logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धुळ्यात अन्न व औषध विभागाने अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत तपासणी करत वेलनेस फॉरेव्हर, गर्ग एंटरप्राइजेस आणि हॉटेल सिल्व्हर स्पूनवर धाड टाकली आहे. या धडक कारवाईदरम्यान अन्न विभागाने एकूण 4 नमुने जप्त केले आहेत. या तपासणीत जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये पनीर, रिफा सोयाबीन ऑइल, डेअरी मिल्क मिल्किनीस आणि डेअरी मिल्क फ्रूट नट यांचा समावेश आहे.

3 hrs ago
user_DHULE CRIME NEWS
DHULE CRIME NEWS
धुळे, धुळे, महाराष्ट्र•
3 hrs ago

धुळ्यात अन्न व औषध विभागाने अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत तपासणी करत वेलनेस फॉरेव्हर, गर्ग एंटरप्राइजेस आणि हॉटेल सिल्व्हर स्पूनवर धाड टाकली आहे. या धडक कारवाईदरम्यान अन्न विभागाने एकूण 4 नमुने जप्त केले आहेत. या तपासणीत जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये पनीर, रिफा सोयाबीन ऑइल, डेअरी मिल्क मिल्किनीस आणि डेअरी मिल्क फ्रूट नट यांचा समावेश आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुळे येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादातून एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतीच्या बांधाच्या वादातूनच या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
    1
    धुळे येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादातून एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतीच्या बांधाच्या वादातूनच या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील कायमस्वरूपी पाणी टंचाई निवारणासाठी ९३५ कोटी ६९ लाख रुपयांच्या बृहद आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आमदार आमश्या दादा पाडवी यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, योजनेच्या पूर्णत्वासाठी अतिरिक्त राज्य निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कार्यात्मक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ पासून संपूर्ण देशात जल जीवन मिशन कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात असून, केंद्र सरकारकडून ज्या प्रमाणात निधी मिळतो, त्याच प्रमाणात राज्य शासनाकडूनही वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
    1
    अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील कायमस्वरूपी पाणी टंचाई निवारणासाठी ९३५ कोटी ६९ लाख रुपयांच्या बृहद आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आमदार आमश्या दादा पाडवी यांनी या योजनेच्या मंजुरीसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, योजनेच्या पूर्णत्वासाठी अतिरिक्त राज्य निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कार्यात्मक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ पासून संपूर्ण देशात जल जीवन मिशन कार्यक्रम सुरू केला आहे. त्यानुसार राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात असून, केंद्र सरकारकडून ज्या प्रमाणात निधी मिळतो, त्याच प्रमाणात राज्य शासनाकडूनही वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
    user_ईश्वर मराठे (पत्रकार)
    ईश्वर मराठे (पत्रकार)
    Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील म्हसला खुर्द येथे एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे।
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील म्हसला खुर्द येथे एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे।
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील ओम नारायण बावणे या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये 544 गुण मिळवत एमबीबीएस प्रवेशासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. जाफराबाद बस स्थानक परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील पालकांच्या मुलाने हे प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ओमचे इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे झाले असून तो सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने CBSE दहावीच्या परीक्षेत 85 टक्के, तर बारावीत 89.4 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दोन वर्षे नीट परीक्षेची कठोर तयारी केली आणि एकूण तीन वेळा ही परीक्षा दिली. 2025 मधील पहिल्या प्रयत्नात त्याला 421 गुण मिळाले होते, जे एमबीबीएससाठी अपुरे ठरले. त्यानंतर 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्याने मोठा मानसिक धक्का बसूनही खचून न जाता त्याने पुन्हा एक महिना अभ्यास केला आणि अखेर 21 जून 2026 च्या परीक्षेत 544 गुण मिळवून आपले स्वप्न साकार केले. मोबाईल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहून केलेले नियोजनबद्ध अध्ययन, जिद्द, नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कष्टकरी पालकांचा त्याग यांच्या बळावर ओमने हे यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या यशामुळे माहोरा गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्र, शिक्षक आणि मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
    2
    जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील ओम नारायण बावणे या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये 544 गुण मिळवत एमबीबीएस प्रवेशासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. जाफराबाद बस स्थानक परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील पालकांच्या मुलाने हे प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ओमचे इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे झाले असून तो सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने CBSE दहावीच्या परीक्षेत 85 टक्के, तर बारावीत 89.4 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दोन वर्षे नीट परीक्षेची कठोर तयारी केली आणि एकूण तीन वेळा ही परीक्षा दिली. 2025 मधील पहिल्या प्रयत्नात त्याला 421 गुण मिळाले होते, जे एमबीबीएससाठी अपुरे ठरले. त्यानंतर 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्याने मोठा मानसिक धक्का बसूनही खचून न जाता त्याने पुन्हा एक महिना अभ्यास केला आणि अखेर 21 जून 2026 च्या परीक्षेत 544 गुण मिळवून आपले स्वप्न साकार केले.

