logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कुडाळमध्ये 'बॅनर वॉर'चा भडका! हूमरमळा येथे 'किंगमेकर'च्या बॅनरवर शाईफेक सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम शांत होत नाहीत, तोच कुडाळमध्ये आता राजकीय चुरस बॅनरबाजीपर्यंत पोहोचली आहे. पावशी मतदारसंघातून शिंदे सेनेचे दादा साईल विजयी झाल्यानंतर, हूमरमळा येथे लावण्यात आलेल्या 'किंगमेकर' बॅनरवर अज्ञातांनी शाईफेक केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी काळात कुडाळमध्ये मोठे 'बॅनर वॉर' पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. पावशी मतदारसंघात दादा साईल यांच्या विजयानंतर, 'किंगमेकर' दया अणावकर मित्रमंडळ यांच्या वतीने एक बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर "बरे बरे... गार केले... गंमत मधी चल" अशा आशयाचा खोचक मजकूर लिहून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता. आपल्या कामाच्या जोरावर आणि रणनीतीमुळे उमेदवार निवडून आल्याचा दावा या बॅनरद्वारे करण्यात आला होता. मात्र, सोमवारी सकाळी या बॅनरवर काळी शाई फेकल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. दया अणावकर यांची 'किंगमेकर' भूमिका या निवडणुकीत दया अणावकर यांनी स्वतः पावशी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा मान राखत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि मित्रमंडळासह उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार केला. विजयानंतर लावलेला हा बॅनर म्हणजे एका प्रकारे राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यावर झालेल्या शाईफेकीमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. भरचौकातील बॅनरवर शाई फेकून विरोध दर्शवणारे हे अज्ञात कोण? आणि ही शाईफेक राजकीय सूडापोटी झाली की निव्वळ खोडसाळपणा? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे पावशी मतदारसंघातील राजकीय ईर्ष्या आता चव्हाट्यावर आली आहे. कुडाळच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची शक्यता.

1 day ago
user_MH07NEWS
MH07NEWS
कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
1 day ago

कुडाळमध्ये 'बॅनर वॉर'चा भडका! हूमरमळा येथे 'किंगमेकर'च्या बॅनरवर शाईफेक सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम शांत होत नाहीत, तोच कुडाळमध्ये आता राजकीय चुरस बॅनरबाजीपर्यंत पोहोचली आहे. पावशी मतदारसंघातून शिंदे सेनेचे दादा साईल विजयी झाल्यानंतर, हूमरमळा येथे लावण्यात आलेल्या 'किंगमेकर' बॅनरवर अज्ञातांनी शाईफेक केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी काळात कुडाळमध्ये मोठे 'बॅनर वॉर' पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. पावशी मतदारसंघात दादा साईल यांच्या विजयानंतर, 'किंगमेकर' दया अणावकर मित्रमंडळ यांच्या वतीने एक बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर "बरे बरे... गार केले... गंमत मधी चल" अशा आशयाचा खोचक मजकूर लिहून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता. आपल्या कामाच्या जोरावर आणि रणनीतीमुळे उमेदवार निवडून आल्याचा दावा या बॅनरद्वारे करण्यात आला होता. मात्र, सोमवारी सकाळी या बॅनरवर काळी शाई फेकल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. दया अणावकर यांची 'किंगमेकर' भूमिका या निवडणुकीत दया अणावकर यांनी स्वतः पावशी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा मान राखत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि मित्रमंडळासह उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रचार केला. विजयानंतर लावलेला हा बॅनर म्हणजे एका प्रकारे राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यावर झालेल्या शाईफेकीमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. भरचौकातील बॅनरवर शाई फेकून विरोध दर्शवणारे हे अज्ञात कोण? आणि ही शाईफेक राजकीय सूडापोटी झाली की निव्वळ खोडसाळपणा? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे पावशी मतदारसंघातील राजकीय ईर्ष्या आता चव्हाट्यावर आली आहे. कुडाळच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची शक्यता.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कुडाळ: केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरक्षेच्या नावाखाली अनिवार्य केलेली 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' (HSRP) आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरे आणि अंक अवघ्या काही महिन्यांतच पुसले जात असल्याचे समोर आले असून, ६३० रुपये खर्चूनही निकृष्ट दर्जाचे साहित्य मिळत असल्याच पाहायला मिळत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP प्लेट लावणे बंधनकारक आहे. या प्लेट्स ॲल्युमिनियमच्या असून त्यावर क्रोमियम होलोग्राम आणि लेसर-ब्रँडेड १० अंकी कोड असतो. चोरी आणि बनावटगिरी रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या प्लेट्सवरील काळा रंग उडून जात असून, प्लेट पूर्णपणे कोरी (धूसर) दिसत आहे. महागडी प्लेट, पण दर्जा शून्य? एका नंबरप्लेटसाठी शासनाने साधारण ६३० रुपये दर निश्चित केला आहे. रिवेट्स मारून घट्ट बसवलेली ही प्लेट 'छेडछाड-प्रतिरोधक' असल्याचा दावा केला जातो. पण जर नंबरच वाचता येत नसेल, तर या सुरक्षेचा उपयोग काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. "आम्ही दंडाच्या भीतीने पैसे भरून नंबरप्लेट लावली, पण आता नंबरच दिसत नाहीये. उद्या वाहतूक पोलिसांनी आम्हाला थांबवले, तर नंबर दिसत नसल्याचा दंड आम्ही का भरायचा? अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन धारकांकडून उमटत आहे. HSRP प्लेटची प्रमुख वैशिष्ट्ये (जी कागदावरच उरली आहेत): * होलोग्राम: डाव्या कोपऱ्यात निळ्या रंगाचा अशोक चक्र होलोग्राम. लेसर कोड: १०-अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. सुरक्षितता: काढता न येणारे रिवेट्स. दंड: प्लेट नसल्यास १,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद. निकृष्ट दर्जाच्या प्लेट्स पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार का? आणि ज्यांच्या प्लेट्स खराब झाल्या आहेत, त्यांना विनामूल्य नवीन प्लेट्स मिळणार का? याकडे आता सर्व सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मात्र 'नंबर' गायब झालेल्या गाड्या घेऊन फिरणे वाहनधारकांसाठी टांगती तलवार ठरत आहे.
