logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गोमाता च्या सन्मानासाठी हजारो गौभक्त उतरले रस्त्यावर ! रावेर येथे गो माता सन्मान आव्हान अभियान अंतर्गत रावेर शहरात हजारोच्या संख्येने गहू भक्तांनी पदयात्रा काढत हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले ! गो हत्या बंद करा तसेच गो मातेला सन्मान मिळावा या मागणीसाठी साधुसंत महंत व तालुका भरातील गहूभक्त या अभियानात सहभागी

22 hrs ago
user_Ravi Mahajan
Ravi Mahajan
रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
22 hrs ago

गोमाता च्या सन्मानासाठी हजारो गौभक्त उतरले रस्त्यावर ! रावेर येथे गो माता सन्मान आव्हान अभियान अंतर्गत रावेर शहरात हजारोच्या संख्येने गहू भक्तांनी पदयात्रा काढत हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले ! गो हत्या बंद करा तसेच गो मातेला सन्मान मिळावा या मागणीसाठी साधुसंत महंत व तालुका भरातील गहूभक्त या अभियानात सहभागी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *बुलढाण्यात आज राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापलेले पाहायला मिळाले. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी बुलढाण्यात पोहोचण्यापूर्वीच चिखलीत रोखले आहे. दुसरीकडे, बुलढाणा शहरात आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत ताब्यात घेतले असून, आंदोलन दडपल्याचा आरोप आता केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली. निमित्त होते 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशन आणि आमदार संजय गायकवाड यांनी दिलेला इशारा. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी ही संपूर्ण आंदोलनाची मोहीम चिरडून टाकली आहे.पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे बुलढाण्याच्या दिशेने येत असताना, चिखली पोलिसांनी त्यांना वाटेतच गाठले. सध्या आंबी यांना चिखलीतील 'हॉटेल अमृततुल्य'मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले असून, त्यांच्याभोवती पोलिसांचा मोठा गराडा तैनात आहे.दुसरीकडे, बुलढाणा शहरात परिस्थिती अधिकच स्फोटक झाली होती. प्रशांत आंबी यांच्या स्वागतासाठी आणि समर्थनासाठी जमलेले आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी आंदोलकांनी **'संजय गायकवाड मुर्दाबाद'**च्या जोरदार घोषणा दिल्या. "जोपर्यंत आंबी बुलढाण्यात येत नाहीत, तोपर्यंत जागा सोडणार नाही," असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मात्र, वातावरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून फरफटत उचलले आणि व्हॅनमध्ये भरून ताब्यात घेतले.या वादाची पार्श्वभूमी आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाशी जोडली जात आहे. "एकेरी उल्लेख केला तर कानाखाली वाजवू, आम्ही शिवभक्तांना रोखू शकणार नाही," असा इशारा गायकवाडांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता, परिणामी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
    1
    *बुलढाण्यात आज राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापलेले पाहायला मिळाले. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी बुलढाण्यात पोहोचण्यापूर्वीच चिखलीत रोखले आहे. दुसरीकडे, बुलढाणा शहरात आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत ताब्यात घेतले असून, आंदोलन दडपल्याचा आरोप आता केला जात आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली. निमित्त होते 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशन आणि आमदार संजय गायकवाड यांनी दिलेला इशारा. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी ही संपूर्ण आंदोलनाची मोहीम चिरडून टाकली आहे.पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे बुलढाण्याच्या दिशेने येत असताना, चिखली पोलिसांनी त्यांना वाटेतच गाठले. सध्या आंबी यांना चिखलीतील 'हॉटेल अमृततुल्य'मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले असून, त्यांच्याभोवती पोलिसांचा मोठा गराडा तैनात आहे.दुसरीकडे, बुलढाणा शहरात परिस्थिती अधिकच स्फोटक झाली होती. प्रशांत आंबी यांच्या स्वागतासाठी आणि समर्थनासाठी जमलेले आंदोलक आक्रमक झाले होते. यावेळी आंदोलकांनी **'संजय गायकवाड मुर्दाबाद'**च्या जोरदार घोषणा दिल्या. "जोपर्यंत आंबी बुलढाण्यात येत नाहीत, तोपर्यंत जागा सोडणार नाही," असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.
मात्र, वातावरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून फरफटत उचलले आणि व्हॅनमध्ये भरून ताब्यात घेतले.या वादाची पार्श्वभूमी आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाशी जोडली जात आहे. "एकेरी उल्लेख केला तर कानाखाली वाजवू, आम्ही शिवभक्तांना रोखू शकणार नाही," असा इशारा गायकवाडांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता, परिणामी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • गावात जागा असूनही कोंडवाड्यावरच डोळा का? वरवंडच्या 'बळीराजा'चा प्रशासकीय अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा.
    1
    गावात जागा असूनही कोंडवाड्यावरच डोळा का? वरवंडच्या 'बळीराजा'चा प्रशासकीय अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ​खामगाव : लग्नामध्ये नाचण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तिन्ही फरार आरोपींना शिवाजी नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना वरवट बकाल परिसरातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. २६ एप्रिल २०२६ रोजी मोहम्मद साबीर शेख मुसा (वय ३६, रा. बर्डेप्लॉट, खामगाव) यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांचा भाचा शोएब खान अमीन खान (वय २२) याला दिनांक २५ एप्रिल रोजी लग्नात नाचण्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालून दगडाने डोक्यावर व शरीरावर गंभीर मारहाण केली होती. या हल्ल्यात शोएब खानचा मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १०३(१), ११८(२), ११५(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा (अप क्र. १५८/२०२६) दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाची विविध पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे वरवट बकाल परिसरात असून तेथून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी वेगाने हालचाली करत ​ मुजम्मील खान जमील खान (वय २२, रा. बर्डेप्लॉट), शेख तालीब शेख रहेमान (वय २२, रा. बर्डेप्लॉट),फैजान खान बुढन खान (वय २५, रा. बर्डेप्लॉट) तिघांना ताब्यात घेतले. ​पोलिसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना २६ एप्रिल रोजी रीतसर अटक करण्यात आली आहे. सदरची यशस्वी कारवाई बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर, सपोनी मंदार पुरी, पोहेकॉ संदिप टाकसाळ, निलसींग चव्हाण, देवेंद्र शेळके, विजय उभे, राजू कोल्हे, नितीन भालेराव, प्रविण गायकवाड, केशव झाल्टे, पल्लवी बोर्डे, योगेश सोनटक्के, तसेच सायबर सेलचे कैलास ठोंबरे व राजू आढवे यांनी केली आहे. ​पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत.
    1
    ​खामगाव : लग्नामध्ये नाचण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तिन्ही फरार आरोपींना शिवाजी नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना वरवट बकाल परिसरातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.  २६ एप्रिल २०२६ रोजी मोहम्मद साबीर शेख मुसा (वय ३६, रा. बर्डेप्लॉट, खामगाव) यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांचा भाचा शोएब खान अमीन खान (वय २२) याला दिनांक २५ एप्रिल रोजी लग्नात नाचण्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालून दगडाने डोक्यावर व शरीरावर गंभीर मारहाण केली होती. या हल्ल्यात शोएब खानचा मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १०३(१), ११८(२), ११५(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा (अप क्र. १५८/२०२६) दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाची विविध पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे वरवट बकाल परिसरात असून तेथून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी वेगाने हालचाली करत ​ मुजम्मील खान जमील खान (वय २२, रा. बर्डेप्लॉट), शेख तालीब शेख रहेमान (वय २२, रा. बर्डेप्लॉट),फैजान खान बुढन खान (वय २५, रा. बर्डेप्लॉट) तिघांना ताब्यात घेतले. ​पोलिसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना २६ एप्रिल रोजी रीतसर अटक करण्यात आली आहे. सदरची यशस्वी कारवाई बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर, सपोनी मंदार पुरी, पोहेकॉ संदिप टाकसाळ, निलसींग चव्हाण, देवेंद्र शेळके, विजय उभे, राजू कोल्हे, नितीन भालेराव, प्रविण गायकवाड, केशव झाल्टे, पल्लवी बोर्डे, योगेश सोनटक्के, तसेच सायबर सेलचे कैलास ठोंबरे व राजू आढवे यांनी केली आहे. ​पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • धक्कादायक CCTV LIVE! नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट अपघात; महिला कर्मचाऱ्याची मान अडकून गंभीर जखमी बातमी (Seeza News स्टाईल): नाशिक शहरातील आडगाव परिसरातील एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. रुग्णालयातील लिफ्टशी संबंधित अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये महिला कर्मचाऱ्याची मान लिफ्टमध्ये अडकताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात घडली. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सुमारे 50 वर्षीय महिलेने लिफ्टमध्ये वस्तू ठेवत असताना अचानक लिफ्ट खाली आली आणि तिची मान त्यात अडकली. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. महिलेच्या मुलाने घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, काही अहवालांनुसार ही प्रवासी लिफ्ट नसून उपकरणे नेण्यासाठी वापरली जाणारी लिफ्ट (डम्बवेटर/हॉईस्ट) असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
    1
    धक्कादायक CCTV LIVE! नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट अपघात; महिला कर्मचाऱ्याची मान अडकून गंभीर जखमी
बातमी (Seeza News स्टाईल):
नाशिक शहरातील आडगाव परिसरातील एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. रुग्णालयातील लिफ्टशी संबंधित अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये महिला कर्मचाऱ्याची मान लिफ्टमध्ये अडकताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात घडली. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सुमारे 50 वर्षीय महिलेने लिफ्टमध्ये वस्तू ठेवत असताना अचानक लिफ्ट खाली आली आणि तिची मान त्यात अडकली. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. महिलेच्या मुलाने घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
