logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आजची जागरूकता उद्याचा सशक्त समाज घडवते - डॉ. गिरीश देसाई दीर्घायुष्य साठी आरोग्याचे मापदंड पाळणे आवश्यक - पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे पीसीयू मध्ये न्यूट्रीसोल कार्यक्रम संपन्न पिंपरी दि.१७ फेब्रुवारी २०२६ न्यूट्रीसोल हा नाविन्यपूर्ण आणि बहुविद्याशाखीय उपक्रम आहे.यामध्ये पोषण, मानसशास्त्र,भावनिक कल्याण,सर्जनशीलता आणि अनुभवात्मक शिक्षण एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळेल. पारंपारिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग व संवादातून या व्यासपीठावरून विचारांची देवाणघेवाण करत शिक्षण मिळेल.न्यूट्रीसोल या उपक्रमाचा विस्तार आगामी काळात चळवळ म्हणून महाराष्ट्रभर केला पाहिजे.आजारात उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी असते. आजची जागरूकता उद्याचा सशक्त समाज घडवते असे डॉ.गिरीश देसाई यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे "न्यूट्रीसोल २०२६" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पीसीयूचे प्र-कुलगुरु डॉ.सुदीप थेपडे,स्कूल ऑफ सायन्सच्या अधिष्ठाता प्रा.रुचू कूथीयाला, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी,महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च प्राचार्य डॉ.दीपा नायर आदी उपस्थित होते. यावेळी "न्यूट्रीसोल २०२६ हेल्दी लाईफ स्टाईल कॅलेंडर" चे प्रकाशन आणि स्कूल ऑफ सायन्सेस,पीसीयू आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.यामुळे सार्वजनिक आरोग्य, आंतरशाखीय शिक्षण आणि आरोग्य जनजागृती उपक्रमांना चालना मिळणार आहे. तसेच मानसशास्त्र व पोषण शास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्राशी प्रत्यक्ष संलग्न अनुभव संधी उपलब्ध होतील. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनाचे संतुलन आणि निरामय, निरोगी दीर्घायुष्य साठी आधुनिक धावपळीच्या काळामध्ये आहार आणि आरोग्याचे मापदंड पाळणे आवश्यक आहे.सर्वांगीण आरोग्य म्हणजे शारीरिक,मानसिक,भावनिक संतुलन हे आपल्या जीवनशैली वर अवलंबून आहे असे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संतोष सोनवणे यांनी सांगितले. प्रास्ताविक मध्ये प्रा.रुचू कूथीयाला यांनी सांगितले की,न्यूट्रीसोल २०२६ मध्ये माहितीपूर्ण व संवादात्मक आरोग्य स्टॉल्स,मानसशास्त्र व पोषणावर आधारित उपक्रम,सहभाग वाढविणारे खेळ,थेरप्यूटिक स्ट्रीट अंतर्गत मार्गदर्शन उपचार व अनुभव,आहार तपासणी व पोषण जनजागृती,संतुलित व विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यामुळे न्यूट्रीसोल २०२६ हा उपक्रम मन,शरीर आणि समाजासाठी सर्वांगीण आरोग्य साजरा करणारा उत्सव ठरला.अन्न साक्षरता,संतुलित आहार,प्रतिबंधात्मक आरोग्य, जागरूकता,मानसशास्त्र,भावनिक बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व शोध,आत्मचिंतन या विषयांवर विविध उपक्रम सादर करण्यात आले. या उपक्रमास ३५०० विद्यार्थ्यांनी भेट दिली.रील मेकिंग,पोस्टर मेकिंग,प्रश्नोत्तरे, नाटक सादरीकरण या स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाला आयफिल इन्स्टिट्यूट,ब्राह्मणवाडी समुदाय तसेच अंगणवाडी आणि वृद्धाश्रमाचे प्रतिनिधी यांनी भेट दिली. पीसीयू - राहत क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला न्यूचेन्क,धांडे पॅथलॅब,इन बॉडी,पी अँड जी यांचे सहकार्य मिळाले. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) कुलपती हर्षवर्धन पाटील,पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्षा पद्माताई भोसले,सचिव विठ्ठल काळभोर,खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई,व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर,नरेंद्र लांडगे यांनी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

2 hrs ago
user_City Mirror News
City Mirror News
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
f694b2e4-dadb-4d76-bf7b-3857bc5e6824

