logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बारामती! ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर मध्ये भालदार कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप वडगाव निं.प्रतिनिधी - ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ आणि २ मध्ये मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फिरोज भालदार आणि भालदार कुटुंबीयांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, बंधुभाव, एकोपा आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भालदार कुटुंबीयांच्या या सामाजिक उपक्रमाचे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजात आपुलकी, सद्भावना आणि सामाजिक एकतेची भावना दृढ व्हावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक बांधिलकी जपत फिरोज भालदार आणि भालदार कुटुंबीयांनी राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.

1 hr ago
user_Shoukat  Shaikh
Shoukat Shaikh
बारामती, पुणे, महाराष्ट्र•
1 hr ago
71bcf727-5a90-479b-bf21-8f6c892eb720

बारामती! ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त वडगाव निंबाळकर मध्ये भालदार कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप वडगाव निं.प्रतिनिधी - ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ आणि २ मध्ये मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फिरोज भालदार आणि भालदार कुटुंबीयांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, बंधुभाव, एकोपा आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भालदार कुटुंबीयांच्या या सामाजिक उपक्रमाचे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजात आपुलकी, सद्भावना आणि सामाजिक एकतेची भावना दृढ व्हावी, असा संदेश यावेळी देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक बांधिलकी जपत फिरोज भालदार आणि भालदार कुटुंबीयांनी राबविलेल्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.

More news from Pune and nearby areas
  • जिजाऊ लेकी आक्रमक मराठा छत्रपती महाराष्ट्र विरोधी टकले सेनेचे पदाधिकारी यांना रक्षाबंधनावर एक डजन बांगड्या लिपस्टिक भेट महाराष्ट्र : मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ’च्या काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून, छत्रपती जिजाऊसाहेबांच्या लेकींच्या विरोधात तसेच महाराष्ट्राच्या हिताविरोधात काम केले जात असल्याचा दावा ‘मराठ्यांच्या लेक शिवशंभू कन्या’च्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक नकाशा हटविण्याच्या कथित प्रयत्नांसंदर्भात संबंधितांनी राजस्थानमध्ये जाऊन बैठक घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या बैठकीमागे महाराष्ट्रविरोधी कटकारस्थान असल्याचा दावा आरोपकर्त्यांनी केला आहे. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपतींच्या वंशजांची बदनामी करण्याचे काम संबंधितांकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या गटाला ‘टकले सेना’ असे संबोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, या कथित बैठकांसाठी किंवा अन्य कारणांसाठी ५० कोटी रुपये मिळाल्याची शंकाही आरोपकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या आर्थिक व्यवहाराबाबत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा स्वतंत्र पुष्टी सध्या समोर आलेली नाही. या सर्व आरोपांबाबत संबंधित संघटनेची अधिकृत भूमिका अथवा स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यास तेही प्रसिद्ध केले जाणे आवश्यक आहे. आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे गरजेचे असून, ऐतिहासिक वारसा आणि मराठा समाजाशी संबंधित संवेदनशील विषय असल्याने वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारेच पुढील भूमिका निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.
    1
    जिजाऊ लेकी आक्रमक मराठा छत्रपती महाराष्ट्र विरोधी टकले सेनेचे पदाधिकारी यांना रक्षाबंधनावर एक डजन बांगड्या लिपस्टिक भेट
महाराष्ट्र : मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ’च्या काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या पदाधिकाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून, छत्रपती जिजाऊसाहेबांच्या लेकींच्या विरोधात तसेच महाराष्ट्राच्या हिताविरोधात काम केले जात असल्याचा दावा ‘मराठ्यांच्या लेक शिवशंभू कन्या’च्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठा साम्राज्याचा ऐतिहासिक नकाशा हटविण्याच्या कथित प्रयत्नांसंदर्भात संबंधितांनी राजस्थानमध्ये जाऊन बैठक घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या बैठकीमागे महाराष्ट्रविरोधी कटकारस्थान असल्याचा दावा आरोपकर्त्यांनी केला आहे.
याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपतींच्या वंशजांची बदनामी करण्याचे काम संबंधितांकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या गटाला ‘टकले सेना’ असे संबोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान, या कथित बैठकांसाठी किंवा अन्य कारणांसाठी ५० कोटी रुपये मिळाल्याची शंकाही आरोपकर्त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या आर्थिक व्यवहाराबाबत कोणतेही अधिकृत पुरावे किंवा स्वतंत्र पुष्टी सध्या समोर आलेली नाही.
