Shuru
Apke Nagar Ki App…
vah Modi hai bhaiya Tu Nahin Ja Sakta
Sharad Dayedar
vah Modi hai bhaiya Tu Nahin Ja Sakta
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sharad Dayedar1
- fhdudunxjx jdjdmjcjd1
- Post by Amravati News Update1
- आमदार रवी राणा यांना नवनीत राणा यांनी दिल्या शुभेच्छा #navneetrana #ravirana #Amravati1
- *महाराष्ट्रातील सर्व शाळांप्रमाणेच दारापूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत अभियान उत्साहात राबविण्यात आले*1
- अकोला: भीषण उन्हाळ्यामुळे पाण्यासाठी व्याकुळ झालेले वन्यजीव आता मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशीच एक घटना आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मोरगाव भाकरे येथे घडली. येथील अविनाश भाकरे यांच्या शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत एक हरण पडले होते. मात्र, वनविभागाच्या सतर्कतेमुळे आणि रेस्क्यू टीमच्या धाडसामुळे या हरणाला जीवदान मिळाले आहे. अविनाश भाकरे यांना त्यांच्या शेतातील खोल विहिरीत हरण पडल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने अकोला वनविभागाचे वनपाल गजानन गायकवाड यांना या घटनेची माहिती दिली. विहीर अत्यंत खोल आणि अडगळीची असल्याने हरणाचे प्राण वाचवणे हे मोठे आव्हान होते. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाने तात्काळ रेस्क्यू टीमला पाचारण केले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, तुषार आवारे, प्रवीण पवार आणि प्रदीप खडे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. विहीर खोल असल्याने वनविभागाच्या शिडीचा वापर करण्यात आला. वैद्यकीय सहाय्यक प्रवीण पवार यांनी जीवाची पर्वा न करता शिडीने ८० फूट खाली उतरले. खाली उतरल्यानंतर त्यांनी हरणाला सुरक्षितपणे बांधले आणि टीमच्या मदतीने वर काढले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर हरणाला पाणी पाजण्यात आले. विशेष म्हणजे, इतक्या उंचावरून पडूनही हरणाला कोणतीही गंभीर दुखापत किंवा फ्रॅक्चर झाले नव्हते. प्राथमिक तपासणीनंतर त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या मोहिमेनंतर बोलताना मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी सांगितले की, "सध्या पाणी टंचाईमुळे वन्यजीव गावांकडे आणि विहिरींकडे वळत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकरी वर्गाने विहिरीपासून काही अंतरावर पाणी साठवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून वन्यजीव पाणी पिऊन पुन्हा जंगलाकडे परत जातील." या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पवन भाकरे आणि अमोल भाकरे यांनी मोलाची मदत केली. वनविभागाच्या या तत्परतेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.1
- खामगाव : लग्नामध्ये नाचण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या तिन्ही फरार आरोपींना शिवाजी नगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना वरवट बकाल परिसरातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. २६ एप्रिल २०२६ रोजी मोहम्मद साबीर शेख मुसा (वय ३६, रा. बर्डेप्लॉट, खामगाव) यांनी शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांचा भाचा शोएब खान अमीन खान (वय २२) याला दिनांक २५ एप्रिल रोजी लग्नात नाचण्याच्या कारणावरून आरोपींनी वाद घालून दगडाने डोक्यावर व शरीरावर गंभीर मारहाण केली होती. या हल्ल्यात शोएब खानचा मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १०३(१), ११८(२), ११५(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा (अप क्र. १५८/२०२६) दाखल केला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाची विविध पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे वरवट बकाल परिसरात असून तेथून मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुजम्मील खान जमील खान (वय २२, रा. बर्डेप्लॉट), शेख तालीब शेख रहेमान (वय २२, रा. बर्डेप्लॉट),फैजान खान बुढन खान (वय २५, रा. बर्डेप्लॉट) तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना २६ एप्रिल रोजी रीतसर अटक करण्यात आली आहे. सदरची यशस्वी कारवाई बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर, सपोनी मंदार पुरी, पोहेकॉ संदिप टाकसाळ, निलसींग चव्हाण, देवेंद्र शेळके, विजय उभे, राजू कोल्हे, नितीन भालेराव, प्रविण गायकवाड, केशव झाल्टे, पल्लवी बोर्डे, योगेश सोनटक्के, तसेच सायबर सेलचे कैलास ठोंबरे व राजू आढवे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहेत.1
- Post by Amravati News Update1