logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले. या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.

4 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
4 hrs ago

पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले. या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले. या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.
    1
    पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले.

या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तांचा मोठा जनसागर उसळला आहे. या धार्मिक उत्सवातील मुख्य सोहळा ३० जुलै रोजी पार पडणार आहे.
    1
    विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तांचा मोठा जनसागर उसळला आहे. या धार्मिक उत्सवातील मुख्य सोहळा ३० जुलै रोजी पार पडणार आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 min ago
  • नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी (गुपचूप) ग्रामपंचायतीमध्ये दलित निधीतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. कामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलक लावलेला नसून निधीचा तपशील, प्रशासकीय मंजुरी आणि कंत्राटदाराची माहिती लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते दिनेश कोडापे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी किशोर डाखोळे यांनी रविवार असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केले असावे असे सांगत, पाहणी करून आवश्यक माहिती फलक तातडीने लावण्याचे स्पष्ट केले. तर हिंगणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता, नियमभंग किंवा शासकीय निधीच्या वापरात त्रुटी आढळल्यास जबाबदार ग्रामविकास अधिकारी, कंत्राटदार व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी (गुपचूप) ग्रामपंचायतीमध्ये दलित निधीतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. कामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलक लावलेला नसून निधीचा तपशील, प्रशासकीय मंजुरी आणि कंत्राटदाराची माहिती लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते दिनेश कोडापे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली.

या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी किशोर डाखोळे यांनी रविवार असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केले असावे असे सांगत, पाहणी करून आवश्यक माहिती फलक तातडीने लावण्याचे स्पष्ट केले. तर हिंगणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता, नियमभंग किंवा शासकीय निधीच्या वापरात त्रुटी आढळल्यास जबाबदार ग्रामविकास अधिकारी, कंत्राटदार व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • 'बिरसा मिसाईल फोर्स'मध्ये सहभागी होण्यासाठी आजच ७९८७५६७५२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    'बिरसा मिसाईल फोर्स'मध्ये सहभागी होण्यासाठी आजच ७९८७५६७५२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात अन्यायकारक पद्धतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरकराच्या विरोधात सोमवार, २८ जुलै रोजी कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा आणि तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार थांबवून ही घरकरवाढ तात्काळ रद्द करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून हा मोर्चा बाजार चौक कळमेश्वर ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे. शहरातील नागरिकांवर आर्थिक भार टाकणारे निर्णय प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावेत, अशी मुख्य मागणी आयोजकांनी केली आहे. "जनतेच्या हक्कासाठी संघर्ष, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करूया!" असे आवाहन करत या आंदोलनात सर्व नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हक्काच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात अन्यायकारक पद्धतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरकराच्या विरोधात सोमवार, २८ जुलै रोजी कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा आणि तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार थांबवून ही घरकरवाढ तात्काळ रद्द करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून हा मोर्चा बाजार चौक कळमेश्वर ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे.

शहरातील नागरिकांवर आर्थिक भार टाकणारे निर्णय प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावेत, अशी मुख्य मागणी आयोजकांनी केली आहे. "जनतेच्या हक्कासाठी संघर्ष, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करूया!" असे आवाहन करत या आंदोलनात सर्व नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हक्काच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • उमरेड येथे नुकतेच रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांनी भिवापूर पोलिस स्टेशनला भेट देऊन तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत ठाणेदार रवींद्र मस्कर यांच्याशी चर्चा केली. शहरात चालणारे अवैध दारू व्यवसाय, सट्टापट्टी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्याच्या कडक सूचना उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी ठाणेदारांना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थित महिला दक्षता समितीच्या सदस्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच ठाणेदार रवींद्र मस्कर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी किरण नागरीकर, निलीमा नागोसे, निशा जांभुळे, वैशाली पेंदाम, मंजुषा समर्थ, अर्चना मोटघरे, वैशाली खंडारे आणि संयोगिता बांबोळे उपस्थित होत्या.
    1
    उमरेड येथे नुकतेच रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांनी भिवापूर पोलिस स्टेशनला भेट देऊन तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत ठाणेदार रवींद्र मस्कर यांच्याशी चर्चा केली. शहरात चालणारे अवैध दारू व्यवसाय, सट्टापट्टी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्याच्या कडक सूचना उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी ठाणेदारांना दिल्या.