या सर्व आरोपांबाबत संबंधित संघटनेची अधिकृत भूमिका अथवा स्पष्टीकरण उपलब्ध झाल्यास तेही प्रसिद्ध केले जाणे आवश्यक आहे. आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे गरजेचे असून, ऐतिहासिक वारसा आणि मराठा समाजाशी संबंधित संवेदनशील विषय असल्याने वस्तुनिष्ठ तथ्यांच्या आधारेच पुढील भूमिका निश्चित करण्याची गरज व्यक्त होत आहे.
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    4 hrs ago
  • Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं? Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं? watch full video
    1
    Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं?


Nepal Flash Floods ।नदीचा रौद्रावतार! 105 भारतीयांसह 384 पर्यटक संपर्काबाहेर; नेमकं काय घडलं?
watch full video
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Lawyer Pune City, Maharashtra•
    5 hrs ago
  • जगाला टेक्नॉलॉजी देणारी हिंजवडी मूलभूत सुविधांसाठी त्रस्त; IT अभियंते उतरणार रस्त्यावर..! हिंजवडी पुणे : चाकण MIDCतील लघुउद्योजकांच्या आंदोलनानंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. याच प्रश्नांवर येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. हिंजवडी... देशाच्या आयटी क्षेत्राची ओळख बनलेलं पुण्याचं महत्त्वाचं केंद्र... हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या आयटी हबमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात... मात्र कार्यालयात पोहोचण्याआधीच त्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय. कुठे तासन्‌तास वाहतूक कोंडी... कुठे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे... तर कुठे अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा धोका... याच समस्यांमुळे आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संयम सुटला आहें. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. गेल्या दीड वर्षात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांमुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय. एकीकडे हिंजवडीत सुमारे 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंते मोठ्या प्रमाणावर कर भरतात... मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, चाकण MIDCतील 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. मग हिंजवडीतील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागणार का? हा सवाल आता आयटी अभियंते उपस्थित करत आहेत. हिंजवडी सोडून कंपन्या आणि कर्मचारी जाण्याची वेळ आल्यानंतर सरकार जागं होणार का..? की त्याआधीच या समस्यांवर तोडगा काढला जाणार? याच मागण्यांसाठी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जगाला टेक्नॉलॉजी देणाऱ्या हिंजवडीला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय... त्यामुळे प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाही... प्रश्न आहे—हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी हबच्या पायाभूत सुविधांचा! आता आयटी अभियंत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी प्रशासन जागं होणार का..? #Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITEngineers #ITEmployees #HinjewadiNews #PuneTraffic #HinjewadiTraffic #RoadProblems #Potholes #Infrastructure #ITPark #Protest #Andolan #6September #MaharashtraNews #PuneUpdates #TheNayakNews #न्यूज #हिंजवडी #पुणे #आंदोलन
    1
    जगाला टेक्नॉलॉजी देणारी हिंजवडी मूलभूत सुविधांसाठी त्रस्त; IT अभियंते उतरणार रस्त्यावर..!
हिंजवडी पुणे :
चाकण MIDCतील लघुउद्योजकांच्या आंदोलनानंतर आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. जगाच्या नकाशावर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत मूलभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला आहे. याच प्रश्नांवर येत्या 6 सप्टेंबरला आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
हिंजवडी... देशाच्या आयटी क्षेत्राची ओळख बनलेलं पुण्याचं महत्त्वाचं केंद्र...
हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या आयटी हबमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात... मात्र कार्यालयात पोहोचण्याआधीच त्यांना रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय.
कुठे तासन्‌तास वाहतूक कोंडी...
कुठे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे...
तर कुठे अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा धोका...
याच समस्यांमुळे आता हिंजवडीतील आयटी अभियंत्यांचा संयम सुटला आहें.
आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा करूनही समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
गेल्या दीड वर्षात रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांमुळे 37 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांकडून केला जातोय.
एकीकडे हिंजवडीत सुमारे 800 कंपन्या आणि लाखो आयटी अभियंते मोठ्या प्रमाणावर कर भरतात... मात्र त्या तुलनेत मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, चाकण MIDCतील 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार आणि प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या.
