Shuru
Apke Nagar Ki App…
lokeni Ashu Khushi jivan jagle paje na Jay Hind Jay Maharashtra jas to jasto logon per potwa
Sachin fakirchand Pathare
lokeni Ashu Khushi jivan jagle paje na Jay Hind Jay Maharashtra jas to jasto logon per potwa
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- सिल्लोड येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निवेदन सिल्लोड, ता. — अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लहुजी क्रांती सेना, सिल्लोड तालुका तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीतील घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लहुजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सखाराम अहिरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे युवा जिल्हाध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष किशोर भिसे, शिवदास दणके , विष्णू साळवे ज्ञानेश्वर अहिरे किसन सौदागर संजय मोरे, राजू कांबळे,संजय गायकवाड सोनू सुरडकर संतोष कांबळे आनंद गायकवाड, रघुनाथ अहिरे, संजय निकाळजे, गणपत गायकवाड सुभाष निकाळजे तसेच लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.1
- गंगापूर-वैजापूर रोडवरील शिंगी पाटी येथे दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात शंकर विनायकराव वाघ (वय 30, रा. शिंगी, ता. गंगापूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीस उपचारासाठी गंगापूर घाटी येथे दाखल केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या जखमीवर उपचार सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.1
- 📍निजाम कालीन लातूर औसा रोडवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून शेतकऱ्यांना रस्ता खुला करून देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शेतकरी रमेश पाटील.1
- आरटीओ आणि वाहनचालकात शाब्दिक चकमक. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी बाबळगाव चे वाहन चालक यांना केली मदत. रेनापुर पोलीस ठाण्यात आरटीओ ने दिलेली तक्रार मध्यस्थीने माघार. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026. लातूर तालुक्यातील बाबळगाव चे रहिवासी असलेले निळकंठ शिंदे यांची बोलेरो पिकप वाहन ही कोथिंबीर भरण्यासाठी लातूर तालुक्यातील बामणी शिवारात लावली असता या ठिकाणी आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी गाडीचे कागदपत्रे विचारात दोघांमध्ये तक्रार होऊन निळकंठ शिंदे विरोधात रेनापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. लातुर जिल्ह्याच्या आरटीओ. कार्यालयातील आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी कारण नसतांना बाभळगाव येथील बुलेरो पीकअपचे मालक निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे बेलोरो पिकप वाहन मालक निळकंठ शिंदे यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांना माहिती कळवताच तात्काळ प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी रेणापूर पोलीसांना संपर्क साधुन निळकंठ शिंदे यांना मदत करीत प्रकरणाविषयी चौकशी कामे निळकंठ शिंदे हे बाभळगाव येथील रहीवाशी आहेत, त्यांनी कर्ज काढून एक बुलेरो पिक अप मालवाहतूक गाडी खरेदी केली आहे,ते दररोज शेतकऱ्यांची कोथिंबीर घेऊन नागपूर ला जातात, रोजच्या प्रमाणे ते लातुर तालुक्यातील बामणी शिवारात रसत्याच्या कडेला (रस्ता सोडून) आपली बुलेरो पिक अप व्हॅन लावली होती आणी ते कोथिंबीर घेण्यासाठी शेतकर्यांच्या फडात गेले होते, तेंव्हा अचानक अष्टा मोड हुन एक RTO ची गाडी आली आणी निळकंठ यास बुलेरो पिक अप व्हॅन चे कागदपत्र मागितले, निळकंठ यांनी सर्व कागदपत्र दाखविले, लायसन्स दाखविले यात गाडी मालकाची कोणतीही चूक नसताना संबंधित इन्स्पेक्टर नी पैसे मागीतले ते पैसेही गाडी मालक निळकंठ यांनी दिले, तरीही 1500 रुपयाचा खोटा फाईन गाडी वर लावला आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ यांना शिवीगाळ केली, नंतर इन्स्पेक्टर आणी निळकंठ मध्ये शाब्दिक चकमक झाली, आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, ही बातमी समजताच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी रेणापूर पोलीस निरीक्षक आणी संबंधित बीट आमलदार यांना संपर्क साधुन, निळकंठ यांना समज देत हे प्रकरण या ठिकाणीच मिटवण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे खंडापूरकर बाबा यांनी बोलताना आजही RTO लातुर मधील इन्स्पेक्टर यांची मुजोरी समाप्त झाली नाही, यापुढे जो कोणी भ्रष्टाचार इन्स्पेक्टर करत आसेल तर त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावर बसवुन धिंड काढण्यात यावे. आरटीओ कार्यालयातून कोणी त्रास देत असेल तर स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, फोन नंबर - 8888184444, 8055088888 वर संपर्क साधावा. वाहान चालकास मी विनंती करणार आहे, RTO ऑफिस मधील कोणाही इन्स्पेक्टर अन्य कर्मचाऱ्यांना एकरी भाषेचा वापर करु नका, त्यांना व्यक्तिगत भांडण करु नका आपण कायदेशीर तक्रार देवू असे सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले.1
- रिकवरी एजेंटो की दबंगई, क्रेडिट कार्ड का बिल नहीं दिया तो शख्स को पीटा, 3 गिरफ्तार पुणे के हडपसर इलाके में क्रेडिट कार्ड बकाया वसूली के नाम पर एक व्यक्ति की सरेआम पिटाई करने के मामले में तीन रिकवरी एजेंट गिरफ्तार किए गए हैं. आरोप है कि उन्होंने पीड़ित संदीप जमादार से वास्तविक बकाया से अधिक रकम मांगी और मना करने पर चौराहे पर रोककर हमला किया. घटना का वीडियो वायरल हो गया. पुलिस ने तीनों आरोपियों पर जबरन वसूली और हमला करने की धाराओं में मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है रिकवरी एजेंट की गिरफ्तारी पुलिस के अनुसार, गिरफ्तार आरोपियों की पहचान जय कासर, विनीत कासर और तनिष्क खुडे के रूप में हुई है. ये तीनों एक निजी वित्तीय संस्था के लिए रिकवरी एजेंट के तौर पर काम करते थे.1
- माणुसकीचा ओलावा: तहानलेल्या मुक्या जीवांना मिळाली तृप्ती | हृदयस्पर्शी घटना #flowers #everyone #virals #shorts #viral सध्या प्रचंड उष्णतेने संपूर्ण परिसर होरपळून निघत आहे. तापमान ४१ ते ४२ अंशांपर्यंत पोहोचले असून माणसांसह मुक्या प्राण्यांचं जगणंही कठीण झालं आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी हे जीव वणवण भटकताना दिसत आहेत... जालना जिल्ह्यातील अंबड येथे आज एक हृदयस्पर्शी घटना घडली. दुपारच्या कडक उन्हात ४ ते ५ वानरे आपल्या लहान पिल्लांसह पाण्याच्या शोधात पत्रकार संतोष जिगे यांच्या घरासमोर आली. उन्हामुळे व्याकुळ झालेल्या या वानरांना घरासमोरील पाण्याची टाकी दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिकडे धाव घेतली…यानंतर वानरांनी आणि त्यांच्या पिल्लांनी मनसोक्त पाणी पिऊन तहान भागवली. पाणी प्यायल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेलं समाधान पाहून उपस्थित सर्वांनाच एक वेगळाच आनंद मिळाला. तृप्त होऊन निघताना त्यांनी टाकलेली नजर जणू कृतज्ञतेची शांत भावना व्यक्त करत होती... दरम्यान, राजाभाऊ उगले यांनी २०१६ पासून आपल्या घराजवळ पशुपक्ष्यांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बसवलेला कळस आजही चिमण्यांसाठी जीवनदायी ठरत आहे... या भीषण उष्णतेत प्रत्येकाने आपल्या घराबाहेर, अंगणात किंवा गच्चीवर पक्षी आणि प्राण्यांसाठी पाण्याची सोय करावी… 🙏 थेंब थेंब पाणी… जीवांना देई जीवन!1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग.... भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती. बाईट : आमदार संजय केणेकर3