आजची जागरूकता उद्याचा सशक्त समाज घडवते - डॉ. गिरीश देसाई दीर्घायुष्य साठी आरोग्याचे मापदंड पाळणे आवश्यक - पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे पीसीयू मध्ये न्यूट्रीसोल कार्यक्रम संपन्न पिंपरी दि.१७ फेब्रुवारी २०२६ न्यूट्रीसोल हा नाविन्यपूर्ण आणि बहुविद्याशाखीय उपक्रम आहे.यामध्ये पोषण, मानसशास्त्र,भावनिक कल्याण,सर्जनशीलता आणि अनुभवात्मक शिक्षण एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळेल. पारंपारिक पद्धतीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग व संवादातून या व्यासपीठावरून विचारांची देवाणघेवाण करत शिक्षण मिळेल.न्यूट्रीसोल या उपक्रमाचा विस्तार आगामी काळात चळवळ म्हणून महाराष्ट्रभर केला पाहिजे.आजारात उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक प्रभावी असते. आजची जागरूकता उद्याचा सशक्त समाज घडवते असे डॉ.गिरीश देसाई यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे "न्यूट्रीसोल २०२६" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पीसीयूचे प्र-कुलगुरु डॉ.सुदीप थेपडे,स्कूल ऑफ सायन्सच्या अधिष्ठाता प्रा.रुचू कूथीयाला, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी,महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च प्राचार्य डॉ.दीपा नायर आदी उपस्थित होते. यावेळी "न्यूट्रीसोल २०२६ हेल्दी लाईफ स्टाईल कॅलेंडर" चे प्रकाशन आणि स्कूल ऑफ सायन्सेस,पीसीयू आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.यामुळे सार्वजनिक आरोग्य, आंतरशाखीय शिक्षण आणि आरोग्य जनजागृती उपक्रमांना चालना मिळणार आहे. तसेच मानसशास्त्र व पोषण शास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्राशी

481b4345-f132-4a14-9801-091e52b04bf1

प्रत्यक्ष संलग्न अनुभव संधी उपलब्ध होतील. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनाचे संतुलन आणि निरामय, निरोगी दीर्घायुष्य साठी आधुनिक धावपळीच्या काळामध्ये आहार आणि आरोग्याचे मापदंड पाळणे आवश्यक आहे.सर्वांगीण आरोग्य म्हणजे शारीरिक,मानसिक,भावनिक संतुलन हे आपल्या जीवनशैली वर अवलंबून आहे असे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संतोष सोनवणे यांनी सांगितले. प्रास्ताविक मध्ये प्रा.रुचू कूथीयाला यांनी सांगितले की,न्यूट्रीसोल २०२६ मध्ये माहितीपूर्ण व संवादात्मक आरोग्य स्टॉल्स,मानसशास्त्र व पोषणावर आधारित उपक्रम,सहभाग वाढविणारे खेळ,थेरप्यूटिक स्ट्रीट अंतर्गत मार्गदर्शन उपचार व अनुभव,आहार तपासणी व पोषण जनजागृती,संतुलित व विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यामुळे न्यूट्रीसोल २०२६ हा उपक्रम मन,शरीर आणि समाजासाठी सर्वांगीण आरोग्य साजरा करणारा उत्सव ठरला.अन्न साक्षरता,संतुलित आहार,प्रतिबंधात्मक आरोग्य, जागरूकता,मानसशास्त्र,भावनिक बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व शोध,आत्मचिंतन या विषयांवर विविध उपक्रम सादर करण्यात आले. या उपक्रमास ३५०० विद्यार्थ्यांनी भेट दिली.रील मेकिंग,पोस्टर मेकिंग,प्रश्नोत्तरे, नाटक सादरीकरण या स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाला आयफिल इन्स्टिट्यूट,ब्राह्मणवाडी समुदाय तसेच अंगणवाडी आणि वृद्धाश्रमाचे प्रतिनिधी यांनी भेट दिली. पीसीयू - राहत क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला न्यूचेन्क,धांडे पॅथलॅब,इन बॉडी,पी अँड जी यांचे सहकार्य मिळाले. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) कुलपती हर्षवर्धन पाटील,पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे,उपाध्यक्षा पद्माताई भोसले,सचिव विठ्ठल काळभोर,खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई,व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर,नरेंद्र लांडगे यांनी सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
    1
    अंधाऱ्या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाई.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली
    1
    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी ' पिंचिं विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Classified ads newspaper publisher पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Shrinivas mane