दरम्यान, काही अहवालांनुसार ही प्रवासी लिफ्ट नसून उपकरणे नेण्यासाठी वापरली जाणारी लिफ्ट (डम्बवेटर/हॉईस्ट) असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अकोला: भीषण उन्हाळ्यामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेले वन्यजीव आता मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशीच एक घटना आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मोरगाव भाकरे येथे घडली. येथील अविनाश भाकरे यांच्या शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत एक हरण पडले होते. मात्र, वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि रेस्क्यू टीमच्या धाडसामुळे या हरणाला जीवदान मिळाले आहे. अविनाश भाकरे यांना त्यांच्या शेतातील खोल विहिरीत हरण पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने अकोला वनविभागाचे वनपाल गजानन गायकवाड यांना या घटनेची माहिती दिली. विहीर अत्यंत खोल आणि अडगळीची असल्याने हरणाचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तात्काळ रेस्क्यू टीमला पाचारण केले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, प्रवीण पवार आणि प्रदीप खडे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. विहीर खोल असल्याने वनविभागाच्या शिडीचा वापर करण्यात आला. वैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार यांनी जीवाची पर्वा न करता शिडीने ८० फूट खाली उतरले. खाली उतरल्यानंतर त्यांनी हरणाला सुरक्षितपणे बांधले आणि टीमच्या मदतीने वर काढले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर हरणाला पाणी पाजण्यात आले. विशेष म्हणजे, इतक्या उंचावरून पडूनही हरणाला कोणतीही गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर झाले नव्हते. प्राथमिक तपासणीनंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या मोहिमेनंतर बोलताना मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सांगितले की, "सध्या पाणी टंचाईमुळे वन्यजीव गावांकडे आणि विहिरींकडे वळत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकरी वर्गाने विहिरीपासून काही अंतरावर पाणी साठवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून वन्यजीव पाणी पिऊन पुन्हा जंगलाकडे परत जातील." या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पवन भाकरे आणि अमोल भाकरे यांनी मोलाची मदत केली. वनविभागाच्या या तत्परतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
    1
    अकोला:
भीषण उन्हाळ्यामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेले वन्यजीव आता मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशीच एक घटना आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मोरगाव भाकरे येथे घडली. येथील अविनाश भाकरे यांच्या शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत एक हरण पडले होते. मात्र, वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि रेस्क्यू टीमच्या धाडसामुळे या हरणाला जीवदान मिळाले आहे.
अविनाश भाकरे यांना त्यांच्या शेतातील खोल विहिरीत हरण पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने अकोला वनविभागाचे वनपाल गजानन गायकवाड यांना या घटनेची माहिती दिली. विहीर अत्यंत खोल आणि अडगळीची असल्याने हरणाचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तात्काळ रेस्क्यू टीमला पाचारण केले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, प्रवीण पवार आणि प्रदीप खडे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले.
विहीर खोल असल्याने वनविभागाच्या शिडीचा वापर करण्यात आला.
वैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार यांनी जीवाची पर्वा न करता शिडीने ८० फूट खाली उतरले.
खाली उतरल्यानंतर त्यांनी हरणाला सुरक्षितपणे बांधले आणि टीमच्या मदतीने वर काढले.
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर हरणाला पाणी पाजण्यात आले. विशेष म्हणजे, इतक्या उंचावरून पडूनही हरणाला कोणतीही गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर झाले नव्हते. प्राथमिक तपासणीनंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
या मोहिमेनंतर बोलताना मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सांगितले की, "सध्या पाणी टंचाईमुळे वन्यजीव गावांकडे आणि विहिरींकडे वळत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकरी वर्गाने विहिरीपासून काही अंतरावर पाणी साठवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून वन्यजीव पाणी पिऊन पुन्हा जंगलाकडे परत जातील."
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पवन भाकरे आणि अमोल भाकरे यांनी मोलाची मदत केली. वनविभागाच्या या तत्परतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer बाळापूर, अकोला, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • संजय गायकवाडांना जिजाऊंच्या संस्कारांची गरज; आरती आंबी यांचा घणाघात
    1
    संजय गायकवाडांना जिजाऊंच्या संस्कारांची गरज; आरती आंबी यांचा घणाघात
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • .बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन सुरु, पानसरे यांच्या कार्यकर्ते आक्रम!!
    1
    .बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन सुरु, पानसरे यांच्या कार्यकर्ते आक्रम!!
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • सिल्लोड शहरातील भराडी पेट्रोल पंप येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे सदरील घटनेत प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी चोरीच्या घटनेची नोंद घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे
    1
    सिल्लोड शहरातील भराडी पेट्रोल पंप येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे सदरील घटनेत प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी चोरीच्या घटनेची नोंद घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.