक' असल्याचा गंभीर आरोप करत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जो 'हायव्होल्टेज ड्रामा' रंगला, त्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. आंदोलकांनी निषेधाचा पुतळा उगारला खरा, पण तो जाळण्यापूर्वीच पोलिसांनी जो 'मॅरेथॉन' धावण्याचा पराक्रम केला, तो पाहून उपस्थित नागरिकही अवाक झाले. ​ सवाल: लोकशाही की दडपशाही? ​या घटनेनंतर आता काही ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहेत: १. जनतेचा आक्रोश पुतळ्यातच अडकलाय का? जनतेचा निषेध नोंदवण्याचा हक्क पोलिसांच्या बळावर किती काळ दाबला जाणार? २. पोलिसांची ही 'धाव' कोणासाठी? पुतळा वाचवण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तीच तत्परता शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी का दिसत नाही? ३. सरकार खरोखरच 'धोकादायक' वळणावर आहे का? वंचितच्या आरोपांमध्ये तथ्य आहे की हे केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन? ​ काय घडलं नेमकं? ​आज, ११ मार्च २०२६ रोजी क्रांती चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पंतप्रधान मोदींचा पुतळा मैदानात आणला. "देश वाचवा, संविधान वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी पुतळा पेटवण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी जी झटापट केली ती एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती. आंदोलकांच्या हातातून पुतळा हिसकावून घेऊन पोलीस कर्मचारी अक्षरशः धावत सुटले. जणू काही एखादा जिवंत माणूस वाचवण्यासाठी ही धावपळ होती! ​वाहतुकीचा खोळंबा की प्रशासनाचे अपयश? ​तासभर जालना रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक उन्हात होरपळत होते. पण प्रशासनाला मात्र आंदोलकांचे आवाज दाबण्यात आणि पुतळ्याचे रक्षण करण्यातच जास्त रस दिसला. ​कार्यकर्त्यांचा पवित्रा स्पष "आमचा आवाज दाबाल, पण विचारांना कसं रोखाल?" ​सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे आंदोलन आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. ​प्रतिनिधी: गौतम हिवराळे
    1
    क्रांती चौकात 'पुतळा युद्ध'! आंदोलकांचा एल्गार की पोलिसांची धावपळ? सत्तेच्या रक्षणार्थ खाकी मैदानात!
​छत्रपती संभाजीनगर 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार देशासाठी 'धोकादायक' असल्याचा गंभीर आरोप करत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जो 'हायव्होल्टेज ड्रामा' रंगला, त्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. आंदोलकांनी निषेधाचा पुतळा उगारला खरा, पण तो जाळण्यापूर्वीच पोलिसांनी जो 'मॅरेथॉन' धावण्याचा पराक्रम केला, तो पाहून उपस्थित नागरिकही अवाक झाले.
​  सवाल: लोकशाही की दडपशाही?
​या घटनेनंतर आता काही ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहेत:
१. जनतेचा आक्रोश पुतळ्यातच अडकलाय का? जनतेचा निषेध नोंदवण्याचा हक्क पोलिसांच्या बळावर किती काळ दाबला जाणार?
२. पोलिसांची ही 'धाव' कोणासाठी? पुतळा वाचवण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तीच तत्परता शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी का दिसत नाही?
३. सरकार खरोखरच 'धोकादायक' वळणावर आहे का? वंचितच्या आरोपांमध्ये तथ्य आहे की हे केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन?
​ काय घडलं नेमकं?
​आज, ११ मार्च २०२६ रोजी क्रांती चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पंतप्रधान मोदींचा पुतळा मैदानात आणला. "देश वाचवा, संविधान वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी पुतळा पेटवण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी जी झटापट केली ती एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती. आंदोलकांच्या हातातून पुतळा हिसकावून घेऊन पोलीस कर्मचारी अक्षरशः धावत सुटले. जणू काही एखादा जिवंत माणूस वाचवण्यासाठी ही धावपळ होती!
​वाहतुकीचा खोळंबा की प्रशासनाचे अपयश?
​तासभर जालना रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक उन्हात होरपळत होते. पण प्रशासनाला मात्र आंदोलकांचे आवाज दाबण्यात आणि पुतळ्याचे रक्षण करण्यातच जास्त रस दिसला.
​कार्यकर्त्यांचा पवित्रा स्पष "आमचा आवाज दाबाल, पण विचारांना कसं रोखाल?"
​सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे आंदोलन आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
​प्रतिनिधी:
गौतम हिवराळे
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • #marathi#newsjalna#
    1
    #marathi#newsjalna#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    15 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.
    1
    धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.