मोबाईल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहून केलेले नियोजनबद्ध अध्ययन, जिद्द, नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कष्टकरी पालकांचा त्याग यांच्या बळावर ओमने हे यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या यशामुळे माहोरा गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्र, शिक्षक आणि मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये नगरसेवक शोएब मिर्झा यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले आहे. 'हरित धुळे, स्वच्छ धुळे' हे ध्येय साध्य करण्यासाठी, तापमान नियंत्रित राखण्यासाठी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला आहे.
    1
    धुळे शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये नगरसेवक शोएब मिर्झा यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले आहे. 'हरित धुळे, स्वच्छ धुळे' हे ध्येय साध्य करण्यासाठी, तापमान नियंत्रित राखण्यासाठी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला आहे.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावतीमध्ये 'जनसेवा सप्ताह' अंतर्गत २६ जुलै २०२६ रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा सत्कार सोहळा स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड येथे सकाळी ११ वाजता पार पडणार असून यामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू, प्रशस्तीपत्र आणि वृक्ष देऊन गौरविण्यात येईल. तसेच यावेळी मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शनही लाभणार आहे. राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २२ जुलै ते २७ जुलै २०२६ या कालावधीत 'जनसेवा सप्ताह' साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या संकल्पनेतून 'ग्रीन अमरावती' मोहीम राबवून शहरात २५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. या पर्यावरणपूरक अभियानाचा शुभारंभ २२ जुलै रोजी शासकीय आयटीआय संस्था येथून केला जाईल. या जनसेवा सप्ताहादरम्यान अमरावतीच्या विविध प्रभागांमध्ये भरगच्च लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये २२ जुलै रोजी रक्तदान शिबिर, महिलांना शिलाई मशीन वाटप, आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन वाटप केले जाईल. २३ जुलै रोजी एसटी बस एनएमसी कार्ड शिबिर व रुग्णालयात स्नेहभोजन, २४ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात फळ वाटप व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भोजन वाटप होईल. २५ जुलै रोजी महाराजस्व अभियान आणि आरोग्य तपासणी शिबिर, २६ जुलै रोजी मुख्य विद्यार्थी सत्कार सोहळा आणि २७ जुलै रोजी विलास नगर स्मशानभूमीत भव्य वृक्षारोपण, मृगेंद्र मठ येथे रक्तदान शिबिर, तसेच युसूफ पॅलेस येथे रेशन कार्ड व एनएमसी कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शोध प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
    1
    लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावतीमध्ये 'जनसेवा सप्ताह' अंतर्गत २६ जुलै २०२६ रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा सत्कार सोहळा स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड येथे सकाळी ११ वाजता पार पडणार असून यामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू, प्रशस्तीपत्र आणि वृक्ष देऊन गौरविण्यात येईल. तसेच यावेळी मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शनही लाभणार आहे.

राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २२ जुलै ते २७ जुलै २०२६ या कालावधीत 'जनसेवा सप्ताह' साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या संकल्पनेतून 'ग्रीन अमरावती' मोहीम राबवून शहरात २५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. या पर्यावरणपूरक अभियानाचा शुभारंभ २२ जुलै रोजी शासकीय आयटीआय संस्था येथून केला जाईल.

या जनसेवा सप्ताहादरम्यान अमरावतीच्या विविध प्रभागांमध्ये भरगच्च लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये २२ जुलै रोजी रक्तदान शिबिर, महिलांना शिलाई मशीन वाटप, आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन वाटप केले जाईल. २३ जुलै रोजी एसटी बस एनएमसी कार्ड शिबिर व रुग्णालयात स्नेहभोजन, २४ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात फळ वाटप व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भोजन वाटप होईल. २५ जुलै रोजी महाराजस्व अभियान आणि आरोग्य तपासणी शिबिर, २६ जुलै रोजी मुख्य विद्यार्थी सत्कार सोहळा आणि २७ जुलै रोजी विलास नगर स्मशानभूमीत भव्य वृक्षारोपण, मृगेंद्र मठ येथे रक्तदान शिबिर, तसेच युसूफ पॅलेस येथे रेशन कार्ड व एनएमसी कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शोध प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_आयकॉन महाराष्ट्र न्यूज
    आयकॉन महाराष्ट्र न्यूज
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मा. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरिक्षण (SIR) मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून, नागरिकांना मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादीतील त्रुटी दूर करून पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपल्या परिसरातील बीएलओ (BLO) यांच्याशी संपर्क साधून आपली आवश्यक माहिती अद्ययावत करावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग हाच पारदर्शक आणि बळकट लोकशाहीचा पाया असल्याने, सर्व नागरिकांनी या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मा. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरिक्षण (SIR) मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून, नागरिकांना मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादीतील त्रुटी दूर करून पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

एक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपल्या परिसरातील बीएलओ (BLO) यांच्याशी संपर्क साधून आपली आवश्यक माहिती अद्ययावत करावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग हाच पारदर्शक आणि बळकट लोकशाहीचा पाया असल्याने, सर्व नागरिकांनी या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नांदेड-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर आता तो पूलच ढासळू लागला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून खबरदारी म्हणून पुलाखालील मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणताही पाऊस नसतानाही या राष्ट्रीय महामार्गाच्या संरक्षक भिंतीचा भाग अशा प्रकारे कोसळत असल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि दर्जावर आता थेट प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
    2
    नांदेड-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील विष्णुपुरी येथील उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर आता तो पूलच ढासळू लागला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून खबरदारी म्हणून पुलाखालील मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणताही पाऊस नसतानाही या राष्ट्रीय महामार्गाच्या संरक्षक भिंतीचा भाग अशा प्रकारे कोसळत असल्याने उड्डाणपुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि दर्जावर आता थेट प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.