बदनापूर येथील जिल्हा परिषद शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा बदनापूर - दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी जि प प्रशाला बदनापूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रशालेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शेख नजीर भाई इनामदार यांच्या हस्ते महापुरुषांना क्रांतिवीरांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तदनंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शेख आर के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मुलांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन घोषणा दिल्या प्रशालीतील मुख्याध्यापकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसा चे महत्व मुलांना सांगितले तसेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री एस ए पठाडे यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापकाचे विनंतीला मान देऊन या सहविचार सभेमध्ये प्रामुख्याने उपस्थित राहिलेले शाळेचे माजी विद्यार्थी तसेच नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष शेख वसीम,कृष्ण कऱ्हाडे, राहुल जऱ्हाड,शेख नईम, सुभाष पंडित, सय्यद समीर, राम सावंत कैलाश खैरे,कपिल जाधव,अखिल पठाण, योगेश रगडे, राहुल मगरे कैलास कोल्हे,शेख शफीक इत्यादी उपस्थित होते प्रशालेतील जेष्ठ श्री एस ए पठाडे यांनी आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.
बदनापूर येथील जिल्हा परिषद शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा बदनापूर - दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी जि प प्रशाला बदनापूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रशालेतील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शेख नजीर भाई इनामदार यांच्या हस्ते महापुरुषांना क्रांतिवीरांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तदनंतर
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शेख आर के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मुलांनी राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन घोषणा दिल्या प्रशालीतील मुख्याध्यापकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसा चे महत्व मुलांना सांगितले तसेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री एस ए पठाडे यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापकाचे विनंतीला मान देऊन
या सहविचार सभेमध्ये प्रामुख्याने उपस्थित राहिलेले शाळेचे माजी विद्यार्थी तसेच नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष शेख वसीम,कृष्ण कऱ्हाडे, राहुल जऱ्हाड,शेख नईम, सुभाष पंडित, सय्यद समीर, राम सावंत कैलाश खैरे,कपिल जाधव,अखिल पठाण, योगेश रगडे, राहुल मगरे कैलास कोल्हे,शेख शफीक इत्यादी उपस्थित होते प्रशालेतील जेष्ठ श्री एस ए पठाडे यांनी आलेल्या माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.
- रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.1
- छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल; प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. मुंबईच्या दिशेने जात असताना पाटोदा येथे त्यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण दीर्घकाळ सुरू होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अशक्तपणा आणि निर्जलीकरणाचा त्रास झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून विविध वैद्यकीय तपासण्या पुन्हा करण्यात येणार आहेत. सध्या जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती तपासली जात आहे. त्यांची सध्याची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीकडे मराठा समाजासह समर्थकांचे लक्ष लागले आहे.4
- मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी निघाले गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर.1
- SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा। SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।1
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान भोकरदन इसरारखान पठाण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे. गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे. समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.4
- जालन्यात महिनाभरानंतर दमदार पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी; वातावरणात गारवा, पिकांना नवसंजीवनीची आशा जालन्यात महिनाभरानंतर दमदार पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी; वातावरणात गारवा, पिकांना नवसंजीवनीची आशा आज दिनांक 17 गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरासह परिसरात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर दमदार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली असली तरी पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचे भाव दिसून आले. मागील सुमारे महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट निर्माण झाले होते.1
- निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई1
- पिशोर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू ;तिघे गंभीर; मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत मदत देण्याची हर्षवर्धन जाधवांची मागणी छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत शासकीय मदत देण्याची मागणी केली. दुर्घटनेतील कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे जाधव यांनी म्हटले आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीजेचा कहर सिल्लोड-कन्नड तालुक्यात दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पावसादरम्यान वीज कोसळल्याने या घटना घडल्या असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.1