मुंबईतील दादर येथे काँग्रेसच्या बैठकीत भाजपाच्या अपप्रचारामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगीरी, भाजपाच्या धमक्यांना न घाबरता पोलखोल करणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे उद्गार भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला.सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमांद्वारे मी कधीही न केलेली तुलना माझ्या तोंडी घालून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अपप्रचारामुळे काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी मनःपूर्वक दिलगीरी व्यक्त करतो असे त्यांनी सांगितले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली.बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे.ते माझे आदर्श,प्रेरणास्थान,स्वाभिमान आहेत.त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही.इतिहासावर मतभेद असू शकतात मात्र त्यावर संयत,अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी,समाजात जात-धर्मावर आधारित ध्रुवीकरण होऊ नये हीच माझी भूमिका होती.भाजपाने या मुद्द्यांवर अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत नियोजनबद्ध अपप्रचार केला.धमक्या दिल्या गेल्या मात्र अशा धमक्यांना मी घाबरत नाही.भाजपाची पोलखोल करतच राहू अंगावर आले तर शिंगावर घेऊ असा ठाम इशाराही सपकाळ यांनी दिला.या बैठकीस माजी मुख्यमंत्री, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य,विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते , ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे,खजिनदार अभय छाजेड,वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन)ऐडवोकेट गणेश पाटील,मोहन जोशी,सिद्धार्थ हत्तीअंबिरे,वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ, गोपाळ तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा कामाचा आढावा बैठकीत मांडण्यात आला. आगामी वर्ष हे संघटन बांधणीचे वर्ष म्हणून घोषित करत ग्रामीण भागात मंडल स्तरावर,गावपातळीवर तसेच शहरांमध्ये वॉर्ड,प्रभाग अध्यक्ष नियुक्तीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सपकाळ यांनी दिली.शेतकरी प्रश्न,बेरोजगारी, महिला सुरक्षा,कायदा- सुव्यवस्था या मूलभूत मुद्यांवर आंदोलनांच्या माध्यमातून भाजप सरकारला जाब विचारण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, व्यापार करार व विविध वादांमुळे पंतप्रधान प्रचंड दबावात आहेत. सरकारच्या अपयशाबाबत जनतेमध्ये जागृती करणे आवश्यक असून शेतकरी,रोजगारी,मूलभूत प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे.चव्हाण यांनी लोकल रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवरही लक्ष वेधले. दररोज कोस्टल रोडवरून सुमारे ५० हजार नागरिक प्रवास करतात तर लोकलमधून सुमारे ९० लाख प्रवासी प्रवास करतात. लोकल अपघातांत दररोज अनेक प्रवाशांचा बळी जातो.लोकल प्रवाशांना सुरक्षितता आणि सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे.दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाढती संख्या ही सरकारच्या अपयशाची साक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती या विषयावर व्याख्यान दिले.बैठकीच्या शेवटी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मुंबईतील दादर येथे काँग्रेसच्या बैठकीत भाजपाच्या अपप्रचारामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या त्याबद्दल दिलगीरी, भाजपाच्या धमक्यांना न घाबरता पोलखोल करणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे उद्गार भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला.सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमांद्वारे मी कधीही न केलेली तुलना माझ्या तोंडी घालून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अपप्रचारामुळे काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी मनःपूर्वक दिलगीरी व्यक्त करतो असे त्यांनी सांगितले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली.बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की छत्रपती शिवाजी
महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे.ते माझे आदर्श,प्रेरणास्थान,स्वाभिमान आहेत.त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही.इतिहासावर मतभेद असू शकतात मात्र त्यावर संयत,अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी,समाजात जात-धर्मावर आधारित ध्रुवीकरण होऊ नये हीच माझी भूमिका होती.भाजपाने या मुद्द्यांवर अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत नियोजनबद्ध अपप्रचार केला.धमक्या दिल्या गेल्या मात्र अशा धमक्यांना मी घाबरत नाही.भाजपाची पोलखोल करतच राहू अंगावर आले तर शिंगावर घेऊ असा ठाम इशाराही सपकाळ यांनी दिला.या बैठकीस माजी मुख्यमंत्री, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य,विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते , ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे,खजिनदार अभय छाजेड,वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन)ऐडवोकेट गणेश पाटील,मोहन जोशी,सिद्धार्थ हत्तीअंबिरे,वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, अनंत गाडगीळ, गोपाळ तिवारी आदी मान्यवर उपस्थित
होते. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा कामाचा आढावा बैठकीत मांडण्यात आला. आगामी वर्ष हे संघटन बांधणीचे वर्ष म्हणून घोषित करत ग्रामीण भागात मंडल स्तरावर,गावपातळीवर तसेच शहरांमध्ये वॉर्ड,प्रभाग अध्यक्ष नियुक्तीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सपकाळ यांनी दिली.शेतकरी प्रश्न,बेरोजगारी, महिला सुरक्षा,कायदा- सुव्यवस्था या मूलभूत मुद्यांवर आंदोलनांच्या माध्यमातून भाजप सरकारला जाब विचारण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.बैठकीत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, व्यापार करार व विविध वादांमुळे पंतप्रधान प्रचंड दबावात आहेत. सरकारच्या अपयशाबाबत जनतेमध्ये जागृती करणे आवश्यक असून शेतकरी,रोजगारी,मूलभूत प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे.चव्हाण यांनी
लोकल रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवरही लक्ष वेधले. दररोज कोस्टल रोडवरून सुमारे ५० हजार नागरिक प्रवास करतात तर लोकलमधून सुमारे ९० लाख प्रवासी प्रवास करतात. लोकल अपघातांत दररोज अनेक प्रवाशांचा बळी जातो.लोकल प्रवाशांना सुरक्षितता आणि सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी आहे.दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वाढती संख्या ही सरकारच्या अपयशाची साक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे या विषयावर तर ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती या विषयावर व्याख्यान दिले.बैठकीच्या शेवटी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
- ४० दिवसांनंतर हॉटेलमध्ये नॉनव्हेजला निरोप👍❤️Please Subscribe My Channel SM News 26271
- दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला- मुक्त ठेवण्यासाठी,मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून संयुक्त पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट नियंत्रणाखाली हे पथक कार्यरत असून परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत.या संयुक्त पथकाकडून दररोज किमान ३ वेळा दादर परिसरात मार्चिंग व गस्त घालण्यात येते.फेरीवाले पुन्हा रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करणार नाहीत यासाठी सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. गस्तीसाठी आवश्यक वाहने,मनुष्यबळ,कामगारवर्ग उपलब्ध करून देण्यात आला असून कारवाई अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत राहावी,पदपथ नागरिकांसाठी मोकळे ठेवावेत या उद्देशाने ही संयुक्त मोहीम सुरू असून पुढील काळातही ती सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.1
- Post by Shailesh Karande1
- मुंबई क्लाइमेट वीक और ग्लोबल इकोनॉमिक को-ऑपरेशन 2026 कॉन्फ्रेंस के संबंध में मीडिया से संवाद...1
- महाराष्ट्र के बीड में भीषण हादसा : सोलापुर-घुले नेशनल हाईवे पर पेट्रोल टैंकर पलटा, ज़ोरदार विस्फोट के बाद 100 - 150 मीटर तक फैली आग #viral #beed #dhule #maharashtra1
- जी हां दोस्तो हम लोग इनसे मिल चुके है टैलेंटेड लडका है सपोर्ट करे आप सब मस्त लडका है #viralmithun▶️▶️▶️1
- Post by जय श्री सीताराम2
- Post by Shailesh Karande1