logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मातोरी ग्रामपंचायतीत वित्त आयोगाच्या निधीचा अपहार; मुख्याधिकाऱ्याकडे तक्रार सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी --------------------- शिरूर कासार (प्रतिनिधी): शिरूर कासार तालुक्यातील मातोरी ग्रामपंचायतीला मिळालेल्या चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर अपहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त खर्च दाखवून तसेच काही कामे कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखवून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, सरपंच, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सन २०२३-२०२४, २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या आर्थिक वर्षांमध्ये विविध विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च दाखवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अनेक कामे झालीच नाहीत किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचा निधी लाटण्यात आला, असा आरोप करण्यात येत आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, काही कामे केवळ कागदावरच दाखवून त्यांचा खर्च मंजूर करून घेण्यात आला. तर काही ठिकाणी केलेली कामे दर्जाहीन असून त्यासाठी अवाजवी रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून सुनियोजित भ्रष्टाचाराचा असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे शाळेसाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या दरांमध्ये मोठा तफावत आढळून आली आहे. बाजारात सुमारे दहा हजार रुपये किंमत असलेल्या टीव्ही संचाची खरेदी तब्बल ९९ हजार रुपयांना दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचा इन्व्हर्टर तब्बल दीड लाख रुपयांना खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. या खरेदी व्यवहारांमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय, काही कामे प्रत्यक्षात न करता देखील संबंधित एजन्सींना देयके अदा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार केवळ एका-दोन कामांपुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती मोठी असल्याचे चित्र समोर येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मातोरी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून, प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे. --- रोजगार हमी योजनेच्या कामाची ही झाली होती तक्रार. मातोरी ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या रोजगार हमीच्या कामांमध्ये बोगस कामे दाखवून निधी लाटल्याची तक्रार गेल्या महिन्यात करण्यात आली होती संबंधित विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून याचा अहवाल मात्र अद्याप तक्रारदारांना दिलेला नसून यानंतर या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन मातोरी ग्रामपंचायत मध्ये केले जाणार असल्याची माहिती देखील यावेळी दिली

4 hrs ago
user_नन्नवरे जालिंदर दैनिक दिव्य मर
नन्नवरे जालिंदर दैनिक दिव्य मर
Advertising agency शिरूर (कासार), बीड, महाराष्ट्र•
4 hrs ago
2bc22873-2fa9-409f-b796-5d43204f0a42

मातोरी ग्रामपंचायतीत वित्त आयोगाच्या निधीचा अपहार; मुख्याधिकाऱ्याकडे तक्रार सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी --------------------- शिरूर कासार (प्रतिनिधी): शिरूर कासार तालुक्यातील मातोरी ग्रामपंचायतीला मिळालेल्या चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर अपहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त खर्च दाखवून तसेच काही कामे कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचे दाखवून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, सरपंच, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सन २०२३-२०२४, २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या आर्थिक वर्षांमध्ये विविध विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च दाखवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अनेक कामे झालीच नाहीत किंवा अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाचा निधी लाटण्यात आला, असा आरोप करण्यात येत आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, काही कामे केवळ कागदावरच दाखवून त्यांचा खर्च मंजूर करून घेण्यात आला. तर काही ठिकाणी केलेली कामे दर्जाहीन असून त्यासाठी अवाजवी रक्कम अदा करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून सुनियोजित भ्रष्टाचाराचा असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे शाळेसाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्याच्या दरांमध्ये मोठा

24aaf06d-b6d4-4c18-9e27-a8eb3e0f2449

तफावत आढळून आली आहे. बाजारात सुमारे दहा हजार रुपये किंमत असलेल्या टीव्ही संचाची खरेदी तब्बल ९९ हजार रुपयांना दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचा इन्व्हर्टर तब्बल दीड लाख रुपयांना खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. या खरेदी व्यवहारांमुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय, काही कामे प्रत्यक्षात न करता देखील संबंधित एजन्सींना देयके अदा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार केवळ एका-दोन कामांपुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती मोठी असल्याचे चित्र समोर येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मातोरी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून, प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे. --- रोजगार हमी योजनेच्या कामाची ही झाली होती तक्रार. मातोरी ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या रोजगार हमीच्या कामांमध्ये बोगस कामे दाखवून निधी लाटल्याची तक्रार गेल्या महिन्यात करण्यात आली होती संबंधित विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून याचा अहवाल मात्र अद्याप तक्रारदारांना दिलेला नसून यानंतर या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन मातोरी ग्रामपंचायत मध्ये केले जाणार असल्याची माहिती देखील यावेळी दिली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शेवगाव (लक्ष्मण मडके) सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
    4
    शेवगाव (लक्ष्मण मडके)
सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
    user_Press Reporter Laxman Madake जनता आवाज व लोक आवाज
    Press Reporter Laxman Madake जनता आवाज व लोक आवाज
    शेवगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.
    1
    बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर, आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    1
    झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता
अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. 
हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष
नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.
या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर,
आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.
    1
    जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला 
जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    1
    अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer Nagar, Ahmednagar•
    19 hrs ago
  • Shree Gajanan Vidya Mandir School के और से Mk Deshmukh का Satkar
    1
    Shree Gajanan Vidya Mandir School के और से Mk Deshmukh का Satkar
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.