परळी येथील ओंकार साखर कारखान्याने जाहीर केलेल्या ऊस दरात शेतकऱ्यांशी दगाबाजी केल्याचा आरोप करत, ऊस उत्पादक संघर्ष समितीने कारखान्यासमोर १ जूनपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आज, या आंदोलनाचा दुसरा दिवस असून, मोठ्या संख्येने शेतकरी कारखान्यासमोर जमले आहेत. कारखान्याने सुरुवातीला प्रतिटन २९५० रुपये ऊस दर जाहीर केला होता, ज्यामुळे अनेक शेतकरी आकर्षित होऊन त्यांनी आपला ऊस ओंकार कारखान्याला दिला. मात्र, प्रत्यक्षात कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ १८०० रुपये प्रतिटन याप्रमाणे पैसे वर्ग करून शेतकऱ्यांना मोठा धोका दिल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या फसवणुकीमुळे ऊस उत्पादक आक्रमक व संतप्त झाले आहेत. यापूर्वी ८ मे रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीने जाहीर दराप्रमाणे ऊस बिले व वाहतूक ठेकेदारांची बिले देण्यासाठी कारखान्यासमोर ठिय्या सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यावेळी कारखान्याने आंदोलकांना लेखी पत्र देत, २५ मे २०२६ पूर्वी जाहीर दराप्रमाणे बिले देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु, ती तारीख उलटून गेल्यानंतरही बिले जाहीर दराप्रमाणे निघाली नाहीत. १८०० रुपये प्रतिटन दरात ऊस उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने, वर्षभर जोपासलेल्या पिकाचा भाव कवडीमोल ठरल्याने ओंकार साखर कारखान्याला ऊस देणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जोपर्यंत जाहीर केलेल्या दराप्रमाणे ऊस बिले व वाहतूक ठेकेदारांची बिले दिली जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार ऊस उत्पादक संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.
परळी येथील ओंकार साखर कारखान्याने जाहीर केलेल्या ऊस दरात शेतकऱ्यांशी दगाबाजी केल्याचा आरोप करत, ऊस उत्पादक संघर्ष समितीने कारखान्यासमोर १ जूनपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आज, या आंदोलनाचा दुसरा दिवस असून, मोठ्या संख्येने शेतकरी कारखान्यासमोर जमले आहेत. कारखान्याने सुरुवातीला प्रतिटन २९५० रुपये ऊस दर जाहीर केला होता, ज्यामुळे अनेक शेतकरी आकर्षित होऊन त्यांनी आपला ऊस ओंकार कारखान्याला दिला. मात्र, प्रत्यक्षात कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ १८०० रुपये प्रतिटन याप्रमाणे पैसे वर्ग करून शेतकऱ्यांना मोठा धोका दिल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या फसवणुकीमुळे ऊस उत्पादक आक्रमक व संतप्त झाले आहेत. यापूर्वी ८ मे रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीने जाहीर दराप्रमाणे ऊस बिले व वाहतूक ठेकेदारांची बिले देण्यासाठी कारखान्यासमोर ठिय्या सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यावेळी कारखान्याने आंदोलकांना लेखी पत्र देत, २५ मे २०२६ पूर्वी जाहीर दराप्रमाणे बिले देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु, ती तारीख उलटून गेल्यानंतरही बिले जाहीर दराप्रमाणे निघाली नाहीत. १८०० रुपये प्रतिटन दरात ऊस उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने, वर्षभर जोपासलेल्या पिकाचा भाव कवडीमोल ठरल्याने ओंकार साखर कारखान्याला ऊस देणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जोपर्यंत जाहीर केलेल्या दराप्रमाणे ऊस बिले व वाहतूक ठेकेदारांची बिले दिली जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार ऊस उत्पादक संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.
- परळी येथील ओंकार साखर कारखान्याने जाहीर केलेल्या ऊस दरात शेतकऱ्यांशी दगाबाजी केल्याचा आरोप करत, ऊस उत्पादक संघर्ष समितीने कारखान्यासमोर १ जूनपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आज, या आंदोलनाचा दुसरा दिवस असून, मोठ्या संख्येने शेतकरी कारखान्यासमोर जमले आहेत. कारखान्याने सुरुवातीला प्रतिटन २९५० रुपये ऊस दर जाहीर केला होता, ज्यामुळे अनेक शेतकरी आकर्षित होऊन त्यांनी आपला ऊस ओंकार कारखान्याला दिला. मात्र, प्रत्यक्षात कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ १८०० रुपये प्रतिटन याप्रमाणे पैसे वर्ग करून शेतकऱ्यांना मोठा धोका दिल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या फसवणुकीमुळे ऊस उत्पादक आक्रमक व संतप्त झाले आहेत. यापूर्वी ८ मे रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीने जाहीर दराप्रमाणे ऊस बिले व वाहतूक ठेकेदारांची बिले देण्यासाठी कारखान्यासमोर ठिय्या सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यावेळी कारखान्याने आंदोलकांना लेखी पत्र देत, २५ मे २०२६ पूर्वी जाहीर दराप्रमाणे बिले देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु, ती तारीख उलटून गेल्यानंतरही बिले जाहीर दराप्रमाणे निघाली नाहीत. १८०० रुपये प्रतिटन दरात ऊस उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने, वर्षभर जोपासलेल्या पिकाचा भाव कवडीमोल ठरल्याने ओंकार साखर कारखान्याला ऊस देणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जोपर्यंत जाहीर केलेल्या दराप्रमाणे ऊस बिले व वाहतूक ठेकेदारांची बिले दिली जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार ऊस उत्पादक संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.1
- लातूर जिल्ह्यातील हॉटेल गंधर्वने अधिक मासानिमित्त खास 'जावई आमरस थाळी' सादर केली आहे.1
- लातूर जिल्ह्यातील कळंब तालुक्यातल्या ताडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कैलास मारुती कांबळे यांनी शिक्षण क्षेत्रात तब्बल ३० वर्षांची उल्लेखनीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारली. या गौरवपूर्ण प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवलिंग पटवे साहेब उपस्थित होते, तर अखिल भारतीय शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, सहसंचालक तथा विभागीय अध्यक्ष नागपूर श्री. कल्याणराव सोनवणे निवृत्त गटशिक्षणाधिकारी आणि श्री. मदने साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून कैलास कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचा विशेष उल्लेख करत, त्यांना एक आदर्श शिक्षक, कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे मार्गदर्शक म्हणून गौरवले. त्यांच्या सेवाकाळात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही विशेष चालना मिळाल्याचे वक्त्यांनी सांगितले. या सोहळ्यात सामाजिक परिवर्तन संस्था, नळदुर्गचे मारुती बनसोडे यांनी कैलास कांबळे यांच्याशी असलेल्या ४२ वर्षांच्या जिव्हाळ्याच्या मैत्रीबद्दल मनोगत व्यक्त केले. मैत्री म्हणजे केवळ ओळख नसून विश्वास, आपुलकी आणि परस्पर सहकार्याची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचे वर्गमित्र पितांबर गवळी, मारुती बनसोडे, कुमार मोरे, खंडेराव देडे, हरीलाल लोंढे तसेच सहशिक्षक राम बनसोडे यांनीही उपस्थित राहून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला, ज्यामुळे वातावरण भावनिक झाले. आपल्या सेवानिवृत्तीच्या भाषणात कैलास कांबळे यांनी सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मित्रपरिवाराचे आभार मानले, तसेच शिक्षण आणि संस्कार देणे हीच शिक्षकांची खरी जबाबदारी असल्याचे सांगितले. आगलावे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. अखेरीस, उपस्थितांनी मुख्याध्यापक कांबळे यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.1
- राज्य शासनाने लातूर विमानतळाच्या विस्तारीकरणासह आवश्यक पायाभूत सुविधा आणि सुधारणा कामांना मंजुरी दिली आहे. यासाठी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता, अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. शासनाने लातूर विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ५६ कोटी रुपयांच्या खर्चास वित्तीय मान्यता दिली असून, लातूर येथे विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.1
- परभणी जिल्ह्यातील वडगाव सुक्रे येथे आलेल्या चक्री वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, त्यांनी शासनाकडे या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची मागणी केली आहे.1
- परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून सईद खान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रसंगी मंत्री संजय शिरसाट, मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार संतोष बांगर आणि उदय सावंत यांच्यासह अनेक आमदारांची उपस्थिती होती.1
- खासदार संजय जाधव यांनी ठामपणे सांगितले आहे की विरोधकांचा पराभव अटळ आहे. त्यांच्या खात्रीनुसार, डॉ. विवेक नावंदर हे निश्चितपणे विजयी होतील.1
- लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू व्यवसाय, हातभट्टी निर्मिती आणि बेकायदेशीर मद्यविक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी दोन दिवसांत जिल्ह्यात एकाच वेळी कारवाया करत अवैध दारू व्यावसायिकांविरोधात सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत हातभट्टी दारू, देशी दारू आणि हजारो लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट करण्यात आले असून, अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान, लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गजानन सदाशिव हेरकर (रा. नळेगाव, ता. चाकूर) याला ३५ लिटर हातभट्टी दारूसह, तर अलीम सत्तार शेख (रा. झिन्नत सोसायटी, नांदेड रोड, लातूर) याला ३८ लिटर हातभट्टी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. कासार सिरसी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळवाडी येथे लक्ष्मण तिपन्ना उमापुरे याच्या शेतातून सुमारे ५०० लिटर क्षमतेचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे गुळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले. चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील गणेशनगर तांडा येथे नाथू रामभाऊ राठोड याच्या ताब्यातील सुमारे ३०० लिटर रसायन आणि शिलाबाई शिवाजी जाधव हिच्या शेतातून २५० लिटर क्षमतेच्या बॅरलमधील रसायन जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, अहमदपूर उपविभागातील वाढवणा पोलीस ठाणे हद्दीत इरफान मुन्नुसाब अत्तार (रा. शेळगाव, ता. चाकूर) आणि गंगाराम रोहिदास माने (रा. वडगाव एक्की, ता. चाकूर) यांच्याविरुद्ध देशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी प्रत्येकी ४८ बाटल्या 'भिंगरी संत्रा' देशी दारूसह कारवाई करण्यात आली. जळकोट पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर देबडवार यांच्या शेताजवळ शेख सलीम महेबुब (रा. नवी आबादी, जळकोट) याला २१ बाटल्या देशी दारूसह ताब्यात घेण्यात आले; तपासात तो कोणताही वैध परवाना नसताना चोरटी विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या दारूचे व रसायनांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले असून, उर्वरित अवैध साठा नष्ट करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले की, लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.2