logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लग्नातील वादातून झालेल्या हत्येतील तिन्ही आरोपींना फिल्मी स्टाईलने अटक; शिवाजी नगर पोलिसांची मोठी कारवाई ​खामगाव : लग्नामध्ये नाचण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तिन्ही फरार आरोपींना शिवाजी नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना वरवट बकाल परिसरातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. २६ एप्रिल २०२६ रोजी मोहम्मद साबीर शेख मुसा (वय ३६, रा. बर्डेप्लॉट, खामगाव) यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांचा भाचा शोएब खान अमीन खान (वय २२) याला दिनांक २५ एप्रिल रोजी लग्नात नाचण्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालून दगडाने डोक्यावर व शरीरावर गंभीर मारहाण केली होती. या हल्ल्यात शोएब खानचा मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १०३(१), ११८(२), ११५(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा (अप क्र. १५८/२०२६) दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाची विविध पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे वरवट बकाल परिसरात असून तेथून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी वेगाने हालचाली करत ​ मुजम्मील खान जमील खान (वय २२, रा. बर्डेप्लॉट), शेख तालीब शेख रहेमान (वय २२, रा. बर्डेप्लॉट),फैजान खान बुढन खान (वय २५, रा. बर्डेप्लॉट) तिघांना ताब्यात घेतले. ​पोलिसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना २६ एप्रिल रोजी रीतसर अटक करण्यात आली आहे. सदरची यशस्वी कारवाई बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर, सपोनी मंदार पुरी, पोहेकॉ संदिप टाकसाळ, निलसींग चव्हाण, देवेंद्र शेळके, विजय उभे, राजू कोल्हे, नितीन भालेराव, प्रविण गायकवाड, केशव झाल्टे, पल्लवी बोर्डे, योगेश सोनटक्के, तसेच सायबर सेलचे कैलास ठोंबरे व राजू आढवे यांनी केली आहे. ​पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत.

21 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गावात जागा असूनही कोंडवाड्यावरच डोळा का? वरवंडच्या 'बळीराजा'चा प्रशासकीय अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा.
    1
    गावात जागा असूनही कोंडवाड्यावरच डोळा का? वरवंडच्या 'बळीराजा'चा प्रशासकीय अन्यायाविरुद्ध आत्मदहनाचा इशारा.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • संजय गायकवाडांना जिजाऊंच्या संस्कारांची गरज; आरती आंबी यांचा घणाघात
    1
    संजय गायकवाडांना जिजाऊंच्या संस्कारांची गरज; आरती आंबी यांचा घणाघात
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • .बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन सुरु, पानसरे यांच्या कार्यकर्ते आक्रम!!
    1
    .बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन सुरु, पानसरे यांच्या कार्यकर्ते आक्रम!!
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • रावेर येथे गो माता सन्मान आव्हान अभियान अंतर्गत रावेर शहरात हजारोच्या संख्येने गहू भक्तांनी पदयात्रा काढत हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले ! गो हत्या बंद करा तसेच गो मातेला सन्मान मिळावा या मागणीसाठी साधुसंत महंत व तालुका भरातील गहूभक्त या अभियानात सहभागी
    1
    रावेर येथे गो माता सन्मान  आव्हान अभियान अंतर्गत रावेर शहरात हजारोच्या संख्येने गहू भक्तांनी पदयात्रा काढत हजारो स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले ! 
गो हत्या बंद करा तसेच गो मातेला सन्मान  मिळावा या मागणीसाठी साधुसंत महंत व तालुका भरातील गहूभक्त या अभियानात सहभागी
    user_Ravi Mahajan
    Ravi Mahajan
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • *महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले*
    1
    *महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले*
    user_विदर्भ शासन न्यूज..
    विदर्भ शासन न्यूज..
    दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Mushraf Tadvi
    1
    Post by Mushraf Tadvi
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • गोविंद पानसरे यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अनेक ठिकाणी एकेरी केल्यामुळे गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.जर आयोजक पुस्तक वाचायला आले, तर आम्ही तिथे जाऊन ते शांतपणे ऐकू. महाराजांचा सन्मान राखला तर स्वागत करू, पण अपमान झाला तर शिवभक्त गप्प बसणार नाहीतपुस्तकात औरंगजेबाला 'बादशहाजी' म्हणून मान दिला जातो, पण आमच्या राजांचा उल्लेख एकेरी केला जातो, हे खपवून घेणार नाही असे ते म्हणाले.संबंधित पुस्तकावर तातडीने बंदी घालावी. भावना भडकवल्याबद्दल लेखकावर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. संस्थांना नाव देताना 'छत्रपती शिवाजी महाराज' असेच पूर्ण नाव वापरणे बंधनकारक करावे. रोहित पवार हे केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकीय फायद्यासाठी या विषयात पडत आहेत, अशी टीका त्यांनी केली. स्वतःची भूमिका: शिवरायांचा अपमान सहन न झाल्यामुळे रागाच्या भरात काही शब्द निघाले, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. असे आमदार म्हणाले
    1
    गोविंद पानसरे यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अनेक ठिकाणी एकेरी केल्यामुळे गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.जर आयोजक पुस्तक वाचायला आले, तर आम्ही तिथे जाऊन ते शांतपणे ऐकू. महाराजांचा सन्मान राखला तर स्वागत करू, पण अपमान झाला तर शिवभक्त गप्प बसणार नाहीतपुस्तकात औरंगजेबाला 'बादशहाजी' म्हणून मान दिला जातो, पण आमच्या राजांचा उल्लेख एकेरी केला जातो, हे खपवून घेणार नाही असे ते म्हणाले.संबंधित पुस्तकावर तातडीने बंदी घालावी.
भावना भडकवल्याबद्दल लेखकावर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
संस्थांना नाव देताना 'छत्रपती शिवाजी महाराज' असेच पूर्ण नाव वापरणे बंधनकारक करावे.
रोहित पवार हे केवळ प्रसिद्धीसाठी आणि राजकीय फायद्यासाठी या विषयात पडत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
स्वतःची भूमिका: शिवरायांचा अपमान सहन न झाल्यामुळे रागाच्या भरात काही शब्द निघाले, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. असे आमदार म्हणाले
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • धक्कादायक CCTV LIVE! नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट अपघात; महिला कर्मचाऱ्याची मान अडकून गंभीर जखमी बातमी (Seeza News स्टाईल): नाशिक शहरातील आडगाव परिसरातील एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. रुग्णालयातील लिफ्टशी संबंधित अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये महिला कर्मचाऱ्याची मान लिफ्टमध्ये अडकताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात घडली. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सुमारे 50 वर्षीय महिलेने लिफ्टमध्ये वस्तू ठेवत असताना अचानक लिफ्ट खाली आली आणि तिची मान त्यात अडकली. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. महिलेच्या मुलाने घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, काही अहवालांनुसार ही प्रवासी लिफ्ट नसून उपकरणे नेण्यासाठी वापरली जाणारी लिफ्ट (डम्बवेटर/हॉईस्ट) असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
    1
    धक्कादायक CCTV LIVE! नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट अपघात; महिला कर्मचाऱ्याची मान अडकून गंभीर जखमी
बातमी (Seeza News स्टाईल):
नाशिक शहरातील आडगाव परिसरातील एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. रुग्णालयातील लिफ्टशी संबंधित अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये महिला कर्मचाऱ्याची मान लिफ्टमध्ये अडकताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात घडली. सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सुमारे 50 वर्षीय महिलेने लिफ्टमध्ये वस्तू ठेवत असताना अचानक लिफ्ट खाली आली आणि तिची मान त्यात अडकली. या भीषण अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. महिलेच्या मुलाने घटनास्थळी धाव घेत आक्रोश केला, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
दरम्यान, काही अहवालांनुसार ही प्रवासी लिफ्ट नसून उपकरणे नेण्यासाठी वापरली जाणारी लिफ्ट (डम्बवेटर/हॉईस्ट) असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 
या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.