या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थित महिला दक्षता समितीच्या सदस्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच ठाणेदार रवींद्र मस्कर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी किरण नागरीकर, निलीमा नागोसे, निशा जांभुळे, वैशाली पेंदाम, मंजुषा समर्थ, अर्चना मोटघरे, वैशाली खंडारे आणि संयोगिता बांबोळे उपस्थित होत्या.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा येथे आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात तब्बल ६,६०८ नागरिकांनी विविध आजारांची मोफत तपासणी करून घेतली. आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील हे पहिले शिबिर पार पडले असून, यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक राहिला. तपासणी करून घेतलेल्यांमध्ये ३,०८७ पुरुष आणि ३,५२१ महिलांचा समावेश आहे. या शिबिरात सर्वाधिक ४,१८६ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्याशिवाय ६३८ रुग्णांची हाडरोग, ५९६ रुग्णांची कान-नाक-घसा, ३५४ रुग्णांची दंत, ३२५ रुग्णांची त्वचारोग आणि १३२ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. ४,२२५ नागरिकांची औषधवैद्यक, १,०४७ जणांची असंसर्गजन्य आजार, ३०१ रुग्णांची HLH, १९७ रुग्णांची मानसोपचार, ३९४ रुग्णांची ईसीजी आणि ७ महिलांची स्तन कॅन्सर तपासणी झाली. या तपासणीदरम्यान ५८ रुग्णांमध्ये हृदयरोग, १०६ जणांमध्ये मधुमेह व रक्तदाब तर २२ संशयित कर्करोग रुग्ण आढळले. शिबिरात ३,८१७ रुग्णांना औषधांचे तर ३,२६१ नागरिकांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ३४५ नागरिकांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे ६६ रुग्णांचे आर्थिक मदतीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच १९९ अपंग बांधवांकडून आवश्यक साहित्यासाठी मोजमाप घेण्यात आले. या पहिल्याच शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागरिकांना पुढील तीन शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील महाआरोग्य शिबिरे ८ व ९ ऑगस्ट रोजी तळेगाव (शामजीपंत), १० व ११ ऑगस्ट रोजी हिंगणघाट आणि १३ व १४ ऑगस्ट रोजी देवळी येथे आयोजित केली जाणार आहेत.
    1
    पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा येथे आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात तब्बल ६,६०८ नागरिकांनी विविध आजारांची मोफत तपासणी करून घेतली. आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील हे पहिले शिबिर पार पडले असून, यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक राहिला. तपासणी करून घेतलेल्यांमध्ये ३,०८७ पुरुष आणि ३,५२१ महिलांचा समावेश आहे.

या शिबिरात सर्वाधिक ४,१८६ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्याशिवाय ६३८ रुग्णांची हाडरोग, ५९६ रुग्णांची कान-नाक-घसा, ३५४ रुग्णांची दंत, ३२५ रुग्णांची त्वचारोग आणि १३२ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. ४,२२५ नागरिकांची औषधवैद्यक, १,०४७ जणांची असंसर्गजन्य आजार, ३०१ रुग्णांची HLH, १९७ रुग्णांची मानसोपचार, ३९४ रुग्णांची ईसीजी आणि ७ महिलांची स्तन कॅन्सर तपासणी झाली. या तपासणीदरम्यान ५८ रुग्णांमध्ये हृदयरोग, १०६ जणांमध्ये मधुमेह व रक्तदाब तर २२ संशयित कर्करोग रुग्ण आढळले. शिबिरात ३,८१७ रुग्णांना औषधांचे तर ३,२६१ नागरिकांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ३४५ नागरिकांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे ६६ रुग्णांचे आर्थिक मदतीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच १९९ अपंग बांधवांकडून आवश्यक साहित्यासाठी मोजमाप घेण्यात आले. या पहिल्याच शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागरिकांना पुढील तीन शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील महाआरोग्य शिबिरे ८ व ९ ऑगस्ट रोजी तळेगाव (शामजीपंत), १० व ११ ऑगस्ट रोजी हिंगणघाट आणि १३ व १४ ऑगस्ट रोजी देवळी येथे आयोजित केली जाणार आहेत.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • अलिबाग शहरातील बाजारपेठेत आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात अलिबाग येथील स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बाजारपेठ परिसरात आयोजित करण्यात आलेला हा दिंडी सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
    1
    अलिबाग शहरातील बाजारपेठेत आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात अलिबाग येथील स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बाजारपेठ परिसरात आयोजित करण्यात आलेला हा दिंडी सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.