वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा इशारा यामुळे उष्ण घाट टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन सूचना जारी जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा इशारा उष्माघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी वाशिम, जिल्ह्यात मागील २ ते ३ दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती भारतीय मौसम विज्ञान केंद्र, नागपूर यांनी दिली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ‘काय करावे व काय करू नये’ याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी खालील उपायांचे काटेकोर पालन करावे: दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक असून तहान नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. बाहेर जाताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा पांढरा शेला/दुपट्टा वापरावा. घरात सूर्यप्रकाश येऊ नये यासाठी पडदे व झडपा लावाव्यात. हलक्या, पातळ व सच्छिद्र सूती कपड्यांचा, विशेषतः पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. प्रवास करताना व कामाच्या ठिकाणी पुरेसे थंड पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी यांसारख्या घरगुती पेयांचे सेवन करावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा व रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. गरजेनुसार कुलर, पंखे किंवा वातानुकूलन (एसी) यांचा वापर करावा. कामगारांना थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी योग्य सूचना द्याव्यात. गरोदर महिला, आजारी व्यक्ती, वयोवृद्ध आणि लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी. उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कापडाने झाकावे. शक्यतो दुपारच्या वेळेत श्रमाची कामे टाळावीत. चक्कर आल्यास किंवा अस्वस्थ वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. जनावरांनाही सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे. ‘हे करू नये’ दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात जाणे टाळावे. गडद, जाड किंवा घट्ट कपडे घालू नयेत. तापमान जास्त असताना शारीरिक श्रमाची कामे करू नयेत. उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. उष्माघात झाल्यास काय करावे? उष्णतेच्या लाटेमुळे आजारी पडलेल्या व्यक्तीची तातडीने काळजी घेणे आवश्यक आहे. मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेये देऊ नयेत. बाधित व्यक्तीचे शरीर थंड करण्यासाठी ओल्या कापडाने पुसावे. रुग्णाला ओआरएस, ताक, लस्सी किंवा लिंबूपाणी द्यावे. तसेच बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. उष्माघात गंभीर व जीवघेणा ठरू शकतो. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर वाशिम यांनी केले आहे.

- Post by नंदकिशोर साखरकर1
- महात्मा बसेश्वर महाराजांची जयंती मंठा येथील उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यासाठी.1
- लिलाव प्रक्रियेदरम्यान गोदामात तारण मालच नसल्याचे उघड झाले. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आर्थिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याला श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीस 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.1
- Post by M B B1
- Skyline Builders & Developers “क्षितिज पुरम – जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो स्वतःचा पत्ता ” क्षितिज पुरम… जिथे आकाशातील स्वप्नं… जमिनीवर उतरतात!2
- Post by Ashish ingle1
- * बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे गेल्या ३७० वर्षांपासून सुरू असलेली एक अनोखी परंपरा पार पडली. 'भेंडवळची घटमांडणी'—ज्याला विदर्भासह मराठवाडा आणि खान्देशातील शेतकरी एक विश्वासार्ह दिशादर्शक मानतात. यंदाच्या २०२६ च्या घटमांडणीतून समोर आलेले निष्कर्ष शेती, अर्थव्यवस्था आणि राजकीय स्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत.यंदा पावसाच्या बाबतीत दिलासादायक बातमी अशी की, पाऊस चांगला होईल. विशेषतः जून महिन्यात पावसाचा जोर अधिक असेल. मात्र, हाच पाऊस अतिवृष्टीचे संकट घेऊन येणार आहे, ज्यामुळे नद्यांना महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा वेग मंदावेल. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरीचे उत्पादन समाधानकारक राहील. मात्र, ज्वारी, तूर आणि कडधान्यांची स्थिती मध्यम राहील. सर्वात चिंतेची बाब म्हणजे यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण अधिक असेल, त्यामुळे शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.भेंडवळच्या भाकितानुसार, २०२६ मध्ये देशात सत्ता स्थिर राहील, म्हणजेच 'राजा कायम' असेल. मात्र, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रमुखांवर प्रचंड मानसिक तणाव असेल, असे संकेत आहेत. देशाची आर्थिक स्थिती यंदा फारशी सुखावह नाही; तिजोरीवर ताण वाढणार असून आर्थिक मंदीचे सावट जाणवू शकते.सुरक्षेच्या दृष्टीने यंदाचा काळ आव्हानात्मक असल्याचे दिसते. देशाच्या सीमांवर तणावपूर्ण परिस्थिती उद्भवू शकते आणि संरक्षण यंत्रणेवरही ताण पडू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता असून, पृथ्वीवर नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेत वाढ होण्याची भीतीही घटमांडणीतून व्यक्त करण्यात आली आहे.चंद्रभान महाराज वाघ यांच्या वंशजांनी, म्हणजेच पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी ही घटमांडणी केली आहे. हे भाकीत केवळ एक परंपरा नसून हजारो शेतकऱ्यांच्या नियोजनाचा आधार आहे. नैसर्गिक संकटांचा इशारा असला तरी, योग्य नियोजनाने या संकटांचा सामना करणे शक्य आहे, हाच या घटमांडणीचा मूळ संदेश आहे. संकलन: भेंडवळ घटमांडणी, अक्षय्य तृतीया २०२६.1
- दरेगाव येथील वन विभागाच्या शिवारात असलेल्या जंगल परिसरात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यक्ती संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, या घटनेमुळे तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील कारणांचा तपास तालुका पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.1