Shuru
Apke Nagar Ki App…
*https://youtu.be/7-elq1o8Y1Q?si=hbE-l10orIm7PORe* ☝️ *आपल्या भागातील परिसरातील बातम्या पाहण्यासाठी 24 मराठी न्यूज नेटवर्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून नोटिफिकेशन मिळवा* *संपादक श्री लखन साळुंखे 9764202021*
24 मराठी न्यूज संपादक lakhan salunkhe
*https://youtu.be/7-elq1o8Y1Q?si=hbE-l10orIm7PORe* ☝️ *आपल्या भागातील परिसरातील बातम्या पाहण्यासाठी 24 मराठी न्यूज नेटवर्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून नोटिफिकेशन मिळवा* *संपादक श्री लखन साळुंखे 9764202021*
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत असतानाच, आता ऐतिहासिक पंचगंगा घाट परिसरातील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रंकाळा आणि के.एम.बी.पी. पार्क येथील कारवाईनंतर महापालिकेने आपला मोर्चा पंचगंगा घाटाकडे वळवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सध्या घाट परिसरात अनधिकृत दुकाने, गाळे आणि खाऊ गल्ली मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहे. यामुळे घाटाचे ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्य लोप पावत असून स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नदी प्रदूषणमुक्तीचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात घाटावर वाढलेली खाऊ गल्ली आणि पूजेच्या साहित्यांच्या स्टॉल्समुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. गणेशोत्सव आणि जोतिबा यात्रेच्या काळात येथे मोठी गर्दी असते, अशा वेळी या अतिक्रमणांमुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महापालिकेने केवळ रस्त्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कोल्हापूरकरांमधून होत आहे.1
- Post by Madan petkar1
- बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!1
- कोल्हापूर : रविराज कांबळे आरक्षणाची जनभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या होतात. अशा या पवित्र भूमीत असल्याचा अभिमान व्यक्त करत Dr. B. R. Ambedkar यांच्या विचारांमुळेच आपल्या खांद्यावरचे स्टार आहेत, असे मनोगत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केले. विश्वरत्न बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात अभिवादनासाठी उपस्थित राहून त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी संदेश दिला.2
- Post by E city news network1
- लातूर जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये चलन तुटवडा बँकांसहित नागरिक व्यापारी शेतकरी हवालदिल1
- (प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील बोरखेड येथील शेतकरी लक्ष्मण भानुदास क्षीरसागर (वय ५२ वर्षे ) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी (दि.१४) रोजी दुपारी सुमारे २:०० वाजेच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश परझने, मन्सुर शेख व अविनाश घुंगरड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्या नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. मात्र येथे शवविच्छेदनासाठी आवश्यक साधनसामग्री व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋषिकेश आंधळे यांनी मृतदेह नेकनुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत सुमारे दोन तासांचा विलंब झाला. त्या मुळे मयताचे नातेवाईक रामदास क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, दशरथ क्षीरसागर तसेच सरपंच सुनिल अनपट यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. दरम्यान लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सुविधा नसल्याचा प्रकार या पूर्वीही अनेकदा घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत नाराजी व्यक्त केली. या वर डॉ.गंडाळ यांनी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची व साहित्याची कमतरता असल्याचे सांगितले. तसेच संबंधित प्रकरणात नेकनुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.1
- मो no. 7249115181 ऑनलाईन वर्क1
- विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती एस पी तांबे यांच्या हस्ते कॅण्डल पेटवून फटाके फोडून जल्लोषात साजरी करण्यात आली. लातूर येथे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2024. लातूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती निमित्त आंबेडकर पार्क येथे लातूरच्या भीम जनसमुदाय भीमसैनिक एकत्र येत रात्रीच्या 12 वाजता कॅण्डल पेटवून, फटाक्यांची आतिशबाजीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आंबेडकर पार्क येथे मध्यरात्रीपासूनच भीमसैनिक हातात कॅण्डल पेटवत एकत्र येऊन डीजे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून लातूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आकर्षक चित्ररथ आणि रोषणाईत तसेच शहरात अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या जयंती कार्यक्रमात लातूर शहरातील अनेक ठिकाणाहून भीमसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तरुणींनी, लहान थोरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आज 14 एप्रिल 2026 जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.2