मग हिंजवडीतील प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागणार का?
हा सवाल आता आयटी अभियंते उपस्थित करत आहेत.
हिंजवडी सोडून कंपन्या आणि कर्मचारी जाण्याची वेळ आल्यानंतर सरकार जागं होणार का..?
की त्याआधीच या समस्यांवर तोडगा काढला जाणार?
याच मागण्यांसाठी येत्या 6 सप्टेंबरला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जगाला टेक्नॉलॉजी देणाऱ्या हिंजवडीला मात्र आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय...
त्यामुळे प्रश्न फक्त वाहतूक कोंडीचा नाही...
प्रश्न आहे—हिंजवडीसारख्या जागतिक दर्जाच्या आयटी हबच्या पायाभूत सुविधांचा!
आता आयटी अभियंत्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर तरी प्रशासन जागं होणार का..?
#Hinjewadi #HinjewadiITPark #Pune #PuneNews #ITEngineers #ITEmployees #HinjewadiNews #PuneTraffic #HinjewadiTraffic #RoadProblems #Potholes #Infrastructure #ITPark #Protest #Andolan #6September #MaharashtraNews #PuneUpdates #TheNayakNews #न्यूज #हिंजवडी #पुणे #आंदोलन
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • "त्या देशातून आपल्याला पैसाही परत आणता येत नाही...; लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो..!"
    1
    "त्या देशातून आपल्याला पैसाही परत आणता येत नाही...; लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो..!"
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house Pune City, Maharashtra•
    10 hrs ago
  • हिप्परगा रवा येथे वीज बिलांचा भोंगळ कारभार! वेळेवर बिल नाही, थेट वीज खंडित; नागरिकांचा संताप
    1
    हिप्परगा रवा येथे वीज बिलांचा भोंगळ कारभार! वेळेवर बिल नाही, थेट वीज खंडित; नागरिकांचा संताप
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.
    1
    नेपाळ मधील आलेल्या पुराचे रौद्र रूप. डोळ्यात पाणी आणणारी दृश्य.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • भटक्या कुत्र्यांचा हैदोस! आईवर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस कायम असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एका चिमुरड्याला घेऊन जात असलेल्या आईवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून एक वर्षांचा चिमुरडा निसटून थेट रस्त्यावर पडला. सुदैवाने मुलाला गंभीर इजा झाली नाही. मात्र, आई अमृता बसन्नावार या हल्ल्यात जखमी झाल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या प्रभागातच ही घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवरून महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता महापालिका ठोस पावलं उचलणार का, हा सवाल आहे... #भटक्याकुत्रे #कुत्र्यांचाहल्ला #पिंपरीचिंचवड #DogAttack #StrayDogs #PCMC #पिंपरीचिंचवडमहापालिका #नागरिकसुरक्षा #CCTV #भटक्याकुत्र्यांचीदहशत #कुत्र्यांचाउपद्रव #महापालिका #PCMCNews #PimpriChinchwadNews #MaharashtraNews #TheNayakNews
    1
    भटक्या कुत्र्यांचा हैदोस! आईवर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला...
पिंपरी चिंचवड :
पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस कायम असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. एका चिमुरड्याला घेऊन जात असलेल्या आईवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला.
कुत्र्याच्या हल्ल्यामुळे आईच्या हातातून एक वर्षांचा चिमुरडा निसटून थेट रस्त्यावर पडला. सुदैवाने मुलाला गंभीर इजा झाली नाही. मात्र, आई अमृता बसन्नावार या हल्ल्यात जखमी झाल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
विशेष म्हणजे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या प्रभागातच ही घटना घडल्याने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीवरून महापालिका प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता महापालिका ठोस पावलं उचलणार का, हा सवाल आहे...
