*सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद* गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली. “जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे. नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

- गुन्हेगार सावधान! साताऱ्यात नव्या एसपींची धडाकेबाज एंट्री; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले सातारा : जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेताच निखिल पिंगळे यांनी आपल्या आक्रमक आणि कर्तव्यदक्ष कार्यशैलीची स्पष्ट झलक दाखवून दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारी विश्वाला थेट इशारा देत आपल्या ‘ॲक्शन प्लॅन’ची रूपरेषा मांडली. “जिल्ह्यातील गुन्हेगारी मुळासकट उपटून टाकणार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांमध्ये खळबळ उडाली असून, गुन्हेगारी वर्तुळात मोठी घबराट निर्माण झाली आहे. नव्या पोलीस अधीक्षकांच्या या एन्ट्रीमुळे सातारा पोलीस दलात नवचैतन्य संचारले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. विशेषतः गुंडगिरी, टोळ्यांचे वर्चस्व आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या घटकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री तसेच वाळू माफियांविरुद्ध लवकरच आक्रमक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. “सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. निखिल पिंगळे यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे सातारकरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा लवकरच गुन्हेगारीमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट; अवकाळी पावसाची हजेरी प्रतिनिधी : स्वाती हडकर चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आज दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांची धांदल उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत धावपळ उडाली असून दुकानदारांनी साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी लगबग केली. विजांच्या कडकडाटामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण भागातही पावसाची जोरदार सर पडल्याची माहिती मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू तसेच भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून पुढील काही तास हवामान कसे राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे व अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.4
- विक्रम शिंदे /भोर दि.२३ भोरसाठी वर्षभरासाठी ५०कोटीचा निधी आणला शिल्लक चार वर्षात किती निधी आणतो ते बघा असे सांगून विरोधकांच्या भुलथापाना बळी पडू नका असे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर म्हणाले.भोर येथील नगरपालिकेने उभारलेल्या व्यापारी संकूल आणि रामबाग परिसरातील जलतरण तलावाचे लोकार्पण आमदार मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मा.श्री.रामचंद्रनाना आवारे - नगराध्यक्ष,न.प.भोर मा.श्री.गजाननजी शिंदे सर - सी.ओ.- न.प.भोर मा.श्री.विक्रमदादा खुटवड-जि.प.सदस्य,पुणे मा.श्री.रणजितदादा शिवतरे मा.उपाध्यक्ष,जि.प. मा.श्री.प्रवीणजी जगदाळे -जि.प.सदस्य,पुणे मा.सौ.मनीषाताई कंक - सभापती,पं.स.भोर मा.श्री.राजेशभाऊ बोडके - सदस्य,पं.स.भोर मा.श्री.केदारजी देशपांडे - गटनेते,न.प.भोर व सर्व सन्माननीय नगरसेवक ,पदाधिकारी तथा अधिकारी उपस्थित होते.2
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- Post by मन्सूर शेख1
- Post by Kishor subhash jadhav1
- पिंपरी चिंचवड :- महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आरटीई RTE प्रवेश प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. शहराचे तापमान ४२ अंशांवर गेलेले असताना, भर उन्हात ताटकळत उभे राहूनही पालकांच्या पदरी निराशा पडत आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाला असून, या विलंबाबाबत राज्य शासनाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे... आकुर्डीतील कै. फकीर भाई पानसरे उर्दू शाळा आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्र या दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन केंद्रांवर मिळून केवळ १,१९४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून, महापालिकेला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन पालकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....2
- विक्रम शिंदे /भोर दि.२२ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या मात्र पैकी २४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने तालुक्यातील रावडी , अंगसुळे ,खडकी या ३ ग्रामपंचायतीसाठी पोट निवडणूक येत्या २८ होत आहे.या निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज (दि.22) पंचायत समिती भोर येथे पार पडले.रावडी आणि खडकी येथे सरपंचपदासाठी तर खडकी येथे केवळ एका वॉर्डमधील केवळ एका सदस्यपदासाठी ही पोट निवडणूक होत असल्याचे निवासी नायब तहसीलदार महसूल वैशाली घोरपडे यांनी सांगितले.1