बुलढाणा/जनगणना २०२७: बुलढाणा जिल्ह्यात तयारीला वेग; डिजिटल जनगणनेसाठी क्षेत्रिय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न *बुलढाणा, आगामी 'जनगणना २०२७' ही पूर्णपणे कागदविरहित व डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय तयारीने गती घेतली असून, जिल्हा स्तरावरील क्षेत्रिय प्रशिक्षकांचे (फिल्ड ट्रेनर) प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले. जिल्हा स्तरावर दि. ६ ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत क्षेत्रिय प्रशिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण तीन बॅचेसमध्ये घेण्यात आले. दि. १० एप्रिल रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिसऱ्या बॅचचे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये २१ क्षेत्रिय प्रशिक्षार्थींना डिजिटल जनगणनेचे तांत्रिक बारकावे, ॲपचा वापर आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मास्टर ट्रेनर संजय खडसे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा आणि डॉ. रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी, खामगाव यांनी प्रशिक्षार्थींना सखोल मार्गदर्शन केले. जनगणनेच्या कामात पारदर्शकता राहावी आणि CMMS पोर्टलवर काम करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या वतीने बुलढाणा जिल्हा समन्वयक म्हणून ऋषीकेश व-हाडे (SI GII) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय सज्जतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा समन्वयक ऋषीकेश व-हाडे आणि नायब तहसीलदार (सा.प्र.) प्रमोद करे यांनी जिल्ह्याचा व्यापक दौरा केला. यामध्ये दि. ८ एप्रिल रोजी मोताळा येथील ग्रामीण व शहरी भागात, दि. ९ एप्रिल रोजी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथे तर दि. १० एप्रिल रोजी मलकापूर, नांदुरा, खामगाव व शेगाव येथील ग्रामीण व शहरी भागांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान 'चार्ज अधिकारी' स्तरावर ग्रामीण व शहरी भागातील प्रत्यक्ष कामांची पाहणी करून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या तांत्रिक समस्यांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या. या डिजिटल उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.
बुलढाणा/जनगणना २०२७: बुलढाणा जिल्ह्यात तयारीला वेग; डिजिटल जनगणनेसाठी क्षेत्रिय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न *बुलढाणा, आगामी 'जनगणना २०२७' ही पूर्णपणे कागदविरहित व डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात प्रशासकीय तयारीने गती घेतली असून, जिल्हा स्तरावरील क्षेत्रिय प्रशिक्षकांचे (फिल्ड ट्रेनर) प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले. जिल्हा स्तरावर दि. ६ ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत क्षेत्रिय प्रशिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण तीन बॅचेसमध्ये घेण्यात आले. दि. १० एप्रिल रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिसऱ्या बॅचचे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये २१ क्षेत्रिय प्रशिक्षार्थींना डिजिटल जनगणनेचे तांत्रिक बारकावे, ॲपचा वापर आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. मास्टर ट्रेनर संजय खडसे उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा आणि डॉ. रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी, खामगाव यांनी प्रशिक्षार्थींना सखोल मार्गदर्शन केले. जनगणनेच्या कामात पारदर्शकता
राहावी आणि CMMS पोर्टलवर काम करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या वतीने बुलढाणा जिल्हा समन्वयक म्हणून ऋषीकेश व-हाडे (SI GII) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय सज्जतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा समन्वयक ऋषीकेश व-हाडे आणि नायब तहसीलदार (सा.प्र.) प्रमोद करे यांनी जिल्ह्याचा व्यापक दौरा केला. यामध्ये दि. ८ एप्रिल रोजी मोताळा येथील ग्रामीण व शहरी भागात, दि. ९ एप्रिल रोजी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथे तर दि. १० एप्रिल रोजी मलकापूर, नांदुरा, खामगाव व शेगाव येथील ग्रामीण व शहरी भागांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान 'चार्ज अधिकारी' स्तरावर ग्रामीण व शहरी भागातील प्रत्यक्ष कामांची पाहणी करून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या तांत्रिक समस्यांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या. या डिजिटल उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.
- प्रशांत सुरेश देशमुखसिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र😤on 17 April
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.1
- बुलढाणा जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!1
- खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.1
- राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- मोताळा वन विभागात घोटाळा? परवानगीशिवाय बांधकाम सुरू!1
- जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बातमी: परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना सुरेशकुमार जेथलिया यांनी एक लोकप्रिय, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व उभं केलं होतं. गावोगावी फिरत, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेता म्हणून त्यांची ओळख होती. साधेपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला सहज भेटणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि “आपला माणूस” म्हणून उभे राहणारे नेतृत्व म्हणून जेथलिया यांना विशेष मान मिळत होता. सुरुवातीला काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, त्यामुळे ते “विकासाला चालना देणारे नेतृत्व” म्हणून ओळखले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी “आपला नेता गेला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर लोकांच्या मनात घर केलेला, त्यांच्यासोबत चालणारा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.1