logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माजी विद्यार्थी व पालक संघाच्या पुढाकारातून ६५ विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश माजी विद्यार्थी व पालक संघाच्या पुढाकारातून ६५ विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पालक सभेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद शहादा तालुक्यातील सोनवल त बो ता. येथील जि. प. प्राथमिक शाळातील माजी विद्यार्थी व पालक संघाच्या वतीने लोकसहभागातून शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश (टी-शर्ट व पॅन्ट) तसेच विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन गणवेश व आयकार्ड मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अशोक देवरे साहेब होते. यावेळी SMC अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष सखाराम अण्णा भिल, गावचे पोलीस पाटील गोरखदादा मोरे, देणगीदार, पालक, ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. देणगीदार भटू कोळी, उखा कोळी, ग्रामसेविका सुवर्णा कुवर मॅडम, संजय पाटील, प्राध्यापक साळुंखे सर ,मनोहर पाटील, युवराज पंडित, अशोक पाटील, मनोहर पाटील, लक्ष्मण पाटील, कन्हैया पाटील, संजय सखाराम पाटील, तसेच पालक दीपक भिल, समाजसेवक गोपाल कोळी, SMC सदस्या कल्पना पानपाटील, दिपाली पाटील, गायत्री भिल, पुरुषोत्तम पाटील, राकेश पाटील, देविदास पाटील आदींची उपस्थिती होती. गावातील सेवानिवृत्त शिक्षक वसंत वसंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेविषयी असलेला आपुलकीचा व जिव्हाळ्याचा संबंध व्यक्त केला. शाळेची होत असलेली प्रगती आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. जी शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती तिथे शंभर टक्के उपस्थिती व गुणवत्ता आढळून आली त्याबद्दल शाळेतील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख ए. बी देवरे साहेब यांनी शाळेची प्रगती सातत्याने होत असून प्रगतीचा आलेख चढता असल्याचे सांगितले. नवीन बदली होऊन आलेले शिक्षक रुपेशकुमार नागलगावे व जयश्री मॅडम विद्यार्थ्यांविषयी असलेला जिव्हाळा, प्रेम व आपुलकीने कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षी इंग्रजी माध्यमातून जि. प. प्राथमिक शाळा सोनवल येथे दाखल झालेल्या नऊ विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले. पाढे पाठांतरामध्ये नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पॅड व कंपास ही भेट देण्यात आला विद्यार्थी मनोगतात चेतना कोळी हिने नवीन ड्रेस मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून देणगीदारांचे आभार मानले. यज्ञेश पाटील यानेही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समाधान पाटील, अनिल पवार, स्वयंपाकिन ताई सुनिता मिस्त्री, बिंद्राताई मोरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षिका जयश्री उरगुंडे यांनी केले. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाळेने शाल-श्रीफळाऐवजी देणगीदार व पालकांना प्रत्येकी एक वृक्ष भेट देऊन ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविला. पालक व देणगीदारांच्या हस्ते शाळेच्या परिसरात बकुळ, गुलमोहर, वड, लिंबू आदी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह पालकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी पालक सभेचेही आयोजन करण्यात आले. लोकसहभाग, पालकांचे सहकार्य, माजी विद्यार्थ्यांची शाळेविषयीची आस्था आणि शिक्षकांचे प्रयत्न यामुळे जि. प. प्राथमिक शाळा सोनवलच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र कार्यक्रमातून दिसून आले.

9 hrs ago
user_ईश्वर मराठे (पत्रकार)
ईश्वर मराठे (पत्रकार)
Advertising agency तळोदे, नंदुरबार, महाराष्ट्र•
9 hrs ago
371e1e78-8f1d-4204-ae86-d9d77712acbb

माजी विद्यार्थी व पालक संघाच्या पुढाकारातून ६५ विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश माजी विद्यार्थी व पालक संघाच्या पुढाकारातून ६५ विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; पालक सभेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद शहादा तालुक्यातील सोनवल त बो ता. येथील जि. प. प्राथमिक शाळातील माजी विद्यार्थी व पालक संघाच्या वतीने लोकसहभागातून शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश (टी-शर्ट व पॅन्ट) तसेच विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन गणवेश व आयकार्ड मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. अशोक देवरे साहेब होते. यावेळी SMC अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष सखाराम अण्णा भिल, गावचे पोलीस पाटील गोरखदादा मोरे, देणगीदार, पालक, ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक उपस्थित होते. देणगीदार भटू कोळी, उखा कोळी, ग्रामसेविका सुवर्णा कुवर मॅडम, संजय पाटील, प्राध्यापक साळुंखे सर ,मनोहर पाटील, युवराज पंडित, अशोक पाटील, मनोहर पाटील, लक्ष्मण पाटील, कन्हैया पाटील, संजय सखाराम पाटील, तसेच पालक दीपक भिल, समाजसेवक गोपाल कोळी, SMC सदस्या कल्पना पानपाटील, दिपाली पाटील, गायत्री भिल, पुरुषोत्तम पाटील, राकेश पाटील, देविदास पाटील आदींची उपस्थिती होती. गावातील सेवानिवृत्त शिक्षक वसंत वसंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेविषयी असलेला आपुलकीचा व जिव्हाळ्याचा संबंध व्यक्त केला. शाळेची होत असलेली प्रगती आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. जी शाळा बंद होण्याच्या मार्गावर होती तिथे शंभर टक्के उपस्थिती व गुणवत्ता आढळून आली त्याबद्दल शाळेतील शिक्षकांचा

dccf38a4-39a7-46b2-b5a0-67ed61e7732d

गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख ए. बी देवरे साहेब यांनी शाळेची प्रगती सातत्याने होत असून प्रगतीचा आलेख चढता असल्याचे सांगितले. नवीन बदली होऊन आलेले शिक्षक रुपेशकुमार नागलगावे व जयश्री मॅडम विद्यार्थ्यांविषयी असलेला जिव्हाळा, प्रेम व आपुलकीने कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षी इंग्रजी माध्यमातून जि. प. प्राथमिक शाळा सोनवल येथे दाखल झालेल्या नऊ विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले. पाढे पाठांतरामध्ये नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पॅड व कंपास ही भेट देण्यात आला विद्यार्थी मनोगतात चेतना कोळी हिने नवीन ड्रेस मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून देणगीदारांचे आभार मानले. यज्ञेश पाटील यानेही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समाधान पाटील, अनिल पवार, स्वयंपाकिन ताई सुनिता मिस्त्री, बिंद्राताई मोरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षिका जयश्री उरगुंडे यांनी केले. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाळेने शाल-श्रीफळाऐवजी देणगीदार व पालकांना प्रत्येकी एक वृक्ष भेट देऊन ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम राबविला. पालक व देणगीदारांच्या हस्ते शाळेच्या परिसरात बकुळ, गुलमोहर, वड, लिंबू आदी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसह पालकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी पालक सभेचेही आयोजन करण्यात आले. लोकसहभाग, पालकांचे सहकार्य, माजी विद्यार्थ्यांची शाळेविषयीची आस्था आणि शिक्षकांचे प्रयत्न यामुळे जि. प. प्राथमिक शाळा सोनवलच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र कार्यक्रमातून दिसून आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
    1
    नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले

भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी
नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले
भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी
प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल 
बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!
    1
    मज़दूर का हक़ वक्त पर दो, मेहनत की कमाई रोकना इंसाफ नहीं!
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन* जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    1
    आयटीआयबाहेरील कचरा संकलन केंद्र त्वरित हटवा; अभाविपचे उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन*
जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधी आणि डास-माशांचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.
आयटीआय परिसराच्या जवळपास सहा महाविद्यालये असून दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. पावसाळ्यात येथे साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असल्याचेही अभाविपने म्हटले आहे. याबाबत मनपा प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई न झाल्याने उद्या आयटीआयबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!
    1
    कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार नाशिक गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    1
    नाशिकमध्ये दुभाजकातील ५५ झाडांची कत्तल; २.७५ लाखांचे नुकसान......चौघांविरुद्ध गुन्हा; गंगापूर रोडवरील प्रकार

नाशिक 
गंगापूर रोडवरील जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात महानगरपालिकेने सावली व सुशोभीकरणासाठी लावलेल्या विदेशी प्रजातीच्या ५५ झाडांची विनापरवाना कत्तल करून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अभिमन्यू खैरनार व त्याच्या तीन साथीदारांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पहाटे २ ते २.४५ वाजेच्या दरम्यान जेहान सर्कल ते बेंडकुळे नगर रस्त्यावरील दुभाजकात लावलेली टर्मिलिया मादागास्कर (इंडियन क्रिसमस ट्री) प्रजातीची झाडे तोडण्यात आली. संशयितांनी कटकारस्थान करून विनापरवाना ही झाडे कापून नेल्याचा आरोप आहे. या झाडांची अंदाजे किंमत २ लाख ७५ हजार रुपये असून, महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी श्रीकांत किसन इरणक (३२, रा. करंजकर नगर, जेलरोड) यांनी तक्रार दिली. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी रात्री ७.५२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज आप लोगों bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    1
    ब्रेकिंग न्यूज आप लोगों  bhai tu Aashirwad ek Naya Andaaz mein aap logon ka favourite show
देखिये रोज भाई तू जा आशीर्वाद 10:00 बजे स्टार प्रवाह खूब मस्ती
    user_Harish Kumar Gautam
    Harish Kumar Gautam
    Voice of people नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले!
माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले!
अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष
सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जामनेर पहुर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून अपघात जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहार घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटून अपघात झाला असून या अपघातात टेम्पोतील दोन हमालांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील अशी मृतांची नावे असून शालेय पोषण आहाराच्या पोत्यांवर मागच्या बाजूला बसलेले असताना अपघातानंतर अचानक बाहेर फेकले जाऊन ह्या दोन हमालांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
    1
    जामनेर पहुर मार्गावर शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून अपघात 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर मार्गावर शालेय पोषण आहार घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो उलटून अपघात झाला असून या अपघातात टेम्पोतील दोन हमालांचा जागीच मृत्यू झाला. जगदीश पाटील आणि अर्जुन पाटील अशी मृतांची नावे असून शालेय पोषण आहाराच्या पोत्यांवर मागच्या बाजूला बसलेले असताना अपघातानंतर अचानक बाहेर फेकले जाऊन ह्या दोन हमालांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
    user_Kalpesh wani
    Kalpesh wani
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन! नगरसेवकांचा धारणकरांवर हल्लाबोल; कारवाईची मागणी “काम करा, अन्यथा घरी बसवण्याचा आयुक्तांचा स्मार्ट सिटीच्या सीईओंना इशारा वॉल मन च्या विभागनीय बदल्या करण्याचे महापौरांचे आदेश
    4
    पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन! नगरसेवकांचा धारणकरांवर हल्लाबोल; कारवाईची मागणी
“काम करा, अन्यथा घरी बसवण्याचा आयुक्तांचा स्मार्ट सिटीच्या सीईओंना इशारा वॉल मन च्या विभागनीय बदल्या करण्याचे महापौरांचे आदेश
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.