शेनोडी मोरगव्हाण बस सेवा बंद,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान,वंचितचा आंदोलनाचा इशारा कळमनुरी तालुक्यातील शेनोडी, मोरगव्हाण मार्गावरील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बस सेवा सुरु होत नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे . तात्काळ या मार्गावर दोन दिवसात बस सेवा सुरू करा,मुदतीत बससेवा सुरु न झाल्यास आगारासह ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात ठाण मांडून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील शेनोडी, मोरगव्हाण परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी कळमनुरी शहरात येतात. मात्र या रस्त्यावर खड्डे असल्याचे कारण पुढे करून कळमनुरी बस आगाराने या मार्गावर बससेवा सुरु केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधी पायी तर कधी खाजगी प्रवासी वाहनाने यावे लागत आहे. खाजगी प्रवासी वाहनांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दरम्यान, सोमवारी विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राजू कांबळे यांच्याशी संपर्क साधून वाहतुकीची समस्या मांडली. त्यानंतर कांबळे यांच्यासह युवा तालुकाध्यक्ष मोहमद अस्लम, दिनेश पाईकराव, सुशील वाढवे, समाधान पाईकराव यांनी कळमनुरी आगारात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बससेवा का सुरु केली नाही अशी विचारणा केली असता त्या मार्गावर खड्डे आहेत तसेच चालक देखील कमी असल्याचे सांगण्यात आले.याप्रकारामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत पुढील दोन दिवसांत बससेवा सुरु करा अशी मागणी केली. या मुदतीत बससेवा सुरु न झाल्यास कळमनुरी आगार व खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठाण मांडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे .
शेनोडी मोरगव्हाण बस सेवा बंद,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान,वंचितचा आंदोलनाचा इशारा कळमनुरी तालुक्यातील शेनोडी, मोरगव्हाण मार्गावरील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बस सेवा सुरु होत नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे . तात्काळ या मार्गावर दोन दिवसात बस सेवा सुरू करा,मुदतीत बससेवा सुरु न झाल्यास आगारासह ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात ठाण मांडून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील शेनोडी, मोरगव्हाण परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी कळमनुरी शहरात येतात. मात्र या रस्त्यावर खड्डे असल्याचे कारण पुढे करून कळमनुरी बस आगाराने या मार्गावर बससेवा सुरु केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधी पायी तर कधी खाजगी प्रवासी वाहनाने यावे लागत आहे. खाजगी प्रवासी वाहनांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दरम्यान, सोमवारी विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राजू कांबळे यांच्याशी संपर्क साधून वाहतुकीची समस्या मांडली. त्यानंतर कांबळे यांच्यासह युवा तालुकाध्यक्ष मोहमद अस्लम, दिनेश पाईकराव, सुशील वाढवे, समाधान पाईकराव यांनी कळमनुरी आगारात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बससेवा का सुरु केली नाही अशी विचारणा केली असता त्या मार्गावर खड्डे आहेत तसेच चालक देखील कमी असल्याचे सांगण्यात आले.याप्रकारामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत पुढील दोन दिवसांत बससेवा सुरु करा अशी मागणी केली. या मुदतीत बससेवा सुरु न झाल्यास कळमनुरी आगार व खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठाण मांडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे .
- चिकणी डोमगा रोड ची दुरवस्था बस ल ये जा करण्यास खूप हलाखीचे झाले व विद्यार्थ्यास खूप त्रास chkni ते domga या रस्त्यावरून महामंडळ ची बस चालते त्या बसणी चार गावचे विद्यार्थी नेर ल शिक्षणा साठी जाते पण आज त्या रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे4
- सुलेमान खान मॉब लिंचिंग मामले को एक साल पूरा, इंसाफ की मांग को लेकर प्रशासन से फिर गुहार1
- 'एनडीसी बँकेच्या' अध्यक्षपदी डॉ.तुषार राठोड यांच्या निवडी बद्दल मुखेडात मिठाई वाटप व फटाक्यांची अतिषबाजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुखेड- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संबंध मुखेड शहरात सोमवार दि.१० ऑगस्ट २०२६ रोजी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने मिठाई वाटप करुन व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. आमदार डॉ. तुषार राठोड हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत विजय प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध व्युहरचना केल्यामुळे ते सदर बँकेच्या संचालक पदी विजयी झाले आणि त्यानंतर अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजप व सहकारी पक्षासाठी आनंद द्विगुणित करणारी घटना असल्यामुळे भाजपा व सर्व सहकारी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी शहरातील बाऱ्हाळी नाका, मुखेड न्यायालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बसस्टँड चौक व ठिकठिकाणी मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, भाजपा जिल्हा चिटणीस किशोर सिंह चौहान, भाजपा जिल्हा सरचिटणीस शिवा आलेवार बेळीकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हणमंत नरोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नागनाथ गायकवाड, भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत खंकरे, किरण पाटील बोडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश गजलवाड, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा न.पा.सभापती करण रोडगे, नगरसेवक प्रतिनिधी संजय तमशेट्टे, नगरसेवक प्रतिनिधी शौकत होनवडजकर, स्विय सहाय्यक सुधीर चव्हाण, भाजपा ता. उपाध्यक्ष कमलाकर अगदे, भाजप युवा नेते राजु गंदपवाड, नदीम तांबोळी, सरपंच संजय गोगे, नागोराव पाटील, बालाजी मिसाळे, बाळू नाईक जुनेकर, गजानन आकुलवाड, सरपंच सतीश भालेराव, माजी सरपंचआत्माराम तलवारे, शिवा समराळे, व्यंकट पाटील, शिवानंद पाटील उपसरपंच, राजु राठोड राजू पाटील, श्रीनिवास राठोड, कल्याणराव श्रीरामे, निलेश काटशेव संकल्प गोकुळे, उमेश श्रीरामे, गणेश आंबेकर, विकास चव्हाण, सचिन पवार, सचिन चव्हाण, गुंडेराव कांबळे, महेश मरकंटवाड, अविनाश घाटे, विश्वनाथ अरंने, हेमंत कुलकर्णी, उमाकांत पाटील, मुन्ना बंडे, विरसंग आप्पा, प्रतिक गायकवाड सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- अकोला : नगरसेवक सागर भारुकाच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मनपाची कारवाई अकोला : नगरसेवक सागर भारूकाच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मनपाची कारवाई Anchor : अकोला महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी आणि विविध नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपोषणास बसलेले नगरसेवक सागर भारुका यांच्यावर पहिल्याच दिवशी महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाने दादागिरी करत उपोषणाचा मंडप गुंडाळला तसेच आंदोलनाचे सर्व साहित्य जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, सागर भारुका यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. परंतु, मनपा कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बळजबरी करत आंदोलकांना तेथून हटवले. या कारवाईदरम्यान उपोषणस्थळी ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना व अनादर झाल्याचा आरोप सागर भारुका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. प्रशासकीय दडपशाहीविरोधात तीव्र संताप भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीवर व कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे कारवाई केल्यामुळे अकोला मनपाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले जात आहेत. "प्रशासन स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी लोकशाही मार्गाने चाललेला आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे," असा आरोप स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. महापुरुषांच्या प्रतिमांचा अनादर करणाऱ्या आणि आंदोलकांवर बेकायदेशीरपणे दबाव आणणाऱ्या मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण अत्यंत तापले आहे.2
- Panchayat Samiti Akola | दुपारी 12 वाजले, कृषी विभागात कोणीच नाही? अकोला पंचायत समितीच्या कृषी विभागात ‘सन्नाटा’! दुपारी १२ वाजले, तरी अधिकारी-कर्मचारी गायब? अकोला : पंचायत समिती अकोला येथील कृषी विभागाच्या कार्यालयीन कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुपारी १२ वाजण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतकरी व नागरिकांच्या विविध कामांसाठी पंचायत समितीच्या कृषी विभागात ये-जा सुरू असते. मात्र, कार्यालयीन वेळेतच संबंधित विभागात कोणीही उपस्थित नसल्यास नागरिकांनी आपली कामे कोणाकडे करायची, असा सवाल उपस्थित होत आहे. कार्यालयीन वेळेत कर्मचारी-अधिकारी नेमके कुठे होते? त्यांची उपस्थिती नोंदवहीत नोंद झाली आहे का? कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचे पालन केले जात आहे का? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, संबंधित विभागात अचानक पाहणी करून बायोमेट्रिक/उपस्थिती नोंद तपासावी आणि कर्तव्यावर गैरहजर आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या कामासाठी असलेले कार्यालयच दुपारी ‘ओस’ पडत असेल, तर प्रशासनाचा कारभार नेमका चालतोय तरी कसा? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.1
- जिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ली" ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर ने न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र ."जिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ली" ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर ने न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र सिरसाळा : .मजिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ल आहे, ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य असल्याचे युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर यांनी म्हटले आहे. न्यू हायस्कूल सिरसाळा येथे चैतन्य राडकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना आपला शैक्षणिक प्रवास सांगत यशाचा मूलमंत्र दिला. राडकर म्हणाले कि, "ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनेच्या जोरावर यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी कोणत्याही मोठ्या शहरात जाण्याचीच गरज असते असे नाही, तर घरी राहूनही अभ्यास करता येतो." त्याने विद्यार्थ्यांना खालील महत्त्वाचे सल्ले देतांना म्हटले कि स्पर्धा परीक्षेत रोजचा अभ्यास आणि सातत्य राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आजच्या काळात अभ्यास साहित्य सहज उपलब्ध आहे. इंटरनेट, ऑनलाइन क्लासेस आणि डिजिटल माध्यमांचा योग्य आणि सकारात्मक वापर केल्यास दिल्ली किंवा पुण्याचा खर्च वाचवून घरीच उत्तम तयारी करता येते. परिस्थितीला दोष न देता लढाआपल्या यशाचा प्रवास उलगडताना चैतन्य म्हणाला की, ग्रामीण भागात अनेकदा सोयी-सुविधांची कमतरता असते, पण ती यशाच्या आड येऊ शकत नाही. "जर तुमच्यात जिद्द असेल, तर परिस्थिती कितीही बिकट असली तरी तुम्ही मार्ग काढू शकता. आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींना स्वतःवर हावी होऊ देऊ नका, उलट त्यांनाच तुमची ताकद बनवा," असे आवाहन त्याने केले. सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव गायकवाड,आभार प्रदर्शन होळंबे सर यांनी केले . दरम्यान मुख्याध्यापक राठोड यांच्या सह न्यू हायस्कूल येथील काॅलेज चे प्रमुख तसेच शालेय शिक्षक कर्मचारी व पत्रकार मिलिंद चोपडे,पवन राडकर,स्वप्नील राडकर उपस्थित होते. ● *नकारात्मकतेपासून दूर राहा* प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वतःवर विश्वास ठेवा. स्पर्धा परीक्षेत अपयशाने खचून न जाता आपल्या चुका सुधारत राहणे आवश्यक आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकले पाहिजे,मि ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे.असेही चैतन्य राडकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले आहे. ● राडकर यांचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी - मुख्याध्यापक राठोड : सत्कार सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष समारोपात आपल्या भाषणात मुख्याध्यापक बालासाहेब राठोड म्हणाले कि, चैतन्य राडकर यांच्या यशामुळे गाढेपिंपळगाव आणि परळी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याचे हे यश ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना , स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.3
- गवंढाळा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल अपूर्ण; संतप्त ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या! खामगाव : तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायती मधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि विकासकामांच्या अनियमिततेची चौकशी करून पूर्ण अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन मांडले. काही दिवसांपूर्वी गवंढाळा येथील रहिवासी गोपाल सतीश पांढरे आणि महेंद्र रमेश पाटील यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी गट विकास अधिकारी यांनी १० दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.त्यानुसार आज सोमवारी सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल अत्यंत अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अहवाल अपूर्ण असून तो आम्हाला अजिबात मान्य नाही.जोपर्यंत सर्व मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी होऊन पूर्ण अहवाल दिला जात नाही, तोपर्यंत पंचायत समितीतून उठणार नाही. गरज पडल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.4
- 📍नांदेड पोलिसांचे उत्कृष्ट कार्य! 👮♂️Excellent Work by Nanded Police! 🚨1