राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ईव्हीएम सरमिसळ पूर्ण अहिल्यानगर, दि. ३० :- राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची प्रथम सरमिसळ प्रक्रिया आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा टप्पा पूर्ण करण्यात आला. प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झालेल्या मशीनचे प्रत्यक्ष वाटप करण्यासाठी ही सरमिसळ केली जाते. भारत निवडणूक आयोगाच्या प्रणालीद्वारे विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली. यानंतर राहुरी मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मशीनच्या याद्या जिल्हा मुख्यालयात सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दिल्या जातील. निवडणुकीच्या कामकाजासाठी या मशीन राहुरी मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्या जातील. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या सर्व मशीन राहुरी येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर सर्व संबंधित उमेदवारांनाही या सरमिसळ झालेल्या मशीनची यादी दिली जाईल. #RahuriBypoll #EVMVVPAT #ElectionPreparation #PankajAshiya #AhilyanagarElection #TransparentElection #ElectionCommissionIndia #RahuriAssembly2026 #DemocracyInAction #EVM_Randomization #MaharashtraPolitics #VoterAwareness #StrongRoomSafety

- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by Afsjcjryued1
- वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.1
- --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----1
- येवला-कोपरगाव रस्त्यावरील म्हसोबावाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 'श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सव' अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पाच गावांच्या शिवेवर वसलेले हे देवस्थान पंचक्रोशीत अत्यंत जागृत मानले जाते. यात्रेनिमित्त सकाळी कोपरगाव येथून कावडमध्ये गंगेचे पवित्र पाणी आणण्यात आले. गावाच्या मुख्य भागापासून वाजत-गाजत आणि डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहान मुलांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत 'म्हसोबा महाराज की जय'च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कावडच्या पाण्याने महाराजांना विधिवत अभिषेक घालण्यात आला. उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ह.भ.प. गोरख महाराज काळे (अंगणगावकर) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १९८९ पासून सुरू असलेली ही यात्रा परंपरा म्हसोबावाडी, बदापूर, नांदेसर, आडगाव चोथवा आणि पारेगाव या पाच गावांच्या भाविकांकडून मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे. सध्या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून 'म्हसोबावाडी मित्र मंडळ' व ग्रामस्थ यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. बदापूर येथील तरुण भजनी मंडळाचा आदर्श या यात्रेचे भूषण ठरला. या सोहळ्यासाठी आबालवृद्ध आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे1
- Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- आखाती देशाच्या युद्धामुळे छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस टंचाईमुळे रिक्षामध्ये गॅस मिळत नसल्याने आखिरकार रिक्षा चालकांनी रिक्षा बंद पुकारत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला3