सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात प्रचंड घसरण. शेतकरी आर्थिक संकटात सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून कांद्याची आवक सुरू झाली डिसेंबर महिन्यात कांद्याला दोन हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला . यंदा जानेवारी महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली सध्या कांद्याला प्रति क्विंटल पाचशे ते तेराशे रुपये भाव मिळत आहे. कांदा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे मशागत औषधे मजूरी आदी हजारो रुपयांचे खर्च येतो सध्या बाजारात भाव अत्यंत कमी झाल्याने लागवडीचे खर्चही निघत नाही यामुळे बळीराजा हतबल झाला आहे सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये पुणे फुरसुंगी येथील कांद्याची आवक होत असून या कांद्याला बाराशे ते पंधराशे दर मिळतो हा कांदा टिकावू व दर्जेदार असल्याने चेन्नई बंगळुरू हैदराबाद सिकंदराबाद येथील व्यापारी हा कांदा खरेदी करीत आहेत पण सोलापूर जिल्ह्यातील कांद्याला मागणी कमी असल्याने दर कमी झाले आहेत गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले निदान कांद्याला तरी चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली पण सध्या कांदा कवडीमोल भावाने विकला जात आहे. तसेच बांगलादेश होणारा कांदा निर्यात सध्या बंद आहे याचाही फटका बसला आहे गेल्या वर्षी झालेल्या संततधार पावसामुळे जमीन खरडून गेली भाजीपाल्याला दर नाही कांद्याने रडवले उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्या पिकांची लागवड करायचे या विवंचनेत शेतकरी आहे सोलापूर बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची तीनशे गाड्यांची आवक झाली पण बाजारात मंदीचे वातावरण असल्याने खरेदीदार कांदा खरेदी करताना दिसत नाहीत भाव कोसळल्याने लागवड खर्च बाजूला राहीले गोणीचे खर्चही निघेना झाले आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . चौकट. सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला मागणी नसल्याने दरात घसरण झाली आहे तसेच महाराष्ट्र व कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा आदी राज्यांतून आलेले व्यापारीही खरेदीसाठी उत्साह दाखवत नाहीत . गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोन हजार ते अडीच हजार रुपयांमध्ये विकला जात होता पण फेब्रुवारी महिन्यात दरात घसरण झाली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे येत्या काळात कांद्याच्या दरात वाढ होईल अशी आशा आहे. हणमंत बणजगोळे अडत व्यापारी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.

- लातूरच्या विवेकानंद चौकातील अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून दारुड्याचा धिंगाणा; पोलिसांनी समजूत काढून उतरवले खाली. गुरुवार दि. 02 एप्रिल 2026. लातूर शहरातील विवेकानंद चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या टाकीचे गुत्तेदाराने बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुत्तेदाराने काम अपूर्ण ठेवून माघार घेतल्याने ही टाकी सध्या उघडी पडली असून, त्या ठिकाणी कोणतेही संरक्षणात्मक कंपाउंड नसल्यामुळे कोणीही सहजपणे टाकीवर चढू शकत आहे. पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम महानगरपालिकेने एका गुत्तेदाराला दिले होते. मात्र, काम अर्धवट सोडल्याने ही टाकी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तरुण मंडळी तसेच इतर नागरिक विनाकारण वर-खाली करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आज एका अज्ञात तरुणाने दारूच्या नशेत या अर्धवट टाकीवर चढून गोंधळ घातला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दारुड्या इसमाची समजूत काढून संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले. या घटनेमुळे अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा समोर आला असून, महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच अपूर्ण काम पूर्ण करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.1
- मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न1
- सुषमा अंधारे यांनी खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.1
- Post by Balaji Vedpathak1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- केंद्र सरकारच्या गॅस दरवाढ विरोधात एप्रिल फुलचे औचित्य साधून मुखेड काँग्रेस कडून 'कहा गये अच्छे दिन' म्हणत व नालीतून गॅस काढून चहा करत फेकू दिन साजरा करण्यात आला. केंद्राच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आज सुमारे दोनशे रुपयाची व्यावसायिक गॅस दरवाढ जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर आणि शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांच्या उपस्थितीत एप्रिल फुल चे औचित्य साधून मुखेड तहसिल कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावरील नाल्यावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.यावेळी मोदींनी म्हटल्याप्रमाणे नालीतून गॅस काढून प्रतिकात्मक चहा करण्यात आला.तर नागरिकांना आवाहन करून चहा वाटप करण्यात आले.यावेळी चालू असलेल्या इराण इस्त्राईल आणि अमेरिका यांच्या युद्धाबद्दल पागल मित्र ट्रम्प यांना मोदींनी युद्ध थांबवण्यास सांगावे असे सांगत बॅनर लावण्यात आले.बॅनर वर सांगा आपल्या पागल मित्राला (ट्रम्पला ) 'युद्ध नको बुद्ध हवा,अस्त्र क्रांती नको,विश्वशांती हवी' असा मथळा काँग्रेसकडून ठळक लिहिण्यात आला होता.या आंदोलनातून नालीच्या गॅसवर चहा करणे हे मोदींचे किती मूर्खपणाचे विधान होते हे काँग्रेसने दाखवले आहे. यावेळी जगातील युद्ध आणि देशातील महागाई या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.युद्धामुळे भारतात महागाई वाढवून जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.युद्ध पेटवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदीचे मित्र असून त्यांनी आपल्या मित्र असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध थांबवावे असा सल्ला द्यावा असा सल्ला यावेळी तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर यांनी दिला.या आंदोलनात डॉ.श्रावण रॅपनवाड,संभाजी पाटील,हणमंत नारनाळीकर सह युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुनील आरगिळे,भाई असद बल्की,ओबीसी विभाग शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, शिवाजी चैनपुरे,राजुभाऊ बनसोडे,हाफिज पठाण,एम.आर.गोपनर,बालाजी वाडेकर,शिवाजी कांबळे,शिवाजी गायकवाड,वाहनचालक ईमामभाई, सुर्यकांत पांचाळ सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.प्रतिकात्मक आंदोलनास नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आंदोलन कर्त्यांचा चहा पिऊन गॅसदरवाढीचा तिव्र निषेध केला.1
- कर वसुलीत महापालिकेची धडाकेबाज कामगिरी एका दिवसात ४ कोटींचा रेकॉर्ड; लातूर महापालिकेची ७५ कोटींची ऐतिहासिक झेप...! व्यापाऱ्यांनी कर भरूना, सहकार्याचे आवाहन. शूरू ॲप, मराठी न्यूज. बुधवार दि. 01 एप्रिल 2026. लातूर महानगरपालिकेकडून एका दिवसात तब्बल ४ कोटी रुपयांचा कर संकलन करण्यात आला असून, एकूण वसुलीचा आकडा ७५ कोटींहून अधिक पार करण्यात यश आले आहे. या यशामागे महापालिकेचे कर्मचारी आणि सर्व संबंधितांनी घेतलेली अथक मेहनत कारणीभूत ठरली असल्याचे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनाने ठेवलेले कर वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असून, आगामी काळातही कर वसुलीची मोहीम अधिक गतीने सुरू ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शहरातील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि अनावश्यक कारवाई टाळावी, असे आवाहनही उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले.1