महिला दिनानिमित्त नंदुरबारमध्ये महाआरोग्य शिबिर; तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व एड्स जनजागृती जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नंदुरबार येथे नगरपालिका महिला व बाल विकास विभाग, जिल्हा रुग्णालय नंदुरबार आणि संपूर्ण सुरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे तसेच विविध आजारांचे वेळेवर निदान व्हावे या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात एसएसके मॅनेजर गोपाल गाडीलोहार यांच्या प्रास्ताविकाने झाली. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विश्वास सूर्यवंशी यांनी महिलांना निरोगी जीवनासाठी नियमित योगा, व्यायाम आणि संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिले. यानंतर जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सुभाष निकम व तेजल माळी यांनी महिलांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी, नियमित तपासणीचे महत्त्व काय आहे आणि महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये याबाबत मार्गदर्शन करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी यांनी महिलांनी आज विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली असून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी: महाआरोग्य शिबिरात महिलांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात HIV, सिफिलिस, हिपॅटायटिस, रक्तदाब (BP), साखर (Sugar) तसेच इतर आजारांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. तसेच नेत्ररोग, त्वचारोग, दंतरोग, स्त्रीरोग, ENT आदी विभागांतील तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिरात खालील तज्ञ डॉक्टरांनी महिलांची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केले – डॉ. कपिल दुसेजा – नाक, कान, घसा तज्ञ डॉ. अन्सारी रिजवान – फिजिशियन डॉ. श्वेता जिंदे – स्त्रीरोग तज्ञ डॉ. दीपक वसावे – नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रिती वळवी – त्वचा व गुप्तरोग तज्ञ डॉ. दिनेश वळवी – मानसोपचार तज्ञ डॉ. कैलाश चव्हाण – दंतरोग तज्ञ डॉ. कृष्णकुमार वळवी – बालरोग तज्ञ या शिबिराला नवनिर्माण संस्था, विहान संस्था आणि जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी नगरपालिका अध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी, महिला व बालविकास सभापती, शिक्षण सभापती तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील महिला डॉक्टर व महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या महाआरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने महिलांनी तपासणी करून घेतली. प्रतिनिधी विनोद पवार पत्रकार नंदुरबार.

- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- Post by Kishor k Patil Patil2
- श्रीमद् भागवत कथा का आयोजन कलश शोभा यात्रा1
- येवला शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, आता भरवस्तीतही नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नांदगाव बायपासलगत असलेल्या रमणपार्क सोसायटीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब प्रसूतीसाठी दवाखान्यात गेलेले असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी रवी पवार हे आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पवार यांनी आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. दवाखान्यातून परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले पाहून पवार कुटुंबाला धक्काच बसला. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, "पोलिसांचा वचक संपला आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका गरीब कुटुंबाने अडचणीच्या काळासाठी साठवलेला पैसा चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- मुंबईतील बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ‘ग्रीन बॉण्ड’चे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप व एनएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान उपस्थित होते. महापालिकांना विकासकामांसाठी भांडवली बाजारातून निधी उभारण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिकमध्ये सुमारे २५ हजार कोटींची विकासकामे सुरू असून भविष्यात शहर गुंतवणुकीचे केंद्र ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2