Shuru
Apke Nagar Ki App…
सिटी इंडिया न्यूज
Santosh Waghmare
सिटी इंडिया न्यूज
More news from Amravati and nearby areas
- सिटी इंडिया न्यूज1
- Post by Israrkhn1
- महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार स्मृति श्रद्धांजलि कार्यक्रम वर्धा में आयोजित किया1
- वर्धा1
- भाजप कार्यालय राळेगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आली पत्रकार परिषद राळेगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सहा वाजता भाजपा कार्यालयात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राळेगाव शहरातील विकास कामे पतदिव्यांचा प्रलंबित प्रश्न व नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून व डॉ. अशोकराव उईके यांच्या नेतृत्वात मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत पत्रकारांना माहिती देण्यात आली नजीकच्या काळात ही योजना लवकर कार्यान्वित होईल यासाठी योजना आखण्यात आली या पत्रकार परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे, शुभम मुके व इतर पदाधिकारी व शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.1
- आर्णी तालुक्यातील लोणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त विदर्भस्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील २५ भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. भक्तीभावपूर्ण व सुरेल सादरीकरणाच्या जोरावर हस्तापुर येथील ‘सार्थक’ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व भजनी मंडळांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित भजने सादर केली. कार्यक्रमास भजनप्रेमी नागरिक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. सहभागी सर्व भजनी मंडळांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.1
- स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अंतर्गत हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रम उत्साहात हिंगणघाट वर्धा जिल्हा आज हिंगणघाट येथे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा आणि यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम अंतर्गत भवन्स जी. व्ही. एम., हिंगणघाट येथे प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सेंट जॉन कॉन्व्हेंट, महेश ज्ञानपीठ विद्यालय व भवन्स जी. व्ही. एम. या तीन शाळांनी सहभाग घेतला. वर्ग ७, ८ व ९ मधील प्रत्येकी चार विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेत सहभाग नोंदवला. सर्व सहभागी शाळांचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. राज पराडकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), वर्धा आणि डॉ. आशिष लांडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ. आशिष लांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राहुल भोयर (वैद्यकीय अधीक्षक—प्रभारी, ग्रामीण रुग्णालय वडनेर), सौ. धरती तामगिरे (प्राचार्या, भवन्स जी. व्ही. एम.), श्री एन. एस. बरेंडिया (जिल्हा अवैद्यकीय पर्यवेक्षक, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा—कुष्ठरोग कार्यालय, वर्धा), प्रा. राकेश साटोने (उपप्राचार्य, तुळसकर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी) व श्री मिलिंद सावरकर (विशेष शिक्षक—कला) उपस्थित होते. प्रश्नमंजुषेची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. स्पर्धा दोन फेऱ्यांत घेण्यात आली—पहिली लेखी व दुसरी बझर राऊंड. स्क्रीनवर दाखवलेल्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी जलद उत्तरे दिली. मूल्यांकन श्री मिलिंद सावरकर यांनी केले. निकाल: प्रथम क्रमांक: भवन्स जी. व्ही. एम., हिंगणघाट द्वितीय क्रमांक: सेंट जॉन कॉन्व्हेंट, हिंगणघाट तृतीय क्रमांक: महेश ज्ञानपीठ विद्यालय, हिंगणघाट समारोपावेळी डॉ. आशिष लांडे यांनी विद्यार्थ्यांनी अशाच उपक्रमांत सातत्याने सहभागी व्हावे, तसेच सन २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार कमी करून निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजाच्या सहभागाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. श्री एन. एस. बरेंडिया यांनी कुष्ठरोगाची लक्षणे, औषधोपचार व प्रतिबंधक उपायांची माहिती दिली. श्री प्रशांत जंगठे (अवैद्यकीय सहाय्यक) यांनी कुष्ठरुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, संदर्भसेवा व संशयित रुग्ण आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात पाठविण्याचे आवाहन केले. प्राचार्या सौ. धरती तामगिरे यांनी अशा जनजागृती कार्यक्रमांना शाळेचे संपूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी सावरकर यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्निल आगाशे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री उमेश मेश्राम (आरोग्य निरीक्षक), असलम फारुकी, श्री डी. एम. मेश्राम (आरोग्य कर्मचारी), भवन्स जी. व्ही. एम. येथील श्री स्वप्निल आगाशे (क्रीडा शिक्षक), श्री सागर बादलवार (संगणक शिक्षक), तसेच सर्व शिक्षक-कर्मचारीवृंद, सेंट जॉन कॉन्व्हेंटचे श्री शेगोकार सर व महेश ज्ञानपीठ विद्यालयाचे श्री बागडे सर यांनी मोलाचे सहकार्य केले.1
- जय श्री श्याम1