    1
    कुडाळ: केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरक्षेच्या नावाखाली अनिवार्य केलेली 'हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' (HSRP) आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरे आणि अंक अवघ्या काही महिन्यांतच पुसले जात असल्याचे समोर आले असून, ६३० रुपये खर्चूनही निकृष्ट दर्जाचे साहित्य मिळत असल्याच पाहायला मिळत आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP प्लेट लावणे बंधनकारक आहे. या प्लेट्स ॲल्युमिनियमच्या असून त्यावर क्रोमियम होलोग्राम आणि लेसर-ब्रँडेड १० अंकी कोड असतो. चोरी आणि बनावटगिरी रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या प्लेट्सवरील काळा रंग उडून जात असून, प्लेट पूर्णपणे कोरी (धूसर) दिसत आहे.
महागडी प्लेट, पण दर्जा शून्य?
एका नंबरप्लेटसाठी शासनाने साधारण ६३० रुपये दर निश्चित केला आहे. रिवेट्स मारून घट्ट बसवलेली ही प्लेट 'छेडछाड-प्रतिरोधक' असल्याचा दावा केला जातो. पण जर नंबरच वाचता येत नसेल, तर या सुरक्षेचा उपयोग काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
"आम्ही दंडाच्या भीतीने पैसे भरून नंबरप्लेट लावली, पण आता नंबरच दिसत नाहीये. उद्या वाहतूक पोलिसांनी आम्हाला थांबवले, तर नंबर दिसत नसल्याचा दंड आम्ही का भरायचा? अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन धारकांकडून उमटत आहे.
HSRP प्लेटची प्रमुख वैशिष्ट्ये (जी कागदावरच उरली आहेत):
* होलोग्राम: डाव्या कोपऱ्यात निळ्या रंगाचा अशोक चक्र होलोग्राम.
लेसर कोड: १०-अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर.
सुरक्षितता: काढता न येणारे रिवेट्स.
दंड: प्लेट नसल्यास १,००० ते १०,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद.
निकृष्ट दर्जाच्या प्लेट्स पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार का? आणि ज्यांच्या प्लेट्स खराब झाल्या आहेत, त्यांना विनामूल्य नवीन प्लेट्स मिळणार का? याकडे आता सर्व सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत मात्र 'नंबर' गायब झालेल्या गाड्या घेऊन फिरणे वाहनधारकांसाठी टांगती तलवार ठरत आहे.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Akash mane
    1
    Post by Akash mane
    user_Akash mane
    Akash mane
    Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *सांगली–मिरज रोडवर २० वर्षांनंतर अतिक्रमणावर बुलडोझर; पृथ्वीराज पवारांचा इशारा – “अन्याय सहन करणार नाही!”* ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001
    1
    *सांगली–मिरज रोडवर २० वर्षांनंतर अतिक्रमणावर बुलडोझर; पृथ्वीराज पवारांचा इशारा – “अन्याय सहन करणार नाही!”*
==================
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    2 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून  डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र  तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे  डोळेझाक करत असून  पर्यावरण प्रेमींनी  कारवाईची मागणी केली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे हार्दिक स्वागत. मुंबईत आगमन झाले असता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, भारत-फ्रान्स भागीदारी आणखी मजबूत करून, त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट होती.
    1
    फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे हार्दिक स्वागत.
मुंबईत आगमन झाले असता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, भारत-फ्रान्स भागीदारी आणखी मजबूत करून, त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट होती.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics
    1
    AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. 
#AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.17 तालुक्याच्या विसगाव खोरे भागातील नीलकंठ येथे गोट्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत बिबट्याने दोन बकरी ठार केल्याची घटना आज दि.17 उघडकीस आली आहे.याबाबत शेतकयांनी माहिती दिली.या बाबत शेतकयांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.17
तालुक्याच्या विसगाव खोरे भागातील नीलकंठ  येथे गोट्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत बिबट्याने दोन बकरी ठार केल्याची घटना आज दि.17 उघडकीस आली आहे.याबाबत शेतकयांनी माहिती दिली.या बाबत शेतकयांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.