महिलांना साहाय्य व मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास सक्षम करणारे जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र नांदेड दि.१९ एप्रिल:- केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे तसेच महाराष्ट्र शासन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र कार्यरत आहे. जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्राचे कार्य महिलांसाठीच्या शासकीय कृतीमधील त्रुटी दूर करणे व यासाठी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या प्रक्रिया बळकट करणे, सामाजिक बदलासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आणि महिलांना शासकीय योजनांचा अधिक चांगला वापर व उपलब्धता मिळवून देणे. महिला सक्षमीकरण केंद्राचे उद्दिष्ट माहितीतील तफावत दूर करणे, जनजागृती मोहीम राबवणे, समान व्यासपीठ तयार करणे आणि महिलांना विविध गटांमध्ये संघटित करणे. शोषण आणि भेदभाव दूर करून महिलांना सक्षम करणे आणि त्यांना संसाधने व निर्णयांमध्ये त्यांचा योग्य वाटा मिळेल याची खात्री करणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. मुली, किशोरवयीन मुली आणि ज्येष्ठ महिलांसह समाजातील सर्व स्तरांतील महिलांपर्यंत पोहोचणे आणि विविध हितधारक गटांच्या सहभागातून, बालिका, किशोरवयीन मुली आणि सर्व वयोगटातील महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देईल हे या केंद्राचे ध्येय आहे. हे केंद्र जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत, महिला व बालविकास भवन, महात्मा फुले मार्केट च्या बाजूला, गणेश नगर रोड, नांदेड येथे सुरु आहे. ह्या केंद्राने आता पर्यंत पूर्ण नांदेड जिल्यातील तालुका व ग्रामपंचायत ठिकाणी जावून १८९ जनजागृती कार्यकर्म घेऊन कार्यक्रमात सहभागी महिला, मुली व उपस्थित सर्व व्यक्तीना केंद्र व राज्य शासनाद्वारे महिला व बालकांबाबत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच महिला हेल्पलाईन 181, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ समिती गठीत करणे ,she Box portal इत्यादी संदर्भात मुलींना आणि महिलांना माहिती पुस्तिका देऊन मार्गदर्शन केले. तसेच 1098 चाईल्ड लाईन, बालसंगोपन योजनांची माहिती देण्यात आली. शासकीय योजनांची विविध माहिती, मिशन शक्ति मोबाईल app ,बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006, अश्या ई. विषयीची माहिती पुस्तिका देऊन प्रचार प्रसिध्दी करण्यात आली.

- Post by Karan1
- मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.7
- नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.1
- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Sharad Dayedar1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by Santosh Dhakulkar1
- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3