#भटक्याकुत्रे #कुत्र्यांचाहल्ला #पिंपरीचिंचवड #DogAttack #StrayDogs #PCMC #पिंपरीचिंचवडमहापालिका #नागरिकसुरक्षा #CCTV #भटक्याकुत्र्यांचीदहशत #कुत्र्यांचाउपद्रव #महापालिका #PCMCNews #PimpriChinchwadNews #MaharashtraNews #TheNayakNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧 भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा, वसतिगृह, प्रशिक्षण केंद्रे आणि शहरातील संवेदनशील भागांत गस्त सुरू झाली आहे. हीच अपेक्षा होती — मुलींना सुरक्षित वातावरण, निर्भय शिक्षण आणि सक्षम भविष्य! पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, दामिनी पथक आणि भोकरदन पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏 मुली शाळेत जातील… शिकतील… सक्षम होतील! ✊ #प्रा_सौ_अनिता_अंकुश_जाधव
    1
    मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧

भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा
मुली सुरक्षित तरच त्यांचे शिक्षण आणि भविष्य सुरक्षित! 💪👧
भोकरदनमधील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत दामिनी पथकाची शाळा, वसतिगृह, प्रशिक्षण केंद्रे आणि शहरातील संवेदनशील भागांत गस्त सुरू झाली आहे.
हीच अपेक्षा होती — मुलींना सुरक्षित वातावरण, निर्भय शिक्षण आणि सक्षम भविष्य!
पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, दामिनी पथक आणि भोकरदन पोलिस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार! 🙏
मुली शाळेत जातील… शिकतील… सक्षम होतील! ✊
#प्रा_सौ_अनिता_अंकुश_जाधव
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Building society Haveli, Pune•
    21 hrs ago
  • हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. ​गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी: ​सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत: ​हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६ ​दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता ​कारवाई आणि आरोपीला अटक: ​गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ​मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ​मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी: ​सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली: ​श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) ​शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक) ​श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक) ​श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण) ​तपास पथकातील अधिकारी व अंमलदार: ​गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता: ​विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) ​पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक) ​अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) ​रमेश भोसले (सहायक फौजदार) ​सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार) ​सचिन जगताप (पोलीस हवालदार) ​कमलेश होले (पोलीस हवालदार) ​अक्षय कामठे (पोलीस शिपाई) ​ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई) ​संजय दाणे (पोलीस शिपाई) ​सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)
    1
    हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद
पुणे ग्रामीण:
उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २२ नागरिकांचे बळी गेले होते, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.
​गुन्ह्यांची नोंद व पार्श्वभूमी:
​सदर प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत:
​हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ३७९/२०२६
​दापोडी पोलीस ठाणे: गुन्हा नोंद क्रमांक ११४/२६, कलम १०५, १२३, १२५ भारतीय न्याय संहिता
​कारवाई आणि आरोपीला अटक:
​गुन्ह्यातील पाहिजे असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात येणार असल्याची आणि तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
​मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेतला असता, आरोपी दत्ता उर्फ भावड्या भीमराव लोंढे हा पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावी वेषांतर करून, रूप बदलून आणि आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून त्या ठिकाणावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तातडीने सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याची ओळख पटवून उरूळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. सद्यस्थितीत सदर कारवाई उरूळी कांचन पोलीस ठाणे व सी.आय.डी. पुणे यांनी संयुक्तपणे केली असून, आरोपीला पुढील तपासकामी सी.आय.डी. पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
​मार्गदर्शक वरिष्ठ अधिकारी:
​सदरची संपूर्ण कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली:
​श्री. संदीप सिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)
​शफकत अमना (पोलीस अधीक्षक, सी.आय.डी. पुणे घटक)
​श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक)
​श्री. बापुराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, पुणे ग्रामीण)
​तपास पथकातील अधिकारी व अंमलदार:
​गुन्ह्याची गोपनियता पाळून आरोपीचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या उरूळी कांचन पोलीस स्टेशनच्या विशेष पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
​विजयमाला पवार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)
​पांडुरंग पवार (सहायक पोलीस निरीक्षक)
​अजिनाथ शिंदे (पोलीस उपनिरीक्षक)
​रमेश भोसले (सहायक फौजदार)
​सोमनाथ चितारे (पोलीस हवालदार)
​सचिन जगताप (पोलीस हवालदार)
​कमलेश होले (पोलीस हवालदार)
​अक्षय कामठे (पोलीस शिपाई)
​ऋषिकेश रासकर (पोलीस शिपाई)
​संजय दाणे (पोलीस शिपाई)
​सोमनाथ सुपेकर (पोलीस शिपाई)
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.