    4
    Post by Shrinivas mane
    user_Shrinivas mane
    Shrinivas mane
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुण्यात काँग्रेस आणि पोलिस प्रशासनात तणाव वाढताना दिसतो आहे. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी करत काँग्रेस आक्रमक झाली आहे. अरविंद शिंदे यांनी आरोप केला आहे की, पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांची नावे एफआयआरमध्ये टाकण्यात आली. मात्र, याच प्रकरणात महापौरांचे नाव तक्रारीतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसकडून लवकरच पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. “पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून आमची नावे एफआयआरमध्ये टाकण्यात आली आहेत. आमच्यावर अन्याय होत आहे. महापौरांचे नाव मात्र तक्रारीतून वगळण्यात आले. या अन्यायाविरोधात आम्ही लवकरच मोर्चा काढणार असून पोलीस आयुक्तांची बदली होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील.” दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे लवकरच पुणे दौऱ्यावर येणार असून या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    पुण्यात काँग्रेस आणि पोलिस प्रशासनात तणाव वाढताना दिसतो आहे. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी करत काँग्रेस आक्रमक झाली आहे.
अरविंद शिंदे यांनी आरोप केला आहे की, पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांची नावे एफआयआरमध्ये टाकण्यात आली. मात्र, याच प्रकरणात महापौरांचे नाव तक्रारीतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
काँग्रेसकडून लवकरच पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
“पोलीस आयुक्तांच्या सांगण्यावरून आमची नावे एफआयआरमध्ये टाकण्यात आली आहेत. आमच्यावर अन्याय होत आहे. महापौरांचे नाव मात्र तक्रारीतून वगळण्यात आले. या अन्यायाविरोधात आम्ही लवकरच मोर्चा काढणार असून पोलीस आयुक्तांची बदली होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील.”
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे लवकरच पुणे दौऱ्यावर येणार असून या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Pimpri Chinchwad City News
    Pimpri Chinchwad City News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पिंपरी, दि.१६ फेब्रुवारी २०२६ चिंचवड येथील भाट नगर परिसरात आज सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास एका अॅक्रिलिक दुकानात आग लागल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. थेरगाव उप अग्निशमन केंद्र , नेहरूनगर उप अग्निशमन केंद्र तसेच मुख्य अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ रवाना करण्यात आल्या. घटनेची माहिती घेऊन जवानांनी शिताफिने आग नियंत्रणात आणली. आगीमुळे संबंधित अॅक्रिलिक दुकान पूर्णतः जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, नागरिकांनी विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.
    4
    पिंपरी,
दि.१६ फेब्रुवारी २०२६
चिंचवड येथील भाट नगर परिसरात आज सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास एका अॅक्रिलिक दुकानात आग लागल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. थेरगाव उप अग्निशमन केंद्र , नेहरूनगर उप अग्निशमन केंद्र तसेच मुख्य अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ रवाना करण्यात आल्या. घटनेची माहिती घेऊन जवानांनी शिताफिने आग नियंत्रणात आणली.
आगीमुळे संबंधित अॅक्रिलिक दुकान पूर्णतः जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, नागरिकांनी विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.
    user_City Mirror News
    City Mirror News
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पत्रकार पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Shrinivas mane
    3
    Post by Shrinivas mane
    user_Shrinivas mane
    Shrinivas mane
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.