Shuru
Apke Nagar Ki App…
Dhule News 24 | गॅस टंचाईचा फटका; शिरपूर मध्ये हॉटेल चालकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ... धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.
Dhule News 24
Dhule News 24 | गॅस टंचाईचा फटका; शिरपूर मध्ये हॉटेल चालकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ... धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.1
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- शहरात सायलेन्सरमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, अशा हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून येवला शहरातील मुख्य रस्ते, शाळा-महाविद्यालय परिसर आणि निवासी भागांत सुधारित सायलेन्सर लावलेल्या बुलेटचा सुळसुळाट वाढला आहे. या आवाजाचा लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः 'नो हॉर्न' झोन आणि हॉस्पिटल परिसरातही नियमांची पायमल्ली होत असून, रस्त्यावरून चालणाऱ्या महिला व युवतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अशा वाहनधारकांचा शोध घेऊन पोलिसांनी तात्काळ मोहीम राबवावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना गट नेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, सागर शिंदे, नितीन कायस्थ, सुभाष गांगुर्डे यांसह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.1