नेर तालुक्यात हजरला जयंती मिरवणुकीत सोळा वर्षे विद्यार्थ्यांचा खून नेर तालुका हादरला; जयंती मिरवणुकीत १६ वर्षीय विद्यार्थ्याचा खून, आरोपी जंगलातून जेरबंद नेर, तालुक्यातील वीरगव्हाण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान किरकोळ धक्काबुक्कीच्या कारणावरून अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण नेर तालुका हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी जंगलात लपून बसलेल्या अवस्थेत अटक करत मोठे यश मिळवले. मृतक लकी हरिचंद्र ढोले (वय १६) हा दहावीचा विद्यार्थी होता. तो जयंती मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाला होता. याचवेळी आरोपी ओम दिनेश मनवर (वय १९, रा. वडगाव गाढवे, ता. दारव्हा), जो गेल्या तीन महिन्यांपासून वीरगव्हाण येथे आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होता, तोही मिरवणुकीत सहभागी झाला होता. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी लकी व ओम यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी आरोपीने लकीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे. १४ एप्रिल रोजी सायंकाळी जयंती मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद उफाळला. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या आरोपीने थेट चाकू काढून लकीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात लकी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. उपस्थितांनी तत्काळ त्याला नेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने मिरवणुकीचा उत्साह क्षणात शोककळेत बदलला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढत जंगलाचा आसरा घेतला. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत बोथगव्हाण परिसरातील जंगलात सखोल तपास सुरू केला. अखेर आरोपी एका शेतातील झोपडीत ताडपत्री टाकून लपून बसल्याचे निष्पन्न झाले. ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत पीएसआय प्रकाश आडे, दामोदर वाघमारे, पोलीस पाटील योगेश राऊत व पोलीस पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भादवी कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, नेर परिसरात क्षुल्लक कारणांवरून वाढत चाललेल्या खूनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वीही नेर येथे शहेबाज या पानटपरी चालकाचा अशाच कारणावरून खून झाला होता. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अधिक कडक करण्याची आणि अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

- Post by Sharad Dayedar1
- Post by Amravati News Update1
- Post by Shaikh irfan Shaikh isa1
- रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका! हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने खांब न हटवता काम पूर्ण केल्याने सध्या वाहनांची ये-जा अडचणीत आली आहे. अनेक अपघात घडून काहींना गंभीर दुखापत व अपंगत्वही आले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर खांब हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Nanded #RoadSafety #Mahavitaran #PublicIssue BreakingNews MaharashtraNews TrafficProblem1
- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Sharad Dayedar1