Shuru
Apke Nagar Ki App…
Pandurang Ambhure
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुस्लिम महापौर केला तर विरोधकांचं पोट दुखतं, तुम्ही केलं तर ठीक आम्ही केलं तर बाईट - आमदार डॉ राहुल पाटील2
- शिवपुतळ्यासाठी आमरण उपोषण सुरू 🚨 हिमायतनगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तातडीने जागा निश्चित करावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले असले तरी लेखी आदेश मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दि. 10 ऑगस्ट 2023 पासून मागणी प्रलंबित असूनही ठोस निर्णय न झाल्याने शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवरायांच्या जयंतीपूर्वी पेटलेला हा प्रश्न प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. ✊ शिवरायांच्या सन्मानासाठी लढा सुरूच! #हिमायतनगर #शिवपुतळा #छत्रपतीशिवाजीमहाराज #स्वाभिमानीसंभाजीब्रिगेड #आमरणउपोषण #शिवप्रेमी #महाराष्ट्र #लोकशाही #नगरपंचायत #BreakingNews1
- महाशिवरात्रीच्या पवित्र प्रभातकाळी मंठा नगरी जणू शिवतत्त्वाच्या अलौकिक स्पंदनांनी न्हाऊन निघाली होती. मंदिरांच्या घंटानादात, मंत्रोच्चारांच्या गंभीर लयीत आणि भक्तिभावाच्या ओलाव्यात अध्यात्म, सेवा आणि समाजबंध यांचा दिव्य त्रिवेणी संगम साकार झाला. या मंगल क्षणी Press Council of Maharashtra (पीसीएम) पत्रकार संघ, मंठा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमय फराळ-वाटप उपक्रमाने सेवाभावाची साक्षात मूर्तीच उभी केली. श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जगदंबादेवी मार्गावरील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक व सात्विक भावनेने फराळाचे वितरण करण्यात आले. पहाटे ६.४५ ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात प्रत्येक क्षण ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत होता. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता; जणू भक्ती आणि सेवा एकरूप होऊन शिवआराधनेचे सजीव रूप धारण करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. मदने माऊली महाराज विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीएम पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार हरिराम तिवारी (बाबूजी तिवारी) तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रदीप देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर पीसीएम पत्रकार संघ मंठाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी, योगेश देशमुख, जीवन काळे, अतुल खरात, गजानन माळकर, आतिश राठोड, अंकुश देशमाने, सुभाष झरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. मदने माऊली महाराजांनी अन्नदानाचे दैवी महात्म्य अत्यंत भावपूर्ण शब्दांत अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अन्नदान ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. सेवा हीच खरी शिवपूजा असून, गरजूंना प्रेमाने अन्न देणे म्हणजे शिवतत्त्वाची प्रत्यक्ष आराधना होय. या प्रसंगी त्यांनी अभंगाच्या ओव्या सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले— “तेथे एक शीत दिधल्या अन्न! कोटी कुळांचे होय उद्धरण! कोटी याग केले पूर्ण! ऐसे महिमान ये तीर्थाचे!” प्रेमपूर्वक अर्पण केलेला अन्नाचा एक घासही कोटी कुळांच्या उद्धाराचे कारण ठरतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमास ‘शिवपूजेचे साक्षात रूप’ असे संबोधले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांप्रती अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले फराळ-वाटप हे निस्सीम सेवाभावाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. समाजात समत्व, करुणा आणि बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रा. प्रदीप देशमुख यांनीही आपल्या मनोगतात सेवा आणि औदार्य हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचे प्रतिपादन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपली तर समाजपरिवर्तन सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसीएम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश देशमुख, गणेश खराबे, आतिश राठोड, बाळासाहेब खराबे, राजकुमार कांगणे, रशीद पठाण, विजय राठोड, उस्मान पठाण, एकनाथ एंडइत, जिजाभाऊ गते, शेंडगेभाऊ आदींनी परिश्रम घेतले. फराळाची सात्विक व रुचकर तयारी आचारी कैलास पवार, हुकुमसिंग राजपुरोहित आणि प्रल्हाद नरवडे यांनी केली. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर साकारलेली ही प्रसादवाटप केवळ अन्नवितरणाचा उपक्रम न ठरता समत्व, सेवा आणि श्रद्धेचा सजीव उत्सव ठरली. शिवनामाच्या अखंड गजरात आणि सेवाभावाच्या ऊर्जेतून प्रकटलेली ही शिवआराधना मंठा नगरीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली—जिथे सेवा म्हणजेच साधना आणि दान म्हणजेच देवत्व, याची अनुभूती सर्वांना लाभली.1
- Post by Today One Live1
- Post by Mohammad Rafikh1
- गोदावरी नदी पात्रामध्ये कचरा तथा नाले व गटारीचे दूषित पाणी साचल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरत असून गोदावरी नदीपात्रातील जलजीव धोक्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुद्धा थोडक्यात येत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. गोदावरी नदी शुद्धीकरणा साठी करोडो निधी रुपये येऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य ती उपाययोजना स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत नसताना दिसत असल्याचे सुद्धा नागरिकांच्या भावनातून व्यक्त होत आहे. शिक बांधवांचे हिंदू बांधवांचे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या ठिकाणी अनेक भाविक भक्त गुरुद्वारा इतर देवस्थानास दर्शनासाठी अनेक राज्यातून या ठिकाणी येतात . त्याच ठिकाणी अशा प्रकारे घाणीचे साम्राज्य बघून. आश्चर्यचकित होत आहेत. एवढा मोठा पवित्र स्थान आणि ऐतिहासिक स्थान असून सुद्धा कुठल्याही प्रकारे योग्य त्या सोयी सुविधा स्थानिक प्रशासनाच्या वतीने दिसत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या परिस्थितीत गोदावरी नदी पात्रात अनेक सर्व जसे की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करण्याचे महत्त्व असून सुद्धा अंघोळ करणे कठीण झाले आहे. तरीसुद्धा कुठलीही हालचाल स्थानिक प्रशासनाच्या वतीने होत असताना दिसत नाही. याकरिता आज रोजी जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते तेजपाल सिंघ खेड व त्यांच्या सहकार्याच्या वतीने. तक्रार देखील करण्यात आली आहे. लवकरात लवकर प्रदूषित होत असलेली गोदावरी नदी त्वरित गांभीर्याने दखल घेऊन स्वच्छ करण्याच्या मार्गे शासनाने लागावे अशी मागणी केली आहे.4
- Post by Raghunath Aghao1
- एकादशी निमित्त सांगवी येथील श्री खाटू श्याम बाबा मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघण्यास मिळाली तसेच प्रत्येक एकादशीला विशेष पूजा अर्चना भजन कीर्तन होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी श्री श्याम बाबा यांच्या चरणी साकडे घालतात. पौराणिक कथेमध्ये सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांच्या सर्व कला शक्ती गुण श्री खाटू श्याम बाबा यांना आशीर्वादरूपी दिले. आणि असे वरदान दिले की कलियुगामध्ये प्रत्येक घरामध्ये पुंजले जाशील तू हरलेल्यांचा सहारा बनशील म्हणजेच हारे का सहारा बाबा श्याम हमार जो भक्त या जगापासून हरला आहे तो तुझ्या चौकटीवर येईल त्याला तू तारणार व त्याच्या मनोकामना पूर्ण करून त्याच्या पाठी उभा राहणारा असा देखील वरदान भगवान श्रीकृष्णाने या खाटू श्याम बाबा यांना दिला आहे. याची महिमा अद्भुत असून श्रीकृष्णाने विशेष असं वरदान देखील या खाटू श्याम बाबाला दिला आहे. की ज्याच्या जीवनात कष्ट ,दुःख , दारिद्र्य, रोग , लिहिलेला आहे. ते कोणी टाळू शकत नाही परंतु ते देखील तू तुझ्या चौकटीवर आलेल्या भक्तांच सर्व संकट दुःख दारिद्र्य कष्ट दूर करण्याच विशेष अधिकार देखील या श्याम बाबांना दिलेला आहे. या कलियुगामध्ये मोठ्या प्रमाणात श्री खाटू श्याम बाबा यांचे भक्त यांना अनेक वेळा विविध अशा मनोकामनामध्ये चमत्कारीरुपी अनुभव आलेला आहे. म्हणून आज लाखो करोडो भक्त या श्याम बाबाच्या दर्शनासाठी राजस्थान येथे मोठ्या संख्येने जाऊन दर्शन घेतात त्याचेच प्रतिरुपी म्हणून नांदेड सांगवी एअरपोर्ट रोड या ठिकाणी मंदिराची स्थापना करण्यात आली असून याचा नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक भक्तांना विशेष असा आशीर्वाद प्राप्त होण्याकरिता व त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्याकरिता या मंदिरात सर्वांसाठी प्रवेश असून कुठल्याही प्रकारे या ठिकाणी रोख टोक नसून सर्वांना प्रवेश देण्यात येतो या खाटू श्याम बाबा मंदिर समितीच्या वतीने योग्य त्या सोयी सुविधा येणाऱ्या भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन श्याम बाबा यांचे दर्शन घेतात व आपल्या जीवनात अनुभवाचे बदल घडून घेतात. आज रोजी या ठिकाणी एकादशी निमित्त विशेष पूजा अर्चना आणि संध्याकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या भक्ती भावाने खाटू श्याम बाबांचे गुणगान गायले जाते. आपणही या ठिकाणी येऊन अनुभव घ्याल अशी अपेक्षा. जय श्री श्याम1