जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर विजयी जळगाव दि.22 (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 मध्ये उपांत्यफेरीत पोहचण्याठी चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी रावेर रॉयल्स आणि पाचोरा एसकेटी योद्धाज यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रावेरचा संघ विजयी झाला. दुसऱ्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्स संघाने दणदणीत विजय मिळवला. तत्पूर्वी २१ रोजी झालेल्या तिसऱ्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने विजय मिळवला. अमळनेर सुहांस जायंट्स आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. अमळनेर संघाची सुरूवात दमदार झाली. सलामीच्या जोडीने ४९ धावांची भागेदारी केली. मानव टिबरेवाल याने ३९ तर ऋषी यादव याने १० धावा केल्या. मधल्या फळीत आलेल्या अजय पाटील याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यानंतर आलेले खेळाडू प्रभाव पाडू शकले नाही. परंतु सतीश चतुर्वेदी याने ११ चेंडूत २० धावा केल्या. त्यामुळे अमळनेर संघाची धावसंख्या आठ गडी गमावून निर्धारित २० षटकांत १४७ झाली. चाळीसगावकडून ओम मुंडे याने चार षटकांत केवळ १३ धावांत तीन महत्वाचे बळी टिपले. अमेय कोळी, कार्तिक बटुंगा, अभी पाटील, सूरज पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यानंतर अमळनेरच्या गोलंदजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्सचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. अपवाद फक्त ओम मुंडे याचा राहिला. त्याने ३२ धावा केल्या. चाळीसगावचा संपूर्ण संघ १६.३ षटकांत ८४ धावांवर बाद झाला. त्यामुळे अमळनेरचा ६३ धावांनी विजय झाला. चाळीसगाव संघाच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना बाद करणारा मोहम्मद सैफ सामनावीर ठरला. रोमहर्षक सामन्यात रावेरचा पाहिला विजय पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या रावेर रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करत १९.२ षटकांत सर्व गडी गमावून १३० धावा केल्या. रावेरच्या संघात सलमावीर यश नहार याने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. आदित्य वाणी याने ११, तुषार चोरडियाने २०, मोहम्मद नमीन याने २७, धवल हेमानी याने १२, प्रज्वल राजपूत याने २२ धावांची खेळी केल्यामुळे रावेरचा संघ १०० पार जाऊ शकला. पाचोराकडून कैलास पांडे आणि विरेन पाटील यांनी २-२ तर सचिन चौधरी आणि निलेश पाटील यांनी एक-एक बळी घेतला. १३१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या पाचोरा संघ 19.3 षटकांत 123 धावांवर गारद झाला. त्यामुळे रावेरचा सात धावांनी विजय झाला. आर्यन देशमुखने अवघ्या 10 चेंडूत 24 धावांची आक्रमक खेळी करत डावाला वेग दिला, तर सिद्धेश देशमुख (22) आणि विरेंद्र पाटील (20) यांनी मधल्या फळीत योगदान दिले. पण त्यांची खेळी संघाला यश मिळवून देऊ शकली नाही. रावेरकडून यश नहार आणि मोहम्मद नोमान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धवल हेमदानी, अक्षय कोल्हे, कृष्णा माळी यांनी एक-एक बळी घेतला. तीन बळी, ३१ धावा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या यश नहार याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरचा दणदणीत विजय २१ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर संघाने पाचोरा एसकेटी योद्धाजवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला. नाणेफेक ॲडिशनल एसपी संदीपकुमार गावित व सामना अधिकारी विनीत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अभंग अजित जैन यांनी संदीपकुमार गावित यांचा सत्कार केला. प्रथम फलंदाजी करताना पाचोरा योद्धाजने २० षटकांत ९ गडी गमावून १०५ धावा केल्या. वीरेन पाटील (२९), रोहित तलरेजा (२५) आणि सचिन चौधरी (१४) धावांचे योगदान दिले. चाळीसगावकडून अभी पाटीलने ३ बळी घेतले, तर प्रणव जाधव व कोळी यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. १०६ धावांचे लक्ष्य चाळीसगाव संघाने केवळ १३.५ षटकांत पूर्ण केले. प्रशांत डोळे (३७), साहिल गायकर (२९) आणि कर्णधार ओम मुंडे (२४) यांनी दमदार फलंदाजी केली. यामुळे चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने सामना सहज जिंकला. आज क्वालीफायर ठरणार जेसीएलमधील साखळी फेरीचे आता दोन सामने बाकी आहे. त्यामुळे २३ एप्रिल रोजी क्वालीफायर ठरणार आहे. गुणतालिकेत जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग सहा- सहा गुण घेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजचे सामने (२३ एप्रिल) दुपारी ३ वाजता: रावेर रॉयल्स विरुद्ध X चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स. सायंकाळी ७.३० वाजता: पाचोरा एसकेटी योद्धाज X अमळनेर सुहांस जायंट्स. गुणतालिका संघ सामने विजयी पराभूत गुण जामनेर सातपुडा हिरोज 4 3 1 6 जळगाव कोगटा किंग 4 3 1 6 अमळनेर सुहांस जायंट्स 4 2 2 4 चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स 4 2 2 4 पाचोरा एसकेटी योद्धाज 4 1 3 2 रावेर रॉयल्स 4 1 3 2 रात्री ८ पर्यंत

- जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.1
- धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि महसूल तसेच रेल्वे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र वाद उफाळून आला. योग्य मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जमिनीचा ताबा देण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली.1
- पुणे जिल्ह्यातील मारुंजी आणि लगतच्या परिसरात (हिंजवडी, आयटी पार्क परिसर) उकाड्यापासून सुटका: गेल्या काही दिवसांपासून पुणेकर 38°C ते 40°C तापमानाचा सामना करत होते. या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा स्थानिकांसाठी वरदान ठरला आहे. आयटी हबमध्ये चैतन्य: कामाच्या व्यापात आणि ट्रॅफिकच्या कचाट्यात असलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नोकरदारांना या मृदगंधामुळे मोठा मानसिक दिलासा मिळाला. तात्पुरता दिलासा: जरी हा पाऊस तात्पुरता असला, तरी वाढत्या उष्णतेच्या लाटेला त्याने काही काळ लगाम घातला आहे.2
- 😡 Owaisi Ka Powerful Debate Reaction 🔥💥1
- सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- नमस्कार मित्रांनो... बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नाव जोरदार चर्चेत आले आहे... ते नाव म्हणजे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा! जनतेशी थेट नाळ जोडणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून सानंदा यांची ओळख निर्माण झाली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामांची चर्चा आजही नागरिकांमध्ये होताना दिसते. गरीब, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सानंदा यांची कार्यशैली ही शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध मानली जाते. वेळेचे महत्त्व, संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हे त्यांच्या नेतृत्वाचे मुख्य गुण मानले जातात. अलीकडच्या काळात त्यांच्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची भूमिका चर्चेत राहिली. सध्या ते बारामती येथे सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षात त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही... आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांचे नावही चर्चेत असून, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समर्थक काय म्हणतात? सानंदा म्हणजे गरीबांचा आधार... कार्यकर्त्यांची ताकद... आणि बुलढाणा जिल्ह्याचा दमदार आवाज! एकूणच काय तर... राणा दिलीपकुमार सानंदा यांची राजकीय गाडी आता पुन्हा वेगाने धावताना दिसत आहे... आणि आगामी काळात ते मोठी भूमिका बजावतील, अशी चर्चा रंगली आहे.1
- धुळे शहरातील देवपूर भागात जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आयटीआय कॉलेजसमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युत डीपीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कडाक्याच्या उन्हामुळे डीपीने क्षणार्धात पेट